Login

तोडगा भाग-७

समांतर रेषा जरी एक होत नसतील तरी दोन जग एकत्र येऊन समस्येवर तोडगा निघेल का सांगणारी अनोखी कथा!
शीर्षक: तोडगा भाग-७

त्या मंदिरातून उघडलेल्या दरवाजातून नभा गेल्यावर दुसऱ्या दुनियेतील एक माणूस तिला तिथे उभा राहिला होता, तो दिसला. तिने जाऊन त्याला विचारले. त्याच्याशी बोलताना तिला लक्षात आले की, त्याने ऑक्सिजन मास्क घातला आहे आणि त्याचा पोर्टेबल सिलेंडर हा त्याने घातलेल्या बॅगेत होता. तसेच ऑक्सिजन मास्कमध्ये एक असा सेक्शन होता, त्यामुळे तो बोलू शकत होता.

"तुम्हाला काही आजार वगैरे आहे का ?" तिने ऑक्सीजन मास्ककडे बघत विचारले.

" नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आमच्या जगामध्ये ऑक्सिजनची कमकरता आहे, त्यामुळे आम्हाला ऑक्सीजन सिलेंडर लावावा लागतो. तसेच हवेत प्रदूषण जास्त असल्यामुळे याची गरज लागते." त्याने सांगितले.

"म्हणजे आमच्याकडे जसं पाण्याचा तुटवडा आहे.तसेच इथे ऑक्सिजनचा तुटवडा आहे असेच ना?" तिने त्याला विचारले.

" हो ,अगदी बरोबर."  तो म्हणाला.

'यांना सर्व गोष्टी कशा माहीत आहेत ?' असे नभा स्वतःशी बोलली आणि त्यामुळे तिने त्याला तर विचारण्याचे ठरवले.

" मला सांगा ,मी इथे आल्यावर तुम्ही माझ्याशी बोलायला सुरुवात केली. तुम्हाला कसे माहिती की मी दुसऱ्या जगातून आली आहे ?" तिने विचारले कारण जो दरवाजा तिने मंत्राने उघडला होता. तो आता बंद झाला होता, त्यामुळे तिने त्याला विचारलं.

" तुम्ही  'थिएरी ऑफ युनिवर्स'  नावाचं पुस्तक वाचत होता ना ? "  त्याने विचारले.

" अ. .हो, पण हे तुम्हाला कसे माहीत ?" तिला तर नवलच वाटले.

" कारण मी सुद्धा ते पुस्तक वाचत होतो. इथे ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे, मी वेगवेगळ्या प्रकारे ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला होता; परंतु इथे झालेली वृक्षतोड आणि आधुनिकीकरणाचे वारे यामुळे हवा प्रदूषित झाली आणि कमीत कमी ऑक्सिजन इथे आता उपलब्ध आहे." तो सांगत होता.

" म्हणजे मी तरी असं निबंधा मध्येच वाचलं होतं की, हवा नसेल तर, पाणी संपले तर;  परंतु आता या सगळ्यांचे गांभीर्य मला कळायला लागले आहे. मला सुद्धा पाणी जास्त कसे उपलब्ध होईल, त्याचा काही आणखी स्त्रोत आहे का, याचा शोध घ्यायचा होता. आमच्याकडेही पाण्याची उपलब्धता कमी आहे तसेच सर्व नद्या आणि पाणी स्रोताचे नाल्यांमध्ये रूपांतर झाल्यामुळे पूर्ण पाणी प्रदूषित झाले आहे आणि त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाहीये." दु:खी मनाने ती सर्व सांगत होती.

" या समस्येतून बाहेर पडण्यासाठी जसं की हवा प्रदूषित झाले तर त्यासाठीचे रासायनिक धूर मोठ्या कारखान्यातून सोडले जातात त्यावर बंधन यायला पाहिजेत, परंतु आधीच सर्वत्र भ्रष्टाचार असल्यामुळे आणि कोणाला त्याची काहीच पडलेली नाहीये. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम गरीब आणि मध्यमवर्ग जनता भोगत आहे."  तो म्हणाला.

" म्हणजे इकडे पण सगळं असंच आहे का?"  तिला वाटत होते की भ्रष्टाचार फक्त तिच्या जगामध्ये आहे, परंतु इथेही सर्व सारखेच असल्यामुळे तिला काही वेगळे वाटत नव्हते.


" मॅम, तुम्हाला समांतर जग याची संकल्पना माहिती असेल; परंतु तुम्ही ते स्वतःहून अनुभवत आहात. कारण तुम्ही आमच्या दुनियेमध्ये आला आहात. जसे तुम्हाला स्वप्न पडत होते तसे मलाही स्वप्न पडत होते आणि कोणीतरी आमच्या दुनियेमध्ये येईल असे सुद्धा मला स्वप्न पडले होते. म्हणूनच मला तुमच्याबद्दल थोडीफार माहिती आहे. "  त्याने सर्व स्पष्ट केले.

" मला पण स्वप्नं पडत होती, परंतु मला तुमची नेहमी पाठमोरी आकृतीiच दिसत होती." ती म्हणाली.

" मग आता समोरा समोर पाहून कसे वाटत आहे ?"  त्याने न राहून नभाला विचारले.

" सर्व ठीक आहे, परंतु तुमच्या चेहऱ्याला काय झालं आहे ?  हे मला समजले नाही. कारण तुमचा चेहरा खूपच जास्त पांढरा दिसत आहे." ती म्हणाली.

" अगदी बरोबर म्हणालात, कारण माझ्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, तसेच श्वासनासाठी ऑक्सिजन हवा असतो त्याची कमतरता असल्यामुळे माझा चेहरा पांढरा फट दिसत आहे. ज्या लोकांना अनेमिया किंवा अजून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे आजार झाले आहेत. ते त्यांच्या त्वचेवर लगेच दिसून येतात ." तो म्हणाला.

" आमच्याकडे सुद्धा उष्माघाताने लोकांचा मृत्यू होत आहे. तसेच शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे खूप लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. पाणी हे जीवन आहे, असे आपण नेहमी शाळेत ऐकायचो ,परंतु आता खरंच ते जीवन किती अमूल्य आहे; हे त्याची मागणी वाढल्यामुळे समजत आहे ." ती म्हणाली.

" बरं, मला सांगा की जशी मी इथे आले तसे मला बाहेर जाता येईल ना?  कारण तो दरवाजा बंद झाला आहे." थोडी भीती आणि उसने अवसान आणून ती विचारत होती.

" काय माहीत ? " त्याने एक भुवई उंचावून उत्तर दिले की माहीत नाही असे सांगितले हे तिला समजले नव्हते.

"ओ, डी डी एस , थांबा जरा." ती तो पुढे जात होता त्याला थांबायला सांगत मागे जात म्हणाली.

क्रमशः

© विद्या कुंभार

कथेचा भाग वाचून झाल्यावर लाईक आणि कमेंट नक्की करा.

अष्टपैलू लेखक स्पर्धा


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →