मोठ्या आलिशान गाडीतून उतरलेली क्षमा एका साध्याशा घरात शिरली. तिला बघताच तिथं बसलेली माणसं जरा बाजूला सरकली. चेहऱ्यावर थोडासा मेकअप, केसांचा बॉब कट, अंगावर झुळझुळीत हलक्या रंगाची पण महागडी साडी, हातात सोन्याचं ब्रेसलेट अन् पायातली उंची चप्पल एकवार न्याहाळून ती म्हणाली, "कोणाचा नंबर आहे? प्लीज मी आत जाऊ का? खूप महत्त्वाचं काम आहे."
ज्या व्यक्तीचा नंबर आला होता ती हो, नाही म्हणायच्या आत क्षमा आत शिरली सुद्धा. खोलीतलं वातावरण जरा विचित्रच होतं. सगळीकडे उदबत्त्याचा सुगंध आणि धूर पसरला होता. भिंतीवर देवांचे फोटो लावलेले होते. खोलीच्या मधोमध लाकडी पेटी घेऊन बसलेली व्यक्ती मात्र कमालीची स्वच्छ, नेटकी दिसत होती.
ज्या व्यक्तीचा नंबर आला होता ती हो, नाही म्हणायच्या आत क्षमा आत शिरली सुद्धा. खोलीतलं वातावरण जरा विचित्रच होतं. सगळीकडे उदबत्त्याचा सुगंध आणि धूर पसरला होता. भिंतीवर देवांचे फोटो लावलेले होते. खोलीच्या मधोमध लाकडी पेटी घेऊन बसलेली व्यक्ती मात्र कमालीची स्वच्छ, नेटकी दिसत होती.
"बसा." धीरगंभीर आवाज घुमला.
आवाजासरशी क्षमाने आपली पत्रिका काढून त्या व्यक्तीच्या हातात दिली आणि ती तशीच उभी राहिली. अशा खोलीत बसणं म्हणजे तिला आपला अपमान वाटला असावा कदाचित. क्षणभर तिला वाटलं, आपण इथं येऊन चूक केली की काय!
"बोला. काय समस्या आहे?" पंत त्याचं गंभीर आवाजात म्हणाले.
"घरात सगळी सुखं हात जोडून उभी आहेत तरीही समाधान नाहीय." क्षमा कशीबशी म्हणाली.
"राहायला सर्व सोयींनीयुक्त मोठं घर आहे. दिमतीला नोकर - चाकर आहेत. खाण्या-पिण्याच्या बाबतीत काहीही कमी नाही. भरपूर पैसा आहे. जे हवं ते खरेदी करता येतं. दोन मुलं आहेत. तीही समजूतदार असल्यासारखी वागतात. सासू -सासऱ्यांचा त्रास नाही. दोन नणंदा आहेत. त्याही आपापल्या घरी सुखी आहेत."
"राहायला सर्व सोयींनीयुक्त मोठं घर आहे. दिमतीला नोकर - चाकर आहेत. खाण्या-पिण्याच्या बाबतीत काहीही कमी नाही. भरपूर पैसा आहे. जे हवं ते खरेदी करता येतं. दोन मुलं आहेत. तीही समजूतदार असल्यासारखी वागतात. सासू -सासऱ्यांचा त्रास नाही. दोन नणंदा आहेत. त्याही आपापल्या घरी सुखी आहेत."
"बरं." पंतांनी मान डोलावली.
"यजमान काय करतात?"
"यजमान काय करतात?"
"कारखाना आहे आमचा. देवाच्या कृपेने तो गेली वीस वर्षे अगदी व्यवस्थित सुरू आहे. नवरा तिथला सगळा कारभार सांभाळतो."
"तुम्ही काय करता?"
"तसं बघायला गेलं तर काहीच नाही." क्षमा खाली मान घालून म्हणाली. बराच वेळ ती तशीच बसून राहिली.
"मग प्रोब्लेम नक्की काय आहे? समस्येचं निराकरण करण्यासाठी समस्या सांगितली पाहिजे. नाही का?" पंतांनी हातातली पत्रिका उघडली.
"राजयोग.." त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
"राजयोग.." त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
"कशाचंच समाधान वाटत नाही. मी सतत ऑनलाईन शॉपिंग करते. मैत्रिणीच्या सोबत डिनर, पार्टी, टूर हे सगळं सुरूच असतं. नवरा मला अजिबात वेळ देत नाही. मुलं आपापल्या व्यापात व्यस्त असतात. सासू -सासरे घरच्या गोष्टींपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात. मग मीही स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते.
पण काहीतरी कमी आहे, असं सारखं वाटत राहतं. रात्र, रात्र झोप लागत नाही. झोप लागलीच तर शांत झोप होत नाही. सकाळी लवकर उठायची सवयही राहिली नाहीय. मग संपूर्ण दिवसाचं शेड्युल बिघडून जातं. आयुष्यात नवीन काही घडतच नाहीय." बोलता बोलता क्षमा खाली बसली होती. हे तिच्या लक्षात आलं नाही.
पण काहीतरी कमी आहे, असं सारखं वाटत राहतं. रात्र, रात्र झोप लागत नाही. झोप लागलीच तर शांत झोप होत नाही. सकाळी लवकर उठायची सवयही राहिली नाहीय. मग संपूर्ण दिवसाचं शेड्युल बिघडून जातं. आयुष्यात नवीन काही घडतच नाहीय." बोलता बोलता क्षमा खाली बसली होती. हे तिच्या लक्षात आलं नाही.
यावर पंत हसले. पत्रिका न्याहाळत ते पुढं म्हणाले, " तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुमच्याच बोलण्यातून येत आहेत. मला सांगा, घरी पाहुणे येतात की नाही?"
"याचा माझ्याशी काय संबंध? कोणीतरी माझ्यावर जादूटोणा वगैरे केलाय की काय?" क्षमा आपले केस नीट करत म्हणाली.
यावर पंत कितीतरी मोठ्याने हसले. "नाही ओ बाई. घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार कोण करतं? इतकंच विचारायचं होतं."
"आमच्याकडे चार नोकर आहेत. तेच करतात सगळं." क्षमा आवाज वाढवत म्हणाली.
"उद्यापासून घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार तुम्ही स्वतः करायचा. ते जमत नसलं तरी किमान घरच्या लोकांना स्वतःच्या हाताने पाणी नेऊन द्यायचं. पदार्थ बनवून खायला द्यायचे. काय हवं, नको ते बघायचं. एकूणच सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही स्वतः त्यांची बडदास्त ठेवायची."
"हा काय उपाय झाला? माझा प्रोब्लेम निराळाच आहे आणि तुम्ही सांगताय काय?" क्षमाने तिथंच मनातल्या मनात ठरवून टाकलं, 'वहिनीने मोठं नाव आहे. असं सांगितलं म्हणून या वस्तीत आले. नाहीतर मी इथं येण्याचं कारणच काय होतं? आत इथं परत फिरकायचं सुद्धा नाही.'
"माझ्यावर विश्वास असेल तर हे करून बघा आणि नंतर पुन्हा या. बघा तुमच्यामध्ये कित्ती फरक जाणवतो ते." पंतांनी हातानेच 'जा' असा इशारा केला. तशी क्षमा तोंड वाकडं करत जागेवरून उठली.
"काय माणूस आहे? नक्कीच फ्रॉड असणार हा." असं म्हणत ती पट्कन बाहेर पडली. कधी एकदा इथून सुटका होते असं झालं होतं तिला. जाताना पाचशे रुपयांची नोट तिने त्या लाकडी पेटीवर जवळ जवळ आदळलीच.
"बाई, हे चारशे परत घ्या. एका प्रश्नाचे मी फक्त शंभर रुपये घेतो." पंत गरजले.
"एकदा दिलेले पैसे मी परत घेत नसते." क्षमा काहीशा गर्वाने म्हणाली.
----------------------
----------------------
आठवडा तसाच गेला. नवं काही घडत नव्हतं. पुढच्या आठवड्यात मात्र क्षमाची नणंद तिचे यजमान कामासाठी परदेशी जाणार होते म्हणून आपल्या मुलांना घेऊन राहायला आली. पहिला दिवस सरला आणि दुसऱ्या दिवशी अचानक पंतांनी सांगितलेला उपाय क्षमाला आठवला. 'काहीच न करण्यापेक्षा निदान हा छोटासा उपाय करून बघू. त्या कसल्याशा वस्तीत जाण्यासाठी आपण पाचशे रुपये मोजलेत.' असं म्हणत तिने स्वयंपाक घराचा ताबा घेतला.
बऱ्याच वर्षांनी आठ -नऊ माणसांचा स्वयंपाक करायचा म्हणजे तिच्या जीवावर आलं होतं. तरीही आश्चर्यचकित झालेल्या नोकरांच्या मदतीने तिने मोजका स्वयंपाक केला अन् सगळ्यांना वाढला देखील.
आपल्या सुनेला अशा अवतारात बघून सासुबाई एकदम खुश झाल्या. नणंद अन् मुलांनी जेवणाची खूप स्तुती केली. क्षमाचा नवराही पोटभर जेवला. एकूणच आजचा दिवस आनंदात गेला होता. क्षमाचं खूप कौतुक झालं होतं. स्वतःच्या हातचं खाऊन खूप दिवसांनी आपलं पोट भरल्यासारखं वाटत होतं तिला.
सेट न केलेले केस, आज चेहऱ्यावर मेकअपचा थर नव्हता. अंगावर साधासा ड्रेस..आरशात स्वतःचं रूप पाहून क्षमाला हसू आलं. सासुबाई समाधान मिश्रित कौतुकाने सुनेची लगबग बघत होत्या. "आज अनेक वर्षांनी या घराला घरपण आलं म्हणायचं. मला जमत होतं तेव्हा मी सगळं करायचे. सून आल्यावर घराचं चित्रंच बदलून गेलं. आज सारी सुखं समोर उभी आहेत. पण सुनेच्या हातचं खाऊन जे सुख मिळतं ते इतर कशातच नाही.." त्या क्षमाच्या सासऱ्यांना म्हणाल्या.
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
