(जलद कथामालिका लेखनस्पर्धा)
दुसऱ्या दिवशी आईला थोडे बरे वाटू लागले. हे पाहून आरतीला देखील बरे वाटले. आईचे खाणेपिणे, औषधपाणी सारं काही ती जबाबदारीने करत होती. बहीण भाऊ सारे फोन करुन आईची वारंवार विचारपूस करत होते. अधूनमधून सुट्टी असेल तेव्हा बहिणी यायच्या आईला भेटायला. फक्त भावाला यायला नाही जमायचे. कारण नोकरीनिमित्त तो अनेक वर्षापासून दुबईला होता.
मात्र घरात तिच्याशी कोणीच नीट बोलेना. मुले मात्र आई आई करत आरतीला येवून बिलगली. नवऱ्याने तर तिच्याशी अबोला धरला. पण तरीही ती सासरीदेखील तिचे कर्तव्य बजावत होती. मग कोणी कसे का वागेना.
"आता पुन्हा पडली हीची आई आजारी. जा आता पुन्हा माहेरी. पण ह्यावेळी कशी जाते? ते मी पण बघतेच."
अर्धवट बोलणे ऐकून सासू बाहेर निघून गेली.
प्रचंड तोंडसुख घेतले नेहमीप्रमाणे सासूने.
"आई मग काय ठरवलंय? धाकट्या लेकाकडे जाण्याबद्दल बोलतेय मी."
मुलांना सुट्टी लागली की जा तू माहेरी. इकडची काळजी नको करू. मी आहे, सांभाळेल सर्व."
" केतन, चल लवकर. मला उशीर होईल. आणि हो ती बॅग पण घे सोबत. " मंजुषा केतनला म्हणजेच आपल्या धाकट्या दिराला बोलत होती.
केतन पटकन बॅग घेऊन वहिनींसोबत निघाला. माधुरी मात्र डोळ्यात पाणी घेऊन स्वयंपाक घरात निघून गेली. केतन - माधुरीच्या लग्नाला तीन महिने झाले होते. मंजुषा या घरात लग्न करून आली त्यावेळी केतन कॉलेजमध्ये शिकत होता. त्यामुळे दोघात छान मैत्री झाली. घरीसुद्धा सर्वाना ही गोष्ट छान वाटली.
मात्र केतनच लग्न झाल्यापासून मंजुषा जरा जास्तच केतनवर हक्क दाखवत होती. माधुरीने कुठे बाहेर जायचा प्लॅन केला की मंजुषा काहीतरी कारण काढून त्यात खोडा घालायची.
एकदा माधुरी आणि केतनने मूवीला जाण्याचा प्लॅन केला. माधुरीला तयार होताना पाहून मंजुषाला लक्षात आल की यांचा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. तिने केतन घरात येताच आपल्या मुलावर ओरडायला सुरुवात केली, " तुझ्या पप्पाना सांगून कंटाळाले आहे. तुझ्या क्लासमध्ये जायला. पण हे मनावर घेतील तर ना ? आठवडा झाला. आता जर आज पण नाही गेले तर तुला क्लासमध्ये बसू देणार नाहीत. मग परीक्षेत काय लिहिणार ? "
माझी मेली कामे संपतच नाहीत. जाऊ दे. मीच का करू ? कळू दे तुझ्या पप्पाना पण, मुलाकडे पण थोडं लक्ष दयायला हवं ते. "
वहिणीचं बोलणं ऐकून केतन लगेच म्हणाला, " वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी जातो त्याच्यासोबत. त्याचं क्लास मध्ये बसणं गरजेचं आहे. त्यामुळे केतन पुतण्याला घेऊन तडक क्लासमध्ये गेला. हा सर्व प्रकार माधुरी समोरच घडला. माधुरीला तिच्या लग्नाचं नवेपण अनुभवायला मिळतच नव्हतं.
आज पुन्हा तेच झालं. माधुरी आणि केतन बाहेर जाणार होते. खूप दिवसात फिरायला गेले नव्हते म्हणून जास्त नाही पण जवळ पार्कमध्ये वेळ घालवणार होते आणि नंतर जेवून घरी येणार होते. पण मंजुषाला अंदाज येताच तिने केतन घरी येताच सांगितलं, " केतन आई खूप दिवस झाले बोलवतेय. आज जरा निवांत वेळ आहे. तर मला घेऊन चल. संध्याकाळपर्यंत परत येऊ आपण. "
केतनही लगेच तयार झाला. त्यात माधुरीला समोर पाहताच मंजुषा मुद्दाम म्हणाली," केतन, चल लवकर. मला उशीर होईल. आणि हो ती बॅग पण घे सोबत. "
माधुरीला खूप राग आला. यावर लवकर तोडगा काढावा लागेल. हे तिला कळून चुकलं. दोघेही गेल्यावर माधुरी बराच वेळ बाल्कनीत उभी राहून विचार करत होती. तेवढ्यात तिला तिचे मोठे दीर येताना दिसले. आणि माधुरीच्या डोक्याची बत्ती पेटली. ती पटकन जाऊन आत हॉलमध्ये बसली.
डोअरबेल वाजताच डोळ्यात अश्रू आणि पडक्या चेहऱ्याने तिने दरवाजा उघडला आणि मुद्दाम तिने डोळे पुसल्यासारखं केलं. ते पाहून सचिनने म्हणजेच मोठ्या दिराने काळजीने तिला " काय झालं? " म्हणून विचारलं. आधी तिने मुद्दाम टाळाटाळ केली पण नंतर म्हणाली, " भाऊजी, आता काय सांगणार तुम्हांला ? लग्न फक्त नावाला झालं आहे माझं. लग्न झाल्यापासून एकदाही केतन मला बाहेर घेऊन गेला नाही, की मूवीला नेलं नाही. नवेपण नाहीच. असं वाटत आई वडिलांकडे होते ते काय वाईट होत ? किमान मला काय हवं नको, माझी इच्छा, याची कोणातरी दखल तरी घेत होत.
आता मन मारून जगतेय. मी काही ठरवलं की याला काहीतरी काम असतंच. आज बघा ना. आम्ही ठरवलं होत बाहेर जायचं पण वहिनीला माहेरी घेऊन गेला हा. आता वहिनींच माहेर आहे अर्ध्या तासावर. याआधी सुद्धा वहिनी एकट्या जायच्या ना. पण नाही. केतन मुद्दाम गेला त्यांना घेऊन, कारण त्याला माझ्यासोबत वेळ घालवायचाच नाहीये.
मी पुरती कंटाळले आहे. घरी असते तर दादासोबत शॉपिंगला तरी गेले असते. पण इथे तर माझं घर वाटतच नाही. "
हे सर्व ऐकून सचिनला खूप वाईट वाटलं. एक मुलगी एवढी स्वप्न घेऊन या घरात आली. तिला अजून ' आपल घर ' वाटत नसेल तर कसं होईल. काहीतरी विचार करून सचिन म्हणाला, " माधुरी एक काम कर. जा तयार हो. तू म्हणाली होतीस ना ? तुझ्या दादासोबत शॉपिंगला गेली असतीस. मी पण तुझा भाऊच आहे. चल मी नेतो तुला शॉपिंगला. हवं तेवढं शॉपिंग कर. तसही केतन, मंजुषा आणि मुलं तर नाहीत. मग आपण बाहेरच जेवून सुद्धा येऊ. "
माधुरीच्या डोक्यात असलेला प्लॅन पुढे सरकत होता. तिला माहित होत.
पूर्ण वाचा लिंकवर
कथा: मर्यादा
https://irablogging.com/blog/maryada_44900
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा