ती आणि तिचं कुटुंब भाग - 46
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
विषय - कौटुंबिक
वास्तववादी कथा मालिका आहे. विनंती वाचून कमेंट नक्की करा.
लीला- "हॅलो आई. यांचा फोन लागत नाही. त्यांना फोन द्या ना."
सासूबाई (मालती) -"बरं देते. दत्ता.. हे घे रे तूझ्या बायकोचा फोन आहे."
दत्ता-"हं काय आता? "
लीला - "आहो राहुल भावजीची नोकरी गेली. ते रडतच घरी आले ऐकतच नाही. फार तोंड पाडून बसले. स्वानंदी समजावते ते दारच उघडेना. पटकन त्यांना फोन करा. तुमचे ऐकतील. तुमचा फोन लागत नाही."
दत्ता-"बरं बरं लावतो. अरे देवा. ठेव फोन."
दत्ता आईच्याच फोन वरून फोन लावतो. आता हे काय नवीन? पुटपुटतो. बाहेर गॅलरीत जाऊन बोलतो.
दत्ता -"आता. "हॅलो.. अरे राहुल.. ऐक बाबा. तुला दत्ता दादाची शप्पथ आहे बघ. जीवाचं काही करू नको. कधीच. टेन्शन घेऊ नकोस. दार उघड. स्वानंदी, लिलाशी बोल जरा. येतो लवकर आम्ही. इथले आटपून येणारं आहे. रडू वगैरे नकोस. तुझा दत्ता दादा आहे तुझ्यासोबत अरे."
राहुल-"हो.. दादा फोन ठेवतो."
दत्ता गॅलरीतून घरात येतो. आई, सूनिता, गणेश, बाबा सगळे प्रश्नार्थक नजरेने बघत असतात.
आई (मालती) -"आता आणखीन काय झाले? "
दत्ता-"काही नाही. हे बघा. आधी हे पहा इथले. "
आई (मालती) - "सांगून टाक बाबा. उगाच जीव टांगणीला नको लावूस."
दत्ता-"आई टेन्शन घेऊ नकोस. सगळे ठीक आहे. "
आई (मालती) -"तू लपवले की अजून टेन्शन येते. आता काय नवीन मग. सांग माझी शप्पथ आहे तुला.."
दत्ता- " आई अगं.... राहुलची नौकरी गेली. तो रडतच आला. आणि तोंड पाडून बसलेला आहे. खोलीच दार उघडत नाही. स्वानंदी, लीला बाहेरून बोलत होत्या. लीला म्हणे फोन आहे त्याच्या कडे तर मी फोन लावला तर माझे ऐकेल तर माझा फोन लागेना तूझ्या फोन वर केला लीला ने अर्जेन्ट मध्ये. मी बोललो त्याच्याशी. आता होईल सगळे ओके. तरी लीलाला एक कॉल करून बघतो."
आई (मालती) - " आले की सगळी कडूनच संकट येतात. आता हे काय नवीन? आई ग कसं तरीच होत मला. बापरे.. "
गणेश-"सुने आईला पाणी आण लवकर."
सूनिता- पाणी आणून पाजते आईला."टेन्शन घेऊ नको आई आता तू. शांत हो."
आई-"मुलीचं असं, मुलाचं तस काय करावं आई ने? " रडते.
सूनिता-"आई शांत हो. "
दत्ता गॅलरीतून फोन लावतो - " हॅलो लीला सगळे ओके का आता.. बरं दार उघडले ना राहुल ने. बरं झाले. नॉर्मल बोलतो आहे का? जाऊदे हो नाही करतो ना बस झालं. मला कळवत रहा. इकडेच आहे घरी. जावई आला नाही हॉस्पिटल मधून घरी. चालू आहे. ठीक ठेवतो."
इतक्यात जावई येतो घरात.
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे
©®
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा