Login

थोडं तिचंही कौतुक करा... भाग 3

Katha tichya jivnachi

थोडं तिचंही कौतुक करा...भाग 3


मीनलच्या सासूने तसं समीर आणि मीनल जवळ बोलून दाखवलं,

“मला आता या घरात पाळणा हलायला हवा, किती दिवस आम्ही म्हातारा म्हाताऱ्यांनी असं राहायचं. आम्हाला नातवंडाचे तोंड बघू द्या, आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तरी होऊ द्या हे सगळं.”

“अग पण आई आता कुठे आम्ही सेटल होतोय. माझी नोकरी आहे, मीनलची नोकरी आहे हे सगळं कसं होणार. आताचा मी बाळाचा विचार करू शकत नाही अग मीनलच्या नोकरीचा काय? बाळ झाल्यानंतर तिला हे सगळं नाही करता येणार. तिचं करिअर आहे तिला तिचा विचार करावा लागेल ना.”

“हे बघ, ते काही मला माहित नाही. वर्षभराच्या आत मला पाळणा हलायला हवा. मीनलच्या सासूने सक्ती केल्यासारख सांगितलं.

“ठीक आहे आम्ही विचार करू.” असं म्हणून मीनल आणि समीरने गोष्ट तिथेच टाळली.
बघता बघता दोन महिने गेले, पुन्हा मीनलच्या सासूने तोच तगादा लावला.
एक रात्री मीनल खूप रडत बसली होती.

“काय झालं मीनल?”
“समीर मला कंटाळा आलाय आता, मी आल्यापासून सगळंच करते ना. मी सकाळचं सगळं करून ऑफिसला जाते. सगळी कामं करून जाते, आल्यानंतरही करते. तरी आई माझ्याशी असं का वागतात? कधीच ते माझं कौतुक करत नाहीत उलट मला टोचूनच बोलत असतात आणि आता बाळाचं काय नवीन. समीर सगळं कसं होणार आहे. मी जर हे सगळं करत राहिली तर माझं करिअरचं काय? माझे प्रोजेक्ट्स आहेत मला ते कम्प्लीट करायचे आहेत. मला ना काही कळतच नाहीये.”

“तू काळजी करू नकोस मी बोलेल आईशी.”

“काही उपयोग होणार नाही, त्या तुझंही ऐकत नाहीत मला माहित आहे.”

“असू दे आपण करू काहीतरी, दोघांनी खूप विचार केला आणि एका वर्षानंतर आपण प्लॅनिंग करू असं ठरवलं.

ठरल्याप्रमाणे एका वर्षानंतर त्यांनी प्लॅनिंग केलं आणि मीनलला दिवस गेले. समोरचे सहा महिने मीनलने ऑफिस केलं. त्यात तिला बराच त्रास झाला, पहिले तीन महिने तिला उलट्या, मळमळ याचा खूप त्रास झाला त्यातही सासूबाईचे टोमणे सुरूच होते. त्यात स्वयंपाकावरून त्या तिला रोज बोलायच्या. 

सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मीनलने सुट्ट्या घेतल्या. आता ती दिवसभर घरीच राहू लागली, काम झाली की ती तिच्या रूममध्ये बसून छान गाणी ऐकायची, कधी पुस्तक वाचायची पण तेही तिच्या सासूबाईला बघवत नसे. रिकामी बसली आहे या विचाराने तिच्या सासूबाई तिला काही ना काही काम सांगत असतं.  आधी मीनलने विचार केला की ठीक आहे असतील कामे म्हणून सांगत असतील पण त्यानंतर तिला कळलं की सासूबाई सगळं जाणून बुजून करतायेत.


समीरला सांगितलं तो बोलला देखील त्याच्या आईशी, पण आई ती आई स्वतःवर कुठलीच गोष्ट येऊ देत नव्हती, मी काही केलंच नाही असंच दाखवायची.

मीनलने गोंडस लेकीला जन्म दिला. तिच्या पायगुणाने समीरचं प्रमोशन झालं आणि त्याची चांगली भरभराट झाली.

गोड लेकीचं नामकरण झालं. आणि ईरा नावं ठेवलं.

सगळं व्यवस्थित सुरू होत. फक्त सासुबाई टोमणे सोडले तर


क्रमशः