शीर्षक - आरसा का पहावा?
*उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा
धूल आईने चेहरे पर थी और
आईना साफ करता रहा।*
धूल आईने चेहरे पर थी और
आईना साफ करता रहा।*
जेव्हा जेव्हा हा शेर ऐकते तेव्हा प्रत्येक वेळी नव्याने मी विचारात पडते. चेहऱ्यावरची धूळ पुसण्याची गरज आपल्याला वाटत नाही, आपण आरसे पुसत राहतो.
आरसा म्हणजे दर्पण, आयना, मुकुर आणि एक अशी काच जी तुमचं प्रतिबिंब दाखवते, अगदी खरे खरे म्हणजे आरशाला खोटं बोलता येत नाही. मग हे प्रतिबिंब पाहणे, इतके आवश्यक का आहे? आपल्याला इतकी उत्सुकता असते स्वतःला आरशात पाहण्याची. . . कारण मी कसा दिसतो किंवा मी कशी दिसते? स्वप्रेम !
केवळ प्रतिबिंब पाहणे एवढेच मर्यादित न ठेवता आरसा हा शब्द आला की त्याचे वेगवेगळे वाक्य प्रयोग, शब्दप्रयोग, कधी भावप्रयोग आपण अनुभवत असतो.
एखादी तरुणी आरशात पाहते आहे म्हणजे ती शृंगार करते आहे, ती स्वतःला सजवते आहे आणि पुन्हा पुन्हा स्वतःच्या प्रेमात पडते आहे असे समजतो. एखादी नववधू आरशात पाहून तयार होते आणि लग्न सोहळ्यात तीच सर्वात सुंदर दिसावी असा अट्टाहास असतो. होणाऱ्या नवऱ्याने तिला पहात रहावे शिवाय सर्वांचे लक्ष तिच्याकडेच असावे. त्याचवेळी एखादा वयोवृद्ध व्यक्ती जेव्हा रोज आरशात पाहतो तेव्हा तो त्याच्या भूतकाळात जातो , पूर्वी मी कशी दिसायचे आणि आता मी कशी दिसते किंवा दिसतो आहे? इतका टवटवीत चेहरा होता पण चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत आहेत, डोळे खोल गेले आहेत, आता काही सौंदर्य उरले नाही. पण आपण सर्वच जण आरसा पाहतो.
आपल्या बाह्य रूपाचा आपल्याला स्वतःला परिचय करून देणारी वस्तू म्हणजे आरसा! पण आरसा दाखवणे असा वाक्यप्रयोग केला तर कोणाला तरी त्याचं सत्य रूप दाखवणे असे म्हटले जाते. आरसा खोटं बोलत नाही हा एक अतिशय स्तुत्य गुण आहे. म्हणून या शब्दाला साहित्यात बरंच महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे.
कधी कधी मनात विचार येतो म्हणजे आपण काचेला मागे चांदी किंवा अल्युमिनियम चा मुलामा लावून त्याचा आरसा बनवतो आणि आपण कसे दिसतो हे पाहतो म्हणजे तीच काच जेव्हा पारदर्शक असते तेव्हा आपल्याला आरपार दिसतं पण आपण स्वतः त्यात दिसत नाही.
प्राचीन काळात जेव्हा आरशाची निर्मिती झाली नव्हती तेव्हा काय? तर ते लोक तेव्हा पाण्यात प्रतिबिंब पहात पण हो, ते पाहण्यासाठी पाणी स्थिर असावे लागते अस्थिर पाण्यात किंवा वाहत्या पाण्यात कधीच प्रतिबिंब दिसत नाही. . यातून बराच बोध घेता येतो.
पुढे सांगायचं तर. . . जिवंत आरसा म्हणजे डोळे! समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात आपलं प्रतिबिंब पाहणं कधी कधी ही एक प्रेमाची परिभाषा आहे. म्हणून प्रियकराचे डोळे आपल्याला आरशासारखे प्रतीत होतात असाही एक सुंदर प्रेमभाव आहे.
आरसा म्हटल्यावर मला प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल ज्यांना हिंदी मध्ये अरस्तु म्हणतात त्यांचा एक किस्सा नमूद करावासा वाटतो.
अॅरिस्टॉटल हे दिसायला खूप कुरूप होते आणि त्याची त्यांना जाणीव होती पण त्या बुद्धीने तर्कशास्त्र जाणत होते. तर ते एकदा आरश्यात खूप लक्ष देऊन स्वतःचा चेहरा पाहत होतो आणि त्यांच्या एका शिष्याला ते पाहून हसू फुटलं. त्यांनी हे पाहिलं त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं की तो का हसला? शिष्य घाबरला. आपल्या गुरूंना असे उत्तर कसे देणार की तुम्ही कुरूप असताना आरसा पाहता म्हणून! त्याचे भाव ओळखून अरिस्टॉटल म्हणाले, मी लक्षपूर्वक रोज आरशात पुन्हा पुन्हा स्वतःचे प्रतिबिंब एवढ्यासाठी पाहतो की मला जाणीव आहे निसर्गाने मला कुरूप बनवले आहे पण म्हणून दिवसभर मला अशी कामं करायची आहेत ज्यामुळे माझ्या कुरूप असण्याचा सेवन विसर पडेल, समाजाला त्याने काही फरक पडणार नाही.
आता शिष्याच्या मनात एक प्रश्न आला "म्हणजे गुरुजी सुंदर माणसाने आरसा पाहूच नये का?"
" असं नाही. मी तर म्हणेन की सुंदर माणसाने जास्त वेळा आरसा पहावा कारण त्याला हे सतत स्मरण राहावे की देवाने मला इतके सुंदर रूप दिले आहे तर मी असं कुठलंच काम करू नये ज्यामुळे माझ्या या सुंदर असण्याच्या नावावरती कुठला कलंक लागेल किंवा त्या सुंदरतेचा काही उपयोग राहणार नाही." हे ऐकल्यानंतर त्या शिष्याने त्यांच्या पायावरती डोके ठेवले आणि हसण्याबद्दल माफी मागितली.
हा एक किस्सा नेहमी याची आठवण करून देतो की रूप तुमच्या हातात नाही पण गुण तुमच्या हातात आहेत. आरसा कधीच तुमचे गुण दाखवत नसेल, तो तुमचं बाह्यरूप दाखवतो. म्हणजे कुठे काही चेहऱ्यावर लागले आहे, त्वचेवर काही नवीन खूण आहे की काही व्रण आहे.
दैनंदिन जीवनात महिलांसाठी टिकली व्यवस्थित लागली का, मेकअप चांगला झालाय का,काजळ पसरलंय का ? हे पाहण्यासाठी छोटे छोटे आरसे असतात अगदी पर्समध्ये बसणारे! घरात मोठे ड्रेसिंग टेबल आरसे असतात ते वेगळे!
याचबरोबर एक आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या जीवनाचा आरसा आपले गुण आणि चरित्र असतं.
आपल्या कार्यांनी आपण ते प्रतिबिंब घडवत असतो त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वाईट वागण्याने त्याच्या आरशात दिसणाऱ्या रूपाचा तसा काहीही संबंध नसतो, वेळ पडल्यावर , आवश्यक असेल तिथे त्याच्या गुणांचा पाढा वाचून आपण त्याला आरसा दाखवू शकतो ना!

*©® स्वाती बालूरकर सखी*
२७..०४.२०२६
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने