भाग 7
तो गॅसकडे पाठ करून कप काढायला वळला आणि एक थंड हवेची झुळूक त्याला स्पर्शून गेली तसं त्याच्या अंगावर काटाच आला.
त्याने इकडे-तिकडे पाहिलं, तर किचनची खिडकी उघडी होती.
"अच्छा बाहेरून थंड हवा आली वाटतं." त्याने एक सुटकेचा श्वास टाकला आणि खिडकी बंद केली.
उकळलेला चहा गाळून चहाचा कप हातात घेऊन तो हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसला.
चहाचा एक घोट घेताच त्याला बरं वाटल.
"ही जागा एकदम भारी आहे लिहायला कसलं सुचतंय इथे आल्यापासून" तो स्वतःशीच म्हणाला.
पुढे काय लिहायचं, कथेत कोणता नवा ट्विस्ट आणायचा, हा विचार करता करता त्याने आपला चहा संपवला.
पुढे काय लिहायचं, कथेत कोणता नवा ट्विस्ट आणायचा, हा विचार करता करता त्याने आपला चहा संपवला.
तो चहाचा रिकामा कप घेऊन किचनच्या दिशेने गेला. कप सिंकमध्ये ठेवण्यासाठी तो पुढे सरकला, आणि कप ठेवायला गेल्यास त्याचं लक्ष कालपासून तिथेच पडलेल्या भांड्यांकडे गेलं.
"चला, आधी ही भांडी घासून घेऊ" असा विचार करून त्याने पाण्याचा नळ चालू केला आणि हातात स्क्रबर घेतला.
तो भांडी घासायला लागला, पाण्याचा 'झळझळ' असा आवाज त्या शांत किचनमध्ये गुंजू लागला. पण भांडी घासता घासता अचानक त्याला जाणवलं.
परत तीच गोठवणारी टाकणारी थंड हवा ती हवा कुठूनतरी लांबून आल्यासारखी नव्हती, तर अगदी त्याच्या मानेच्या मागून, कोणीतरी जवळ उभं राहून फुंकर मारावी तशी आली.
तो दचकला आणि त्या गडबडीत त्याच्या हातातून सिरॅमिकची प्लेट निसटली. ती खाली पडून खळकन फुटली.
त्याचा श्वास वाढला होता. त्याने लगेच वळून किचनच्या खिडकीकडे पाहिलं. खिडकी पूर्णपणे बंद होती.
"आता तर खिडकी बंद आहे, तरी हे कसं झालं?" या विचाराने तो किंचित घाबरला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले.
"नाही हा भास आहे हे शक्य नाही" तो डोळे बंद करुन ओरडून म्हणाला.
काही वेळाने त्याने डोळे उघडले तर समोर काहीच नव्हत ना तो गारवा होता सगळ ठीकच वाटत होत.
"या कथेच्या नादात मला वेड लागणार आहे,त्यातून थोडा ब्रेक घेतला पाहिजे" त्याने स्वतःला समजावलं आणि फुटलेल्या प्लेटचे तुकडे गोळा करुन डस्टबिन मध्ये फेकले आणि उरलेले भांडे घासून ठेवले.
सगळं झाल्यास तो बेडवर पडला त्याच लक्ष लॅपटॉपवर गेलं पण आता लिहायची इच्छा होत नव्हती थोड डोक शांत करुन मगच लिहू हा विचार करुन त्याने लाईट बंद केली आणि झोपायला गेला.
क्रमशः
