Login

शेवटचा कॉल भाग 1

एक भयकथा
भाग 1

संध्याकाळची वेळ,तो रिक्षातून खाली उतरला आणि क्षणभर समोरच्या इमारतीकडे पाहतच राहिला.

शहराच्या गजबजाटापासून ही जागा बरीच लांब होती, त्यामुळे तिथे एक प्रकारची भयाण शांतता पसरली होती फक्त वाऱ्याचा सुईसुई आवाज आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या आवाज येत होता.

"जपून रहा बरं का साहेब इथे" रिक्षावाल्याने पैसे घेताना सावधगिरीच्या सुरात म्हटलं.

त्याचा हात खिशातच थांबला.

"का?" त्याने काहीसं न समजून विचारलं.

रिक्षावाल्याने आजूबाजूला एकदा नजर फिरवली आणि दबक्या आवाजात म्हणाला,"नाही जरा सूनसान एरिया आहे,म्हणून म्हणलं बाकी तुमचं नशीब"

इतकं बोलून रिक्षावाल्याने गाडी वळवली आणि तो तिथून झपाट्याने निघून गेला. तो तिथे नवीनच राहायला आला होता. सामान आधीच शिफ्ट झालं होतं आणि तो स्वतः आजच गृहप्रवेश करणार होता.

"नवीन राहायला आलात वाटतं?" अचानक मागून एक आवाज आला.

त्याने दचकून मागे पाहिलं तिथे एक वृद्ध गृहस्थ उभे होते.

"हो" त्याने थोडक्यात उत्तर दिलं.

"कुठला फ्लॅट?" काकांनी आपली नजर त्याच्या डोळ्यांत रोखत विचारलं.

"पाचशे दोन"त्याने हे सांगताच,त्या काकांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले.

काकांनी एक पाऊल पुढे टाकत त्याला सावध केलं.

"तिथे कशाला राहतोय? राहायचं असेल तर बिल्डिंगच्या दुसऱ्या कोणत्याही मजल्यावर रहा,नाहीतर आत्ताच दुसरी जागा शोधायला सुरुवात कर."

त्यांच्या बोलण्यातील गांभीर्य बघून तो थोडा गोंधळला.

"असं का बोलताय काका?काही समस्या आहे का तिथे?" त्याने विचारलं.

काकांनी आजूबाजूला पाहिलं,जणू भिंतींनाही कान असावेत अशा भीतीपोटी ते त्याच्या जवळ सरकले आणि दबक्या आवाजात म्हणाले,

"ती जागा चांगली नाहीये,आजवर त्या पाचशे दोन मध्ये जो कोणी राहायला आला, त्याचा अचानक गूढ मृत्यू झालाय कोणालाही तिथलं पाणी पचलं नाही आणि हवा सोसली नाही."

हे ऐकून त्याला भिती वाटण्याऐवजी हसू आल.

"काय सांगताय काका? खरंच? माझ्या नवीन स्टोरीसाठी एकदम कडक स्क्रिप्ट मिळाली की मग ही या अशाच गोष्टींच्या शोधात तर मी असतो,चला काका येतो मी बाय"

काका काही बोलणार इतक्यात तो मोठ्या आत्मविश्वासाने लिफ्ट मध्ये शिरला.

काका तिथेच उभे राहून त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यांतील भीती आता एका करुणेत बदलली होती, जणू ते शेवटच्या वेळी कोणाला तरी पाहत होते त्यांनी प्रयत्न केला होता पण त्याने ऐकलं नाही

क्रमशः



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →