Login

स्वीकार - भाग -1

Svikaar

स्वीकार - भाग -1


      लग्नाचा मंडप फुलांच्या सुगंधाने दरवळत होता, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, सनईचे सुरु कानावर पडतं होते, आज नवीन नवरी घरी येणार होती, त्यामुळे सगळी मंडळी खुश होती, दारात प्राजक्ताचं औक्षण झालं, उजवा पाय ठेवतं तीने घरात प्रवेश केला.


  सगळ्यांनी हसत प्राजक्ताचं स्वागत केलं, पण ह्या गर्दीत एक चेहरा मात्र निर्वीकार होता त्या म्हणजे प्राजक्ताच्या सासूबाई रचनाताई, कारण त्यांना प्राजक्ता पसंत नव्हती.


    प्राजक्ता हि प्रथमेशच्या आवडीची होती, त्याची कॉलेज मधली मैत्रीण होती, त्याचं तिच्यावर प्रेम होतं, रचनाताईना त्यांच्या बहिणीच्या जावेची मुलगी सुनं म्हणून आणायची होती, पण प्रथमेश ऐकेनां म्हणून त्या नाईलाजाने ह्या लग्नाला हो म्हणाल्या होत्या.


  घरातल्या मोठ्यांच्या नवीन जोडपं पाया पडलं, पण रचनाताईनंच्या ते दोघे जवळ आल्यावर त्या मुद्दाम दूर गेल्या, हे प्रथमेशनें बघितलं पण उगाचचं लग्नघरात गोंधळ नको म्हणून तो गप्प बसला.


      दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली, नंतर हळद उतरणी झाली, नवीन जोडपं चार दिवस महाबळेश्वरला फिरून आलं, आणी मग प्रथमेश प्राजक्ताचा संसार सूरु झाला.


   लग्नानंतर सातव्या दिवशी सकाळी लवकर उठून प्राजक्तानें सर्वांसाठी वेलची, आलं घालून चहा केला, आणी नाश्त्याला कांदेपोहे केले, आणी चहा आणी नाश्ता घेऊन ती बाहेर हॉलमध्ये आली, सर्वांना तीने चहा आणी पोहे दिले.


     सासूबाईंनी चहाचा पहिला घोट घेताच त्या चिडून म्हणाल्या, आमच्याकडे चहात वेलची घातलेली चालत नाही, आणी कांदेपोहेमध्ये साखर पण नाही घालतं आम्ही.


  माफ करा आई , मला माहित नव्हतं, प्राजक्ता शांतपणे बोलली.

  दुपारी तीने सगळा स्वयंपाक केल्यावर जेवायला बसल्यावर सासूबाई पुन्हा बोलल्या, आमच्याकडे एवढं तिखट जेवण चालत नाही, आणी चपात्या पण अशा नसतात, नरम लागतात आम्हाला, घडीच्या पोळ्या खातो आम्ही.


   दिवसभरात सतत रचनाताई प्राजक्ताच्या चुकाचं काढत होत्या, त्यामुळे तिचे सासरे म्हणाले, रचना अगं प्रत्येक गोष्टीत चुका काढू नकोसं नां तिच्या...


त्यावर सासूबाई म्हणाल्या, आज चुका नाही सांगितल्या तर उदया घर कसं सांभाळणार ती.


  प्राजक्ता म्हणाली, असुदेत बाबा, आई काहीचं चुकीचं सांगत नाही आहेत, मी हळूहळू शिकेन सगळं.


       दिवस जातं होते, प्राजक्ता घरातल्या प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन सगळं करत होती.
सासर्यांना कमी साखरेचा चहा,
आजींना वेळेवर औषधं देणे,
प्रथमेशला टिफिनला रोज वेगळी भाजी,


पण सासूबाईंचा स्वभाव काही केल्या बदलत नव्हता हे असंच कर, ते तसंचं कर, तूझ्या माहेरी कसंहि चालत असेल पण इथे नाही असं रोज बोलतं असतं.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ज्या प्राजक्ताला सासूबाई सून म्हणून स्वीकारायला तयार नव्हत्या त्याचं प्राजक्तानें कालांतराने पडत्या काळात घर कसं सावरलं..)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →