इंटरनेटचा तो आभासी प्रकाश विझला होता आणि एका छोट्या मेणबत्तीने त्यांच्या आयुष्यातील खऱ्या संघर्षावर प्रकाश टाकण्यास सुरुवात केली होती.
पुढे....
भाग 3
डायनिंग टेबलवर ठेवलेली मेणबत्तीची ज्योत शांतपणे थरथरत होती. चोविसाव्या मजल्यावर पसरलेल्या त्या अथांग काळोखात तो छोटासा प्रकाशच आता एकमेव आधार होता.
अविनाश आणि मेघा अस्वस्थपणे खुर्चीवर बसले होते. मोबाईलचे नेटवर्क नसल्यामुळे त्यांचे हात सारखे खिशाकडे जायचे आणि रिकामे परत यायचे. गॅजेट्सशिवाय शांत बसण्याची ही सवय सुटल्यामुळे त्यांना तो काळोख कोंडल्यासारखा वाटत होता.
तेवढ्यात आरव तिथे आला. नेहमी हातात आयपॅड किंवा कानात एअरपॉड्स असणारा आरव आज अगदी रिकामा होता. त्याने हळूच मेघाच्या कुशीत डोकं ठेवलं.
मेघाने नकळत आरवच्या केसांवरून हात फिरवला. कितीतरी महिन्यांनी तिने आपल्या मुलाला अस जवळ घेतला होता.
आरव, भीती वाटतेय का रे बाळा?" अविनाशने अंधारात आरवचा चेहरा शोधत विचारलं."नाही बाबा, आज अजिबात भीती नाही वाटत. उलट खूप छान वाटतंय," आरव मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहत म्हणाला."छान वाटतंय? अरे, घरात एसी बंद आहे, वायफाय नाही, एवढा अंधार आहे... यात काय छान आहे?"
मेघाने आश्चर्याने विचारलं. आरवने मेघाकडे पाहिलं आणि त्याचे डोळे भरून आले. तो म्हणाला, "कारण आज लॅपटॉप बंद आहेत आई. आज तुमचे डोळे फोनच्या स्क्रीनकडे नाही, तर माझ्याकडे बघतायत. आज तुमच्या कानात कोणाचे कॉल्स नाहीत, त्यामुळे तुम्ही माझं बोलणं ऐकू शकताय.
मला हा अंधार खूप आवडलाय, कारण या अंधारामुळे का होईना, तुम्ही दोघं माझ्या शेजारी बसलात."आरवचे हे साधे शब्द त्या शांत खोलीत एखाद्या बॉम्बसारखे कडाडले.
अविनाश आणि मेघाच्या काळजाचा ठोका चुकला.
आरव... आम्ही हे सगळं तुझ्यासाठीच तर करतो ना राजा," अविनाशचा आवाज जड झाला. "तुला जगातलं सगळ्यात चांगलं शिक्षण मिळावं, तुला हवी ती वस्तू एका क्लिकवर मिळावी, म्हणूनच तर आम्ही रात्रंदिवस एवढी मेहनत करतो.
आरव... आम्ही हे सगळं तुझ्यासाठीच तर करतो ना राजा," अविनाशचा आवाज जड झाला. "तुला जगातलं सगळ्यात चांगलं शिक्षण मिळावं, तुला हवी ती वस्तू एका क्लिकवर मिळावी, म्हणूनच तर आम्ही रात्रंदिवस एवढी मेहनत करतो.
आरवने टेबलवर ठेवलेल्या त्याच्या नवीन आयफोन १६ प्रो कडे पाहिले आणि म्हणाला, "बाबा, मला हा महागडा फोन नकोय. मला शाळेत डबा देताना आयफोन नाही,
तर आईच्या हाताची पोळी-भाजी हवी असते.
शनिवार-रविवार मला मॉलमध्ये नेण्यापेक्षा, तुम्ही माझ्यासोबत खाली बागेत येऊन फुटबॉल खेळावं असं वाटतं.
शनिवार-रविवार मला मॉलमध्ये नेण्यापेक्षा, तुम्ही माझ्यासोबत खाली बागेत येऊन फुटबॉल खेळावं असं वाटतं.
रात्री झोपताना मला अलेक्सावर गाणी नको असतात बाबा, आईने जवळ घेऊन एखादी गोष्ट सांगावी अस वाटत.
Stay tuned....
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
