सुखवस्तु भाग अंतिम

तुम्ही मला खूप साऱ्या वस्तू दिल्या, पण तुमची 'वेळ' कधीच दिली नाही. मी खूप एकटा पडलोय बाबा.. आणि आरव शांत झाला त्याचा शांत दुःखी झालेला चेहरा प्रकाशात चमकत होता.
आरवने टेबलवर ठेवलेल्या त्याच्या नवीन आयफोन १६ प्रो कडे पाहिले आणि म्हणाला, "बाबा, मला हा महागडा फोन नकोय. मला शाळेत डबा देताना आयफोन नाही, तर आईच्या हाताची पोळी-भाजी हवी असते. शनिवार-रविवार मला मॉलमध्ये नेण्यापेक्षा, तुम्ही माझ्यासोबत खाली बागेत येऊन फुटबॉल खेळावं असं वाटतं. रात्री झोपताना मला अलेक्सावर गाणी नको असतात बाबा, आईने जवळ घेऊन एखादी गोष्ट सांगावी असं वाटतं

पुढे...

भाग 4

तुम्ही मला खूप साऱ्या वस्तू दिल्या, पण तुमची 'वेळ' कधीच दिली नाही. मी खूप एकटा पडलोय बाबा.. आणि आरव शांत झाला त्याचा शांत दुःखी झालेला चेहरा प्रकाशात चमकत होता.

मेघाच्या डोळ्यातूनही घळाघळा पाणी वाहू लागलं. तिने आरवला घट्ट छातीशी कवटाळलं. अविनाशने आपले दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले.

शांताबाई लांब उभारून हे सर्व पाहत होत्या व देवाला प्रार्थना करत होत्या देवा आता तरी आरव ला काय हवं ते मिळूदे.

ज्या यशाच्या आणि श्रीमंतीच्या शिखरावर ते पोहोचले होते, ते शिखर किती पोकळ आणि बर्फासारखं थंड होतं, याची जाणीव त्यांना झाली होती. ते मुलाला 'सुखवस्तू' देत होते

पण त्या वस्तूंच्या मागे मुलाचं हसरं बालपण गुदमरून गेलं होतं. आपण संपूर्ण जगाशी जोडले गेलो, पण स्वतःच्या पोटच्या गोळ्यालाच हरवून बसलो, ही टोचणी त्यांच्या मनाला लागली.

अचानक, घराची बेल वाजली. शांताबाईंनी दरवाजा उघडला. सोसायटीचा इलेक्ट्रिशियन हातात टॉर्च घेऊन उभा होता.

"साहेब, वरच्या मुख्य लाईनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. पाच मिनिटांत वीज येईल," तो म्हणाला.इलेक्ट्रिशियन गेला. पाच मिनिटांनी 'टक्क' करून वीज परत आली. संपूर्ण स्काय व्हिला पुन्हा एकदा पांढऱ्याशुभ्र कॉर्पोरेट लाईट्सने उजळून निघाला. अलेक्सा सुरू झाली, वायफाय कनेक्ट झाल्याचे मेसेज टोन वाजले, आणि अविनाश-मेघाचे मोबाईल्स ईमेलच्या नोटिफिकेशन्सनी व्हायब्रेट होऊ लागले.

अविनाशने आपल्या व्हायब्रेट होणाऱ्या फोनकडे पाहिले. सिंगापूरच्या फ्लाईटचे री-शेड्युलिंगचे मेसेजेस आले होते. मेघाच्या फोनवर तिच्या मॅनेजरचे तीन मिस्ड कॉल्स दिसत होते.

दोन्ही फोन जणू त्यांना पुन्हा एकदा त्याच यांत्रिक जगात ओढत होते. अविनाश उठला. त्याने शांतपणे आपला मोबाईल उचलला आणि तो थेट स्विच ऑफ करून टाकला.

मेघाने अविनाशकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार होता. तिनेही आपला लॅपटॉप बंद केला आणि तो बॅगेत कोबला.

अविनाश आरवजवळ गेला, त्याने आरवच्या चेहऱ्या वरून हात फिरवला आणि हसत विचारलं, "आरव, पुण्यात रात्रीचा पाऊस पडल्यावर गच्चीवरून शहर कसं दिसतं, बघायचं का तुला?

चल, आज आपण तिघं गच्चीवर जाऊया."आरवच्या चेहऱ्यावर जे हसू उमललं, ते जगातल्या कोणत्याही महागड्या गॅजेटपेक्षा सुंदर होतं. तिघंही हाताला हात धरून बाहेर पडले.

मागे डायनिंग टेबलवर ती मेणबत्ती आता पूर्ण विझली होती,
आणि शांताबाई समाधानाने त्या तिघांकडे बगत होत्या.

कारण घराला प्रकाश देण्यासाठी आता गॅजेट्सच्या कृत्रिम प्रकाशाची नाही, तर नात्यांमधील जिवंत संवादाची व एकमेकांना वेळ देण्याची गरज होती. 'सुखवस्तू' घरात आता खऱ्या सुखाने प्रवेश केला होता.

समाप्त.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →