ईरा शाॅर्ट फिल्म स्पर्धा - जुलै:-२०२६
शीर्षक:- सुख
दृश्य:-१
ठिकाण:- अंशुमनचे घर
प्रियल तिची मुलगी स्पृहला खूप दिवसांनी तिच्या घरी भेटायला येते. प्रियलला पाहून स्पृहा बिलगून रडू लागते.
स्पृहा:-(मुसमुसत) मम्मा, तू आता पुन्हा मला सोडून जाणार तर नाहीस ना गं? आय मिस यू सो, मच मम्मा ॲण्ड आय लव्ह यू सो मच!
प्रियल:-(तिला कडेवर उचलून घेत पटापट मुके घेत हुंदके देत) आय मिस यू सो मच ॲण्ड आय अल्सो लव्ह यू टू मच, माय शोना! आता मी तुला सोडून कोठेही जाणार नाही, बाळा.
स्पृहा:- (खूश होऊन तिच्या गालाची पापी घेत तिचा तळहात पुढे करत) प्राॅमिस ना, मम्मा!
प्रियल:-(तिच्या हातावर हात ठेवत हसून) येस डियर, पक्का प्राॅमिस!
मायलेकींचा तो मिलाप इतक्या वेळ डोळ्यांत पाणी आणत शांतपणे पाहत उभारलेला अंशुमन धावत पुढे येतो आणि त्या दोघींना कवेत घेऊन रडू लागतो.
अंशुमन:-(रडत) आय एम सॉरी, पियू. मी चुकलो. पैसा म्हणजे सगळं काही असतो,असा माझा गैरसमज झाला होता. पैशाच्या मागे धावताना मी माझंच सुख हरवून बसलो. तुझं प्रेम, स्पृहाचं बालपण... सगळंच गमावल मीं. मोठ्या तोऱ्यात मी म्हणालो होतो की मला तुझी गरज नाही म्हणून. पैशांच्या धुंदीत आंधळा झालो होतो गं मी. गर्वाने तुला नको ते बोललो. स्पृहालाही तुझ्यापासून तोडले. मी तुझा गुन्हेगार आहे, पियू.
प्रियल:-(त्याच्या पाठीवरून हात फिरवत) अंशु, सांभाळा स्वतःला. चूक तुमच्या एकट्याची नव्हती, माझीही होतीच की. तुम्ही जा म्हणालात आणि मीही कोणताही विचार न करता निघून गेले. आपल्या पिल्लूचाही विचार केला नाही मी.
अंशुमन:-(तिला अडवत, तिच्या तोंडावर बोट ठेवत) शूऽऽ...थांब, पियू...मला बोलू दे. बरं झालं तू निघून गेलीस. तेव्हाच मला कळलं सुख म्हणजे काय असतं? तुझ्या प्रेमाची किंमत मी पैशात तोललो जे चुकीचे होते. मी तुला अडवलही नाही. खूप घमंडीने वागलो. आता समजलं मला की मी आणि आपलं पिल्लू तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी पुन्हा एकदा तुझी माफी मागतो आणि विनवणी करतो की आपण पुन्हा एकत्र राहू या, पूर्वीसारखे!
प्रियल स्पृहाला खाली उतवरते आणि अंशुमनचे जोडलेले हात खाली करते.
प्रियल:-(त्याचे डोळे पुसत हळव्या स्वरात)
अहो, अंशु असे काय करताय, तुम्ही माफी मागू नका. अहो, पैसा महत्वाचा असतो; पण तो सगळं काही नसतो. घर मोठं असलं म्हणून सुख मोठं होत नाही; घरातली माणसं सोबत असली की घर स्वर्ग होतं. खरं सुख आपल्या माणसांत, त्यांच्या प्रेमात आणि काळजी घेण्यात असतं. हे आता कळलं ना तुम्हाला? झालं तर मग! आणि हो, राहू या आपण एकत्र!
अहो, अंशु असे काय करताय, तुम्ही माफी मागू नका. अहो, पैसा महत्वाचा असतो; पण तो सगळं काही नसतो. घर मोठं असलं म्हणून सुख मोठं होत नाही; घरातली माणसं सोबत असली की घर स्वर्ग होतं. खरं सुख आपल्या माणसांत, त्यांच्या प्रेमात आणि काळजी घेण्यात असतं. हे आता कळलं ना तुम्हाला? झालं तर मग! आणि हो, राहू या आपण एकत्र!
अंशुमन प्रेमाने तिला मिठी मारतो.
अंशुमन:-(तिचा हात घेऊन कपाळावर लावत) थॅंक्यू सो मच, पियू. इथून पुढे तुम्ही दोघीही माझी फर्स्ट प्रायोरिटी असणार, मग बाकीचे.
स्पृहा:-(कमरेवर हात ठेवत, लाडीक स्वरात) मम्मा, पप्पा मीही आहे इथे. मला घ्या ना.
दोघेही हसून तिला गणपतीसारखं दोन्ही बाजूंनी उचलून घेतात. ती दोघांच्या गळ्यात हात टाकून आळीपाळीने त्यांच्या गालावर पप्पी देते.
बॅकग्राऊंडला गाणं वाजत..
ये दिल आया हैं बहार,
ख़ुशी का खुमार क्या कहना
खिली खिली खुशियों से आज
घर है हैं मेरा गुलेगुलजार ...
ख़ुशी का खुमार क्या कहना
खिली खिली खुशियों से आज
घर है हैं मेरा गुलेगुलजार ...
समाप्त-
वेळीच चूक मान्य करून माफी मागितली, तर नाती पुन्हा फुलू शकतात. कारण खरं सुख पैशात नाही, तर आपल्या माणसांच्या प्रेमात आणि सोबतीत असतं.
