ती एक सामान्य स्त्री आहे...
वय चाळीशी जवळ आलंय..
मुलांची तिच्यावरची डिपेंडन्सी कमी होतं चाललीये..
नवरा आता कंपनी मध्ये हायर पोस्ट ला गेल्याने जरा जास्तचं बिझी झालाय... त्याच आपलं चांगल चाललंय.. रोज ऑफिस चं काम करायचं.. घरी यायचं.. जिम /टेबल टेनिस / बॅडमिंटन असे खेळायचं.. जेवायचं आणि झोपायचं... नाही म्हणायला तो प्रत्येक वीकएंड ला सगल्याना बाहेर फिरायला घेऊन जातो...
असं पाहता वर वर सुखी कुटुंब...!
तरीही अस्वस्थ... सदा विचारात..
एकतर खूप चीड चीड करते... किंवा काहीच न बोलता दिवसभर मोबाईल बघत बसते...
कधी कधी छान मेकअप करून तयार होते.. कधी कधी तर घरच्या कपड्यात पण बाहेर जायला तयार असते...
कधी कधी घरं एकदम चकाचक ठेवते.. तर कधी सगळ्या घरात तसाच पसारा पडू देते...
एखादा आठवडा फुल व्यायाम.. डाएट.. सगळे 100%.. पुढचा आठवडा अक्खा लोळत घालवते...
कधी कधी तिला वाटते किती नशीबवान मी असला नवरा मला मिळालाय.. तर कधी कधी तिला त्याचा जीव घायची इच्छा होते...
अशी ही.. काय चाललंय तिचं तिलाच कळत नाही...
इतरच्या दृष्टीने सगळंच तर चांगल आहे...
पैसा, घर, गाडी, सोनं नाणं, हुशार मुलं.. प्रेम करणारा नवरा.. अगदी दृष्ट लागण्या सारखं...
नातेवाईक /मित्र मैत्रीण च्या नुसार हिला सुख टोचतंय..
पण तिला खरंच काय बोचतंय?
तर तिला सतत गृहीत धरणं!
नवरा तिला सर्व देतो.. पण वेळ देत नाही.. संवाद नाही.. भर भरून बोलत नाही.. त्याला वाटत हिला पैसे देतोय.. फिरायला नेतोय बास की अजून काय हवंय हिला...
लहानपणापासून हिने सवय लावली सगळे जागच्या जागेवर द्यायची... म्हणेल ते खाऊ बनवून द्यायची... पाहिजे ते घेऊन द्यायची... आता त्यांना वाटते हिच ते कामचं आहे... तिने थोडं नाही म्हंटल की ती चांगली आई नाही... ती अपडेट नाही.. तिला साध्या काय चाललंय माहित नाही... ती इतर आयासारखी ऑफिस ला जात नाही... अजून किती काय...
मैत्रिणी ला वाटत हिच्या कडे सगळं तर आहे... ही उगाच बाऊ करून घेते...तिला सांगतात किट्टी जॉईन कर.. फिरायला जा... गॉसिप कर...
हिला त्यातलं काहीच आवडत नाही...
नां गॉसिप करायचं... नां कुठली किट्टी बिट्टी...
तिला हवंय तरी काय मग...?
तिला हवाय..
मुलां कडून आदर..
स्वतः ची ओळख..
आणि...
स्वतः ची ओळख..
आणि...
एखाद्या महागड्या वस्तू पेक्षा "तू माझ्या साठी खूप महत्वाची आहेस " बास फक्त हे एक वाक्य... साथीदारा कडून...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
