Login

अशी नणंद हवी गं बाई भाग -2

कौटुंबिक
भाग -2

" ताई.... " मधुरा ताई ला पाहुन खुश होते, इतकी की तिच्या चेहऱ्यावर ती लता ला दिसत होती.

मधुरा चांगल्या स्वागताने लता ला आत घेते.

समोरच मदन उभा असतो, लता त्याला पाहुन खुश होते आणी घट्ट मिठी मारते.

पण त्याला मिठी मारताच त्याच्या डोळ्यांतुन पाणी येतं. तो लपुन लगेच डोळे फुसतो.

" दमली असशील ना..? बसं तु आरामात.. " मदन चा आवाज ऐकुन लता जरा घाबरते.

" काय रे बाबु, ठीक आहेस ना..? " लता काळजीने विचारते.

" अगं हो ठीक आहे की, तु बस ना... " मदन तिच्या पासुन नजर चोरत होता.

" अगं मधु किती वेळ पाणी आण की लवकर, ताई दमून आली आहे." तो मधुला आत आवाज देतो.

" अहो हो...हो...आणते की.. " आणि मधु पाण्याने भरलेले ग्लास एका ट्रे मध्ये घेऊन बाहेर येते. आणि लताच्या हातात देते.

"अगं हे काय..? थंड पाणी नाही...? फ्रिज बिघडला आहे का..?" असं बोलुन लता पाण्याचा घोट घेते.

" अगं ते... " मदन चे शब्द तोंडातून बाहेर यायला जणु तयारच नसतात.

तेवढ्यात मधुरा चटकन बोलते, " अगं ताई ते फ्रिज बिघडलाय.. त्याचा गॅस गेला आहे.. पण होईल लवकरच ठीक... " असं बोलुन ती विषय सावरते.

" बरं...बरं..." लता ही हलक्यात घेते.

बराच वेळ त्या तिघांच्या गप्पा गोष्टी होतात, जेवणाची वेळ होते.
मधुरा छान जेवण बनवून, लता च्या समोर ठेवते.

" हे काय मदन, मला वाटलं की तु माझ्या आवडीचं जेवण करशील...? तुला माहित आहे मला मच्ची किती आवडते..? मग ती का नाही आणलीस..? " लता पुढ्यात आलेलं जेवण पाहुन मदन ला प्रश्न करते.

हे ऐकताच मदनचा चेहरा पडतो.

" अरे... किती चेहरा पडलास तोह.. मी मस्करी केली.. खाते मी....तु चेहरा पाडू नकॊस.. " आणि लता हसु लागते.

तेवढ्यात दारावर पुन्हा बेल वाजते, "आता कोण आलं असेल..?" मदन बोलतो.

" अरे मग उठून बघ की.. " लता ताई बोलतात.
त्यांना मदन ची होणारी घालमेल दिसत होती. पण नक्की काय हेच कळतं नव्हतं, मदन का असा वागत होता...?

मदन दार खोलतो, " तुम्ही...? अहो... "

" अहो कोण आहे...? " मधुरा विचारते.

" ते.... ते... " मदन घाबरत घाबरत.

लता ताई मधुराकडे पाहते..

" हरीभाऊ आहेत.." मदन बोलतो.

" हरिभाऊ... हरिभाऊ आता ह्या वेळेला ..? " मधुरा स्वतःशीच पुटपुटते... आणि तडक दारापाशी जाते.


क्रमश...
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →