ह्या क्षितिजाच्या किरणांवरती यश स्वार होऊनी यावे,
आपल्या प्रतिभेचे तेजोमय वलय अवघ्या जगाने पहावे.
आपल्या प्रतिभेचे तेजोमय वलय अवघ्या जगाने पहावे.
तिमीरास छेदून आशेचा प्रकाश ह्या जीवनात पडावा,
नवयुगाचा युगंधर तो मानव येथे घडावा.
नवयुगाचा युगंधर तो मानव येथे घडावा.
डोळे उघडे ठेवूनी स्वप्न भविष्याचे पहावे,
त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी सतत झटत रहावे.
त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी सतत झटत रहावे.
अपयशाच्या छाताडात कष्टाची समशीर म्हणजे वीरता,
यशाचा मार्ग म्हणजे प्रयत्न करणे न हरता.
यशाचा मार्ग म्हणजे प्रयत्न करणे न हरता.
खेकडारूपी निंदकांची नांगी तुम्ही ठेचा,
अनुभवाच्या पुस्तकातून संघर्षाचे धडे वाचा.
अनुभवाच्या पुस्तकातून संघर्षाचे धडे वाचा.
अपयशा शिवाय यशाचे मुकूट माथी जडत नाही,
मृत्यूचा सामना केल्याशिवाय दिग्विजयी सम्राट घडत नाही.
मृत्यूचा सामना केल्याशिवाय दिग्विजयी सम्राट घडत नाही.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने