' पन्नास रुपयाची गोष्ट'
ही ईरा ब्लॉगिंग निर्मित पहिली शॉर्ट फिल्म आहे आणि ती मी पाहिली. मला खूप आवडली. विषय खूप छान आहे.
ईराचा या क्षेत्रातील हा पहिलाच प्रयत्न! आदरणीय संजना मॅडम यांनी लिहिलेल्या कथेतून ही शॉर्ट फिल्म चित्रीत झाली आहे. कथा खूप छान आहे आणि प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे. मोजक्या शब्दांतून खूप मोठा अर्थ या कथेतून सांगितला आहे. कोणाला छोटीशी रक्कम कॅशने देण्यास किती प्रॉब्लेम होतो? हे यातून दिसून येते. मोठ्या पॅकेजची नोकरी करणारी या कथेतील सूनबाई आपल्या सासुबाईकडून घेतलेलेेे पन्नास रुपये देऊ शकत नाही. तिच्याकडे कॅश नसते. एटीएम मधून काढू शकत नाही. कारण एटीएम मधून पन्नास रुपये येत नाही. त्यामुळे तिला आपल्या मैत्रिणीकडून पन्नास रुपये घ्यावे लागतात. फळे घेण्यासाठी तिनेआपल्या सासूबाईंकडूनी पन्नास रुपये घेतले होते आणि ते पन्नास रूपयेेे आता तिच्याकडे त्या एकसारख्या मागत आहेत. हे सर्व तिला आपल्या मैत्रिणीला त्यामुळे सांगावे लागले. 'आपण सासूबाईंना दर महिन्याला पैसे देत राहतो. घरात पैसे व इतर गोष्टींची काही कमी नाही. तरी सासूबाई पन्नास रुपये का मागत आहे?' हा प्रश्न सुनबाईच्या मनात येत होता आणि याचे उत्तर तिला सासूबाईंनी दिले, जेव्हा तिने पन्नास रुपयाची नोट त्यांना दिली व त्या का मागत होत्या? याचे कारण तिने त्यांना विचारले. तेव्हा त्या मागचे कारण ऐकून तिला खूप वाईट वाटले. सासूबाईंच्या वडिलांनी आपल्या मित्राला त्याच्या अडचणीत पन्नास रुपयाची नोट देऊन मदत केली; पण त्याने त्या दिलेल्या मुदतीत ती रक्कम परत दिली नाही,त्यामुळे वडिलांना खूप टेन्शन आले. आपल्या गरजेच्या वेळी आपल्याजवळ आपले पैसे नाहीत याचे त्यांना वाईट वाटले. आपण समोरच्याला त्याच्या अडचणीत मदत केली तर त्याने आपली अडचण ओळखून आपले पैसे परत करायला हवेत ना? असे नाही झाले तर आपणच किती अडचणीत येतो? याचा ते अनुभव घेत होते. अशा कठीण परिस्थितीत आपल्या नातेवाईकांकडून त्यांना पैशाची मदत झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नीचे बाळंतपण सुखरूप झाले. याचा त्यांना आनंद झाला. हे सर्व कथेतील सासूबाईंनी लहानपणी पाहिले होते व ती गोष्ट त्यांच्या कायम लक्षात राहिली आणि त्यामुळेच त्या आपल्या सुनेशी अशा वागल्या होत्या.
कथेतील सासूबाई अशा पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे,ज्यांनी पैशाचे महत्व काय आहे? हे जाणले होते. अनुभवले होते. मोठी रक्कम तर दूरच पण छोट्या रकमेसाठीही किती संघर्ष करावा लागतो? हे त्यांनी पाहिले होते. पैसा कमवताना खूप कष्ट होतात; म्हणून ते योग्य ठिकाणी व विचार करून खर्च करावा म्हणजे भविष्यात कधी काही प्रॉब्लेम आला तर कमवलेला व बचत केलेला पैसा उपयोगी पडतो आणि पैसा हा फक्त गरजेच्या वस्तूंसाठीच खर्च करण्याचे साधन आहे. असे त्यांचे मत होते. चैनीच्या वस्तू खरेदी करणे,अवाजवी पैसा खर्च करणे व कर्ज काढून मौजमजा करणे. या गोष्टी त्यांना पटत नव्हत्या.
तर सुनबाई आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. मोठे पॅकेजची नोकरी करणारी, चांगली राहणीमानाची आवड असणारी, डिजिटल युगात वावरणारी, खर्च करण्यासाठीच तर कमवतो ना! अशी विचारसरणी असणारी. ती मोठ्या रकमेच्या व्यवहार करणारी असल्याने तिला सासूबाईंनी तिच्याकडे पन्नास रुपयांची क्षुल्लक रक्कम का मागावी? याचे आश्चर्य वाटले. पण तिला सासूबाईकडून त्यामागचे कारण कळले.
तर सुनबाई आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. मोठे पॅकेजची नोकरी करणारी, चांगली राहणीमानाची आवड असणारी, डिजिटल युगात वावरणारी, खर्च करण्यासाठीच तर कमवतो ना! अशी विचारसरणी असणारी. ती मोठ्या रकमेच्या व्यवहार करणारी असल्याने तिला सासूबाईंनी तिच्याकडे पन्नास रुपयांची क्षुल्लक रक्कम का मागावी? याचे आश्चर्य वाटले. पण तिला सासूबाईकडून त्यामागचे कारण कळले.
आणि 'या पिढीतील लोकांनी आपल्यासाठी केलेला संघर्ष, पैशांचे महत्व काय असते?'
असा सर्व विचार करून ती भावनिक झाली.
असा सर्व विचार करून ती भावनिक झाली.
कथा खूप छान आहे आणि तितक्याच प्रभावीपणे ती सादर करण्यात आली आहे. त्यामुळे ती अजून मनाला स्पर्श करून गेली. सर्वांचा अभिनय खूप छान झाला आहे. उत्तम सादरीकरण झाले आहे. संजना मॅडम व सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
