Login

स्फूर्ती

जिद्द डोंगराएवढी

"स्फूर्ती "

तिच्या नावाची घोषणा केली गेली.आणि ती स्थानापन्न झालेल्या खुर्चीवरून थाठ मानेने उभी राहिली. गोल्डन कलरची लाल काठ पदराची साडी तिच्या गोऱ्यापान अंगावर उठून दिसत होती. काळे पाणीदार डोळे, आणि कोरीव भुवयांच्या मधोमध लावलेली लाल छोटी टिकली तिचं सौंदर्य अजून खुलवत होती. एका हातात कडे, दुसऱ्या हातात वॉच आणि डाव्या हाताच्या दोन्ही बोटात असलेल्या नाजूक नक्षीकाम केलेल्या अंगठ्या तिच्या हाताच्या नाजूक बोटांचे सौंदर्य जगासमोर मांडत होते…बोटांच्या नखांना लावलेली लाल नेलपेंट एक वेगळाच रुबाब दाखवत होती.

स्टेजवर मान्यवरांची ओळख करून देणारे निवेदक बोलत होते..

“उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर कवी कवयित्री महोदय आज आपल्यासमोर येत आहेत प्राख्यात लेखिका,कवयित्री, नाटककार, भयकथाकार, आणि स्फुर्ती या बहुचर्चित कादंबरीच्या लेखिका साऊ

एवढ्या मोठया लेखिकेचे नाव उच्चारताच एकच गोंधळ उडाला. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचीचं साऊला पाहण्यासाठी झुंबड उडाली. अन् ती क्षणभर भारावून गेली. स्फुर्ती या कादंबरीने तिला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन सोडले होते. अन् आज ती साहित्यातील एक आघाडीची प्रसिद्ध लेखिका म्हणून नावाला आली होती. एवढं भरघोस यश मिळवून देणारी तिची ही कांदबरी म्हणजे तिच्या उभ्या आयुष्याचा प्रवास होता.

ती आपल्या साडीचा पदर सावरत हळूच स्टेजवर आली. ती स्टेजवर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर तिच्यासाठीचां आदर स्पष्ट दिसत होता. कारण तिने स्फुर्ती कांदबरी इतकी सुंदर लिहिली की वाचताना वाचक अगदी मंत्रमुग्ध होऊन जात.

तिने माईक हाती घेतला आणि बोलू लागली.

“ नमस्कार…” ती काय बोलते याकडे सर्वांचे कान टवकारले गेले.

“आज माझ्या लोकप्रिय कादंबरीची तिसरी आर्वृत्ती प्रकाशित होत आहे. अतिशय लोकप्रिय झालेल्या या कांदबरीने प्रत्येक वाचकाच्या मनात स्थान मिळवलं आहे. तुम्ही देत प्रतिसादाबद्दल मी तुमची आजन्म ऋणी आहे. जसे तुम्ही माझ्या आगामी आर्वृत्तीना प्रेम दिलंय तसेच याही आर्वृत्तिला प्रेम द्याल अशी मी आशा करते..” तीने प्रामाणिक पणे सर्वांना हात जोडून अभिवादन केलं.

“ मॅडम, एक प्रश्न विचारू का?” एका रिपोर्टर ने प्रश्न केला.

“ हो, विचारा ना.”

“ तुम्ही लिहिलेल्या या सुंदर कादंबरी बद्दल थोडक्यात काय सांगाल?”

“ही फक्त एक कादंबरी नाही…माझा जीवनप्रवास आहे. माझं आयुष्य आहे. यात माझ्या जीवनप्रवासाचा मी प्रत्येक क्षण नमूद केलाय..”

“ हे तुमचं आत्मचरित्र आहे ?” रिपोर्टर बोलला.

“होय हे माझं आत्मचरित्र आहे. माझा खरा खुरा जीवनप्रवास अगदी तुमच्यासमोर हुबेहूब मांडला आहे.”

“ मॅडम, तुम्हाला ऐकू येत नसतानाही तुम्ही साहित्यक्षेत्रात घवघवीत यश मिळवून इतरांना प्रेरणा देत आहात त्याबद्दल काय सांगाल?”

“हो बरोबर आहे…मी ऐकू शकत नव्हते. मी पुन्हा ऐकू शकेन अशी आशा मला अजिबात नव्हती. पण म्हणतात ना प्रत्येक चांगल्या गोष्टीची वेळ योग्य टप्प्यावरच येत असते. असच काहीसं माझंही आहे. आणि मी माझ्या या कादंबरीत एक कीवंडी ते उत्कृष्ट लेखिकेपर्यंतचा प्रवास शब्दबध्द केलेला आहे.”

“तुमच्या साऱ्या कथा या काल्पनिक आहेत की वास्तवाशी मिळत्या जुळत्या आहेत?”

“ जगात घडणाऱ्या घटना मांडताना त्या घटनाशी साध्यर्म साधून कसं चालेल? पण आपण त्याचे स्वरूप मांडू शकतो तेही आपल्या परीने. मी आतापर्यंत लिहिलेल्या काही कथा या काल्पनिक आहेत. त्याचा वास्तवाशी कोणताच संबंध नाही..”

“तुमच्या लेखनाचं वैशिष्ट काय आहे?”

“ शिकून सारेच साक्षर होतात.. पण नुसता साक्षर होऊन कसे चालेल? आपण शिकलेल्या विद्येचा काहीतरी उपयोग व्हायला हवा नाही का? फक्त शिकून सोडून न देता आपल्याकडचे द्यान पुढच्या पिढीने घ्यावं आणि ते त्यांच्याकडून तिसऱ्या पिढीने घ्यावं असं पिढ्यानपिढ्या द्यान वाटण्याची परंपरा आपणच आपल्या पुढाकाराने सुरूवात करायला हवी. आणि म्हणूनच आपण साहित्य क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून आपल्या“स्फूर्ती ”

तिच्या नावाची घोषणा केली गेली.आणि ती स्थानापन्न झालेल्या खुर्चीवरून थाठ मानेने उभी राहिली. गोल्डन कलरची लाल काठ पदराची साडी तिच्या गोऱ्यापान अंगावर उठून दिसत होती. काळे पाणीदार डोळे, आणि कोरीव भुवयांच्या मधोमध लावलेली लाल छोटी टिकली तिचं सौंदर्य अजून खुलवत होती. एका हातात कडे, दुसऱ्या हातात वॉच आणि डाव्या हाताच्या दोन्ही बोटात असलेल्या नाजूक नक्षीकाम केलेल्या अंगठ्या तिच्या हाताच्या नाजूक बोटांचे सौंदर्य जगासमोर मांडत होते…बोटांच्या नखांना लावलेली लाल नेलपेंट एक वेगळाच रुबाब दाखवत होती.

स्टेजवर मान्यवरांची ओळख करून देणारे निवेदक बोलत होते..

“उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर कवी कवयित्री महोदय आज आपल्यासमोर येत आहेत प्राख्यात लेखिका,कवयित्री, नाटककार, भयकथाकार, आणि स्फुर्ती या बहुचर्चित कादंबरीच्या लेखिका साऊ

एवढ्या मोठया लेखिकेचे नाव उच्चारताच एकच गोंधळ उडाला. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचीचं साऊला पाहण्यासाठी झुंबड उडाली. अन् ती क्षणभर भारावून गेली. स्फुर्ती या कादंबरीने तिला रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन सोडले होते. अन् आज ती साहित्यातील एक आघाडीची प्रसिद्ध लेखिका म्हणून नावाला आली होती. एवढं भरघोस यश मिळवून देणारी तिची ही कांदबरी म्हणजे तिच्या उभ्या आयुष्याचा प्रवास होता.

ती आपल्या साडीचा पदर सावरत हळूच स्टेजवर आली. ती स्टेजवर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर तिच्यासाठीचां आदर स्पष्ट दिसत होता. कारण तिने स्फूर्ती कांदबरी इतकी सुंदर लिहिली की वाचताना वाचक अगदी मंत्रमुग्ध होऊन जात.

तिने माईक हाती घेतला आणि बोलू लागली.

“ नमस्कार…” ती काय बोलते याकडे सर्वांचे कान टवकारले गेले.

“आज माझ्या लोकप्रिय कादंबरीची तिसरी आर्वृत्ती प्रकाशित होत आहे. अतिशय लोकप्रिय झालेल्या या कांदबरीने प्रत्येक वाचकाच्या मनात स्थान मिळवलं आहे. तुम्ही देत प्रतिसादाबद्दल मी तुमची आजन्म ऋणी आहे. जसे तुम्ही माझ्या आगामी आर्वृत्तीना प्रेम दिलंय तसेच याही आर्वृत्तिला प्रेम द्याल अशी मी आशा करते..” तीने प्रामाणिक पणे सर्वांना हात जोडून अभिवादन केलं.

“ मॅडम, एक प्रश्न विचारू का?” एका रिपोर्टर ने प्रश्न केला.

“ हो, विचारा ना.”

“ तुम्ही लिहिलेल्या या सुंदर कादंबरी बद्दल थोडक्यात काय सांगाल?”

“ही फक्त एक कादंबरी नाही…माझा जीवनप्रवास आहे. माझं आयुष्य आहे. यात माझ्या जीवनप्रवासाचा मी प्रत्येक क्षण नमूद केलाय..”

“ हे तुमचं आत्मचरित्र आहे ?” रिपोर्टर बोलला.

“होय हे माझं आत्मचरित्र आहे. माझा खरा खुरा जीवनप्रवास अगदी तुमच्यासमोर हुबेहूब मांडला आहे.”

“ मॅडम, तुम्हाला ऐकू येत नसतानाही तुम्ही साहित्यक्षेत्रात घवघवीत यश मिळवून इतरांना प्रेरणा देत आहात त्याबद्दल काय सांगाल?”

“हो बरोबर आहे…मी ऐकू शकत नव्हते. मी पुन्हा ऐकू शकेन अशी आशा मला अजिबात नव्हती. पण म्हणतात ना प्रत्येक चांगल्या गोष्टीची वेळ योग्य टप्प्यावरच येत असते. असच काहीसं माझंही आहे. आणि मी माझ्या या कादंबरीत एक कीवंडी ते उत्कृष्ट लेखिकेपर्यंतचा प्रवास शब्दबध्द केलेला आहे.”

“तुमच्या साऱ्या कथा या काल्पनिक आहेत की वास्तवाशी मिळत्या जुळत्या आहेत?”

“ जगात घडणाऱ्या घटना मांडताना त्या घटनाशी साध्यर्म साधून कसं चालेल? पण आपण त्याचे स्वरूप मांडू शकतो तेही आपल्या परीने. मी आतापर्यंत लिहिलेल्या काही कथा या काल्पनिक आहेत. त्याचा वास्तवाशी कोणताच संबंध नाही..”

“तुमच्या लेखनाचं वैशिष्ट काय आहे?”

“ शिकून सारेच साक्षर होतात.. पण नुसता साक्षर होऊन कसे चालेल? आपण शिकलेल्या विद्येचा काहीतरी उपयोग व्हायला हवा नाही का? फक्त शिकून सोडून न देता आपल्याकडचे द्यान पुढच्या पिढीने घ्यावं आणि ते त्यांच्याकडून तिसऱ्या पिढीने घ्यावं असं पिढ्यानपिढ्या द्यान वाटण्याची परंपरा आपणच आपल्या पुढाकाराने सुरूवात करायला हवी. आणि म्हणूनच आपण साहित्य क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून आपल्या साहित्याला लोकप्रियता मिळवून द्यायला हवी. फक्त लोकप्रियता न मिळवता ते साहित्य तळा गाळातील वाचकांपर्यंत पोहचवायला हवं. म्हणूनच मी या साहित्यविश्र्वात माझे पाय रोवले. माझ्याकडे असलेली लेखन प्रतिभा इतरांनी वाचावी त्यातून त्यांनीही बोध घ्यावे आणि बोध घेतलेल्या विचारातून त्यांनीही नवीन विचार जन्मास घालावे. लेखन म्हटल की माणसाचं आयुष्य व्यतीत करावं लागतं. माणसाचे सुख, दुःख मांडावे लागते. त्याच्या आयुष्यातल्या अनेक संघर्षमय व्यथा समाजासमोर मांडव्या लागतात. आणि मी हेच करते. बाकीच्या साहित्याचे आशय,विषय काय हे मला माहीत नाही. पण मी मात्र प्रत्येक व्यक्तीच्या मनातल्या भावना, त्यांचे विचार, त्यांचे सुख दुःख सारे काही मांडू लागते. आणि हेच प्रत्येकाला भावते. पण जे लिहिते ते मनापासून असतं. कोणाच्याही लेखनाचा सारांश मला माझ्या साहित्यात मांडायला आवडत नाही. जे लिहिणार ते स्वतः जन्म दिलेले शब्द असावेत.”

“किती छान शब्दात व्यक्त होताय…तुमची शिक्षणावर खूप निष्ठा आहे. तुमच्या लेखी शिक्षणाचा आदर दिसून येतो…तुम्हाला कोणत्या दैवी शक्तीचा आशिर्वाद आहे?”

“ दैवी शक्ती देणारी एकच स्री आहे. जिने पहिल्या लेकीला शिकवून साक्षर केलं. जिच्यामुळे आजच्या स्त्रिया शिकून सवरून साक्षर झाल्या…आपल्या पायावर भक्कम पने उभ्या राहिल्या. शिक्षणाच्या प्रवाहात वाहत त्या पोलिस, शिक्षिका, डॉक्टर, वकील, बिझनेसमन आदी पायऱ्या आपल्या कर्तुत्वाने गाजवू लागल्यात. जिच्यामुळे एक अबला स्री आजची सबला स्री होऊ शकली. जिच्यामुळे प्रत्येक स्त्री देशाच्या प्रत्येक पदावर दिमाखात आपले कर्तृत्व गाजवते आहे. आणि या सर्व स्त्रियांची माय सावित्रीबाई फुले आहेत. म्हणजेच साऊ!”

“ तुम्ही तुमचं नाव साउ का लावता?”

“ जिने शिक्षणाची दीक्षा दिली त्या माय माऊलीला विसरून कसं चालेल? जिने शिकून सवरून साक्षर केलं त्या साक्षरतेचे ऋण मी कशी विसरू? मी माझ्या प्रेतेक कवितेखाली साऊ लिहिते…माझे प्रत्येक लेखन साऊ या नावानेच परिपूर्ण होतं. या नावानेच मी माझ्या सावित्रीमाईला जिवंत ठेवते…कारण लेक आहे मी तिची…जान आहे मला तिने दिलेल्या शिक्षणाच्या निष्ठेची.”

आजपर्यंत अनेक स्त्रिया पाहिल्या…सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला, पुण्यतिथीला सावित्रीची लेक म्हणवून घेणाऱ्या त्यांची वेशभूषा करणाऱ्या अनेक स्त्रियांना पाहिलं पण हे दोन दिवस वगळता सावित्रीला मान दिलेला मी पाहिला नाही तुम्ही रोजच साऊ बनून माय सावित्रीला जपताय खूप खूप अभिमान वाटतो तुमचा…मॅडम तुमच्या स्फूर्ती र्ती कादंबरी बद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल… कुठे वाचता येईल?”

“ आजपासून ईरा वर माझी ही कादंबरी मी सुरू करतेय आपण नक्की वाचनाचा आस्वाद घ्यावा.."

_sauu

क्रमशः....

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →