Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 63

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 63

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

सोनल नाराज होती. ऋषीला ही ते समजलं होत. त्याने नेकलेस प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलं. आता पुढे...

सकाळी सोनल तयार होती. निळ्या रंगाच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. पण चेहर्‍यावर टेंशन होत. ती तीच आवरत होती. पुस्तक घेत होती.

आज ऋषी लवकर उठला होता. तो सोनल कडे बघत. "दोन मिनिट इकडे ये सोनल. मला तुझ्याशी बोलायचं आहे."

ती आली. तिच्याकडे लग्नातले दागिने होते. ते तिने समोर टेबल वर ठेवले.

"हे लग्नात मिळालेले दागिने. मी रागाने देत नाही. तुमच्या कपाटात ठेवा."

" तू अस का करतेस?" त्याने विचारलं.

"मला तुमचा राग आला नाहिये. पण मला ही जबाबदारी नको. माझ्याकडे काही नसलं म्हणजे मी काही हव असेल तर तुम्हाला विचारेल. तुम्ही बाबांसाठी खूप केल आहे. ते मी कायम लक्ष्यात ठेवेल. " सोनल म्हणाली.

"हे तुझ स्त्री धन आहे सोनल. प्लीज हे परत घे. मला आता कसतरी वाटत आहे. "

"नको अहो. मला हे पैसे, दागिने सोबत ठेवलेले आवडत नाही. त्यामुळे गोंधळ होतो. मी मंगळसूत्र वापरते आहे. तेच पुरे आहे. हे नेकलेस घालून कुठे जाणार नाही. " तिने स्वतः उठून दागिने त्याच्या कपाटात ठेवले.

"मी खाली आहे."

तो उठला. तिचा हात धरला. तिला जवळ ओढलं. मिठीत घेतलं.

दोघ काही म्हणत नव्हते.

" सगळे एकीकडे आपल्या मधे गैरसमज नको सोनल. तू माझ्यासाठी फार महत्वाची आहेस. मी आता या नात्या साठी तयार आहे. आता गडबड नको. काहीच मनात ठेवू नकोस. मला खूप मुश्किलीने हे आनंदाचे क्षण मिळाले आहेत. घरच्यांनाही तुझी गरज आहे. नाराज होवू नकोस. आपल्याला काही वाटल तर एकमेकांना विचारु शकतो ना? तसच काल सहज मी तुला विचारल. " ऋषी म्हणाला.

" हो मला समजलं. मी परत सांगते मला राग आला नाही. मला ही तुमच्या शिवाय कोणी नाही." ती अजून त्याच्या मिठीत शिरली.

"आज संध्याकाळी माझ्या सोबत डिनर साठी येशील? आपल्या बद्दल बोलायचं आहे. आपण ही एकमेकांना वेळ द्यायला हवा. "

ती हो म्हणाली. ती खाली आली. आर्या तयार होती. सोनलने तिचा डबा भरला.

" शाळेत छान लक्ष दे बेटा. चला पापी द्या. "

" मम्मी तू कुठे जाणार नाही ना?" तिने विचारलं.

"नाही मी तुला सांगितल्या शिवाय कुठे ही जाणार नाही. "

ती शाळेत गेली. ऋषी, राघव, पूनम नाश्ता करत होते. सोनलने घाईत खाल्लं. ती शाळेत आली. रस्त्यात सुभाषचा फोन येत होता. तिने घेतला नाही. लगेच तास सुरू झाला.

ऋषी ऑफिस मधे आला. मीटिंग झाली. काय कराव तो विचार करत होता . मनीष सोबत होता.

" काय झाल ऋषी काही प्रॉब्लेम?" त्याने विचारलं.

"मनीष अरे काही काही गोष्टी क्लीयर होत नाहीत. नुसते गैरसमज होतात."

" काय प्रॉब्लेम होत आहे. सोडवून बाजूला कर. त्यात अडकू नको. बाकीच्यांना महत्व देवू नकोस. तुम्ही दोघे छान एकत्र रहा." मनीष म्हणाला.

" हो तेच ना."

" आधीच तुझ लग्न उशिरा झालं आहे. टेंशन मधे वेळ घालवू नका ." मनीष म्हणाला.

ऋषी केबिन मधे आला. "संग्राम लग्नाच्या हॉल मधला सीसीटीव्ही फुटेज मला हवा आहे. "

थोड्या वेळाने फूटेज आलं.

" आत रूम मधलं फूटेज नाही साहेब. " संग्राम म्हणाला.

" ठीक आहे. या फुटेज वरून अंदाज बांधता येईल. "

ऋषी बघत होता. मामीने आधी नेकलेस घातला होता. त्यांनी आत जावून तो काढून ठेवला. लपवला. नंतर ती बाहेर आली. गोंधळ घातला. त्याला नक्की काय झालं ते समजलं.

सुरेश मामा... त्याने फोन लावला.

"संध्याकाळी घरी ये. मामीचा मी दिलेला नेकलेस घेवून ये. नाहीतर पोलीस येतील. तिकडे चौकशी होईल."

" काय झालं ऋषी? " मामा विचारत होता.

" मामीला विचार. "

संध्याकाळी मामा आला. मामी आलीच नाही. नेकलेस आशाताईंकडे देवून तो परत चालला होता.

"अरे काय झालं? कसला नेकलेस आहे. हा ऋषी कडे दे." आशाताई म्हणाल्या.

ऋषी घरी आला." मामा मामी आले नाही का? " त्याने विचारल.

" मामा आला होता. नेकलेस देवून गेला." आशाताई सांगत होत्या.

त्याने फोन केला." अर्धा तासात मामा मामीला घेवून इकडे ये."

"ऋषी अरे मला खरच या बद्दल काही माहिती नाही." सुरेश मामा म्हणाला.

" तेच तर नीट करू. तू ये."

मामा, मामी आले. ऋषी सोनल जवळ बसला होता. आजी, आशा ताई, पूनम ही होत्या.

" सुलभा मामी तुम्ही सांगताय का की मी सांगू? लगेच पोलीस येतील."

सगळे बघत होते नक्की काय सुरू आहे.

" मी लग्नाला येतांना नेकलेस घातला होता. नंतर मी तो काढून ठेवला. कपड्यां मधे लपवला. सोनल तिच्या घरच्यांवर आरोप केला. " सुलभा मामी सांगत होती.

" तुम्ही अस का केल? " ऋषीने विचारलं.

" माहिती नाही. "

" तुमच्या अश्या वागण्याने आमच्यात गैरसमज झाले होते." ऋषी सांगत होता.

" तिचा हाच तर उद्देश होता की इकडे काहीतरी व्हायला हव. म्हणजे तू सोनल वर राग काढशील. तिला घराबाहेर काढशील. तिची पोरगी इकडे परत येईल. पण अस होणार नाही सुलभा समजलं ना. आमच्या घरच्या लेकी सुनां कडे माझं नीट लक्ष आहे. सोनलच्या घरचे साधे आहेत, प्रामाणिक आहेत. तुझी मुलगी लग्नातून पळून गेली त्याचा राग तू सोनल वर का काढत आहेस?" आजी म्हणाल्या.

" यापुढे काही वाटत असेल तर इकडे येवू नका. तुम्ही माझे भाऊ, वहिनी होते पण सोनल विरुद्ध असे कारस्थान करतात का? मला ते चालणार नाही. " आशाताई ही म्हणाल्या.

" आशाताई. माफ कर." सुरेश मामा म्हणाले.

ते गेले.

सोनल आर्याच्या रूम मधे होती. पूनम आली. "वहिनी जा दादा बोलवतो आहे."

ती रूम मधे आली.

"तयार हो आपण डिनर साठी जातो आहोत." ऋषी म्हणाला.

"स्वयंपाक झाला आहे." तिने सांगितलं.

"असू दे."

" ठिक आहे. मी बाकीच्यांना सांगते."

"नाही आपण दोघे जातो आहोत." ऋषी म्हणाला.

"अहो पण. अस कस वाटत." सोनल म्हणाली.

"आटोप."

सोनलने च्युडीदार घातला होता. केसांची छान वेणी होती. ती नेहमी प्रमाणे छान सुंदर दिसत होती. नेकलेस प्रकरणाचा निकाल लागल्याने ती खुश होती.

" अहो आर्याला सोबत घेवू या का? ती आजकाल मी कुठे जाईल म्हणून घाबरलेली असते. "

"नाही. तिला उद्या शाळा आहे. आज आपण दोघे जण फिरायला जाणार आहोत. मला तुझ्याशी थोड बोलायचं आहे. प्रत्येक नात वेगळ असतं सोनल. सध्या आपल्या दोघांना एकमेकांशी कंफर्टेबल व्हायची गरज आहे. आपण नात पुढे न्यायला हवं. सगळीकडे सगळे सोबत जावू शकत नाही." ऋषी म्हणाला.

दोघ खाली आले. आर्या, पूनम राघव सोबत होती.

"मी बाहेर जावुन येते बेटा तू जेवण कर. " सोनल सांगत होती.

" हो मम्मी, मला आत्तूने सांगितल तुला महत्वाचं काम आहे. "

सोनल पूनम कडे बघत होती. ती तिला हसत होती." जा छान एन्जॉय करा. एका मुलीसाठी दादा काय काय करतो आहे . सगळ्यांना ओरडतो आहे. आता काय डिनर. रात्री काय होईल सांगता येत नाही. "

" पूनम काहीही काय. जरा हळू बोल कोणी ऐकेल. "

दोघ निघाले. कार मधे ऋषी सोनलचा हात धरून बसला होता. ती त्याच्याकडे बघत होती पूनम म्हणते ते बरोबर आहे अगदी मी म्हणेल ते ह्यांनी केलं. खरच हे चांगले आहेत.

दोघ होटेल मधे आले. त्याने बूकिंग करून घेतलं होत. ऋषी, सोनल जवळ बसला होता.

" काय घेणार?"

" तुम्हाला आवडत ते घ्या." सोनल म्हणाली.

" तुझ्या आवडीच काय?"

" अस काही नाही."

त्याने ऑर्डर दिली. बरेच पदार्थ सोनलच्या आवडीचे होते.

" सोनल अजून काही मनात आहे?" त्याने विचारलं.

"नाही, मी आधीच सांगितलं होत. माझ्या मनात काही नाही. अहो तुम्ही माझ्या साठी खूप करत आहात. "

"यात माझा स्वार्थ आहे." ऋषी तिच्याकडे बघत होता. ती लाजली होती. बापरे काय होईल. वेगळच वाटत आहे.

ऋषीने केकही मागवला होता. दोघांनी मिळून केक कापला.

ऋषीनी तिच्यापुढे अंगठी ठेवली. ती बघत होती.

"आपल्याला लग्ना आधी एकमेकांशी बोलायला... भेटायला वेळच मिळाला नाही. लग्न तर झाले आहे. आता काय करू शकतो? आता नीट राहू. आपण आपला संसार सुरू करायचा का?"

सोनल लाजली होती. ती छान हसत होती. तिने हात पुढे केला. त्यांने अंगठी घालून दिली.

ती अंगठी बघत होती. खूपच छान अंगठी होती.

" तुला काय वाटतं? आपलं आयुष्य कस असावं? " त्याने विचारलं.

" एकमेकांवर विश्वास हवा. खूप प्रेम हवं. समजूतदार पणा हवा. " ती म्हणाली.

" ते तर आहे. "

" असच शांत छान रहावं अस वाटत."

जेवण झालं. दोघं खूप बोलत होते.

"असं वाटतं की आपली पूर्वीपासून ओळख आहे."

" हो मला पण तेच वाटत आहे."

त्यांना घरी यायला बराच उशीर झाला. ते रूम मधे आले. सोनलला वेगळच वाटत होतं. एक अवघडलेपण होता.

त्याने तिला जवळ ओढून घेतलं. तो मानेवरून ओठ फिरवत होता.

"अहो नको ना. सोडा."

"सगळं झालं. आता काय प्रॉब्लेम आहे." तो विचारत होता.

ती सुंदर लाजली होती. ऋषीने रूम लॉक केली. तिला दोघी हातावर उचलून घेतलं. तिने त्याच्या छातीवर चेहरा लपवला.

दोघांनाही वेगळेच वाटत होतं. पण एकमेकांना वर भरपूर प्रेम होतं आणि विश्वासही होता.

ऋषी हळूहळू जवळ येत होता. हो नाहीचा प्रश्नच नव्हता. सोनलही त्याच्या प्रेमात खुलत होती. दोघं एक झाले. ती त्याच्या मिठीत झोपली होती.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all