Login

शिल्पा शिंदे !

.
" राजा श्री शिवछत्रपती " मालिकेतला एक सिन.
राजमाता जिजाऊ न्यायदान करत असतात.
एका पाटीलवर स्त्रीने बलात्काराचा आरोप लावलेला असतो.
ती स्त्री वेश्या असते. तरीही राजमाता जिजाऊ म्हणतात , " बलात्कार वेश्येवर झाला तरी तो बलात्कारच !"
नंतर बलात्कार खोटा असल्याचे सिद्ध होते.
वेश्येला हद्दपारीची शिक्षा होते.
पाटीलने बलात्कार केला नसल्यामुळे त्याला चौरंगा होत नाही परंतु तो सत्तेचा गैरवापर करतो म्हणून पाटीलकी रद्द होते.
आज अनेक वर्षांनी हा सिन आठवला त्यामागचे कारण म्हणजे शिल्पा शिंदे हिचा हर्ष-भारतीने घेतलेला पोडकास्ट.
या पोडकास्टमध्ये शिल्पाने स्वतः हे मान्य केले की तिने दहा वर्षांपूर्वी "भाभी जी घरपे है " च्या प्रोड्युसरवर " लैंगिक छळा "चा लावलेला आरोप खोटा होता.
शिल्पा शिंदे हिचा मालिकेसाठी मिळणारा पगार थकला होता.
कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता म्हणून शिल्पाने निर्मात्यावर खोटे आरोप लावले. जर शिल्पाचा पगार थकला होता तर तिला लैगिक छळाचे आरोप लावण्याची काही आवश्यकता नव्हती. दबाव निर्माण करण्यासाठी इतरही मार्ग उपलब्ध आहेत. मागेही काही पुरुष अभिनेत्यांवर { शाईनी आहुजा, पर्ल पुरी } यांच्यावर लैगिक शोषणाचे आरोप झाले. परंतु ते सिद्ध झाले नाही. तरीही या अभिनेत्यांच्या करियरवर अत्यंत वाईट परिणाम झाला.
बॉलिवूडमध्ये किंवा इतर क्षेत्रात महिलांवर अत्याचार होत नाहीत असे नाही परंतु खोटे आरोप लावल्यामुळे ज्या महिला खरोखरच पीडित आहेत त्यांच्यावरचा विश्वास उडतो.
शिल्पा शिंदे हिने नंतर बिग बॉसचा शो जिंकला. तिचे समाज माध्यमावर असंख्य फॉलोअर्स आहेत.
या महिला फॉलोअर्स जर आपला स्वार्थ साधण्यासाठी किंवा आर्थिक न्यायासाठी खोटारडे आरोप लावायला शिकल्या तर असंख्य निष्पाप पुरुषांचे जीवन अडचणीत येईल.
शिल्पाने खोटे आरोप लावण्यापूर्वी विचार करायला हवा होता की आपल्या या आरोपामुळे निर्मात्याच्या पत्नीला आणि मुलांना लोकांचे किती कटू टोमणे ऐकून घ्यावे लागतील.
मध्यंतरी एक अशीच घटना घडली. बसमध्ये गर्दी होती. चुकून धक्का लागल्यामुळे महिलेने लगेच व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला. त्या पुरुषाची इतकी बदनामी झाली की त्याने आत्महत्या केली.
दिल्लीत एका महिलेने एका पुरुषाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. त्या मुलीची राजकीय प्रगती झाली. दहा वर्षे कोर्टात केस चालली. ती मुलगी कोर्टात येत नसे. शेवटी मुलगा निर्दोष सुटला. या दहा वर्षात त्या तरुणाला किती मानसिक त्रास झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो.
या घटना कपोकल्पित नाहीत. एखादी स्त्री जेव्हा घाणेरडे आरोप लावते तेव्हा संवेदनशील, निर्दोष पुरुषावर मानसिक आघात होतो. शिल्पा शिंदे ही फक्त निर्मात्याची गुन्हेगार नाही तर त्याच्या कुटुंबाचीही गुन्हेगार आहे.
आपला खोटारडेपणा कबूल करताना तिला काही लाज वाटली नाही उलट अभिमान वाटला.
भारती आणि हर्ष हे तर तिच्या धाडसाचे कौतुक करत होते.
उद्या हर्षने एका महिला स्टाफचे पेमेंट थांबवले आणि तिने लैगिक शोषणाचे आरोप लावले तर भारतीला त्या महिला स्टाफचे कौतुकच वाटले असते का?
अजूनही शिल्पाला वाटते की तिच्या विरोधात निगेटिव्ह पीआर ऍक्टिव्ह झाला आहे.
निर्मात्यांनी कलाकारांचे पेमेंट थांबवू नये. जर निर्माता मुद्दाम तस करत असेल तर कलाकारांनी आवाज उठवावा. पण चुकीचे आरोप लावणे कदापि योग्य नाही.
या देशात कितीतरी स्त्रियांवर अत्याचार होतात आणि त्यांना कधीच न्याय मिळत नाही. कायदे, व्यवस्था अश्या स्त्रियांसाठी असते. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अश्या कायद्यांचा गैरवापर करू नये. महिला आहे म्हणून विकटीम कार्ड खेळू नये.
मीडिया दरवेळी स्त्रीची बाजू घेते.
त्या स्त्रीचे आरोप सत्य की असत्य याचीही पडताळणी मीडिया करत नाही.
आपणही स्त्रियांकडेच सहानुभूतीच्या नजरेने पाहतो.
खोटे आरोप करणाऱ्या महिलांना कडक शिक्षा झाल्या पाहिजेत.
बदनामीत गेलेली दहा वर्षे परत येणार नाहीत.
शिल्पाला इंडस्ट्रीतून ब्लॅक लिस्ट करायला हवे.
महिलांनी राजमाता जिजाऊ , पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा.
वैयक्तिक भांडणात जिंकण्यासाठी कायद्याचा गैरवापर करू नये.
बहुत काय लिहिणे आपण सुज्ञ असा !
_ पार्थ धवन


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →