"अहो मला माझ्या नोकरीची काळजी नाही."
"मग???"
"अंजली येते का नाही आत? काय बाई या लेकरांना अजिबात काळजी नाही माझी!"
"रमा मावशी जरा थांबा, आईशी बोलून येते मी."
अंजली गेली आणि आईला घट्ट मिठी मारली... मिठी मारल्या बरोबर आईच्या डोळ्यात पाणी आलं.
"बाळा कशी आहेस?"
"तू कशी आहेस सांग आधी? आई अगं मला माफ कर इच्छा असूनही मला तुला माझ्या घरी ठेवता नाही आलं.माझ्या सासूबाईंनी केलेले भांडण ..त्यांनी तुझ्यासाठी जे अपशब्द वापरले ते तर माझ्या कानात अजूनही घुमत आहेत."
"अगं ते सोड....तू प्रयत्न केला ना. खूप मदत केली माझी. पॅरेलेसिस अटॅक आला तेव्हा तू काय कमी त्रास करून घेतलास का माझ्यासाठी."
तेवढ्यात परत बेल वाजली, बाहेर केतकी आली होती. रमा काकूने दरवाजा उघडला, केतकी आत आली.
"अंजली ताई!!! ह्यांनी मला काही सांगितलं नाही....तुम्ही येणार आहात."
अंजली मिश्किल पणे हसत म्हणाली,
"तो कधी सांगतो ...की आता सांगेल!!!"
"तो कधी सांगतो ...की आता सांगेल!!!"
"आई कशा आहात? हे घ्या तुमच्या आवडीचे उडीद वडे. महिनाभर पाहिले पण बनवले होते त्यांना दिला होता डबा पण संध्याकाळी तो घरी जसाच्या तसा परत आला."
"अनिल कडून काय अपेक्षा करायची गं?"
"आई अगं विसरले मी , हे घे रसमलाई आणली तुझ्यासाठी."
"आज काय मला मारायचा विचार आहे का? माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घालून." आणि काकू हसल्या.
तेवढ्यात रमा मावशी आल्या...आणि जरा मोठ्याने बोलल्या
"ताई साहेब आता कंटाळले मी ह्या म्हातारीला सारखं मरणाच्या गोष्टी करतात. माझे कुणी नाही या जगात....तू पण आहेस तर पैशासाठी आहेस. काय काय बोलतात, पण म्हातारं माणूस आहे म्हणून मी गप्प बसते. ताई मला चुकीचं नका समजू."
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.बाहेर अनुराग होता.तो पण आत आला. वातावरण अगदी शांत झालं होतं...
कामवाल्या मावशी परत रूममधे आल्या आणि काही बोलायला लागणार तोच आई ओरडल्या...
" ऐ बाई तू जा, जरा चहा पाण्याचं बघ...आणि जेवण बनवं , माझी लेकरं उपाशी आहेत."
" हो बनवते ...पण मला बोलू द्या आज....करू द्या मला माझे मन मोकळं..."
" बोला मावशी...." अंजली दबक्या आवाजात बोलली.
आता मात्र मावशीच्या डोळ्यात पाणी आल.आधीचा जो आवाजात जोर होता तो राहिला नव्हता.
मावशी आईच्या जवळ गेली. तिला अजूनच हुंदका आला. आईने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं...
" अगं असं भरल्या घरात रडू नाही बाईने...."
" ताईसाहेब....दादासाहेब....अहो आईची एक इच्छा आहे...."
" काय सांगा ? अहो असं कधी झाली का की, तिची इच्छा पूर्ण नाही झाली.तिला घर सोडून एकटीला राहायचं होतं.ती पण इच्छा पूर्ण केली तिची अजून काय हवं आहे ते फक्त बोलावं तिने." अनुराग उपकार केल्यासारखे बोलला.
काय इच्छा असेल विमला काकूंची? वाचू या पुढच्या भागात..
क्रमशः....
©®कल्पना सावळे
क्रमशः....
©®कल्पना सावळे
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
