जमनाने रडणं थांबवलं. मोबाईल वरून तिने शहा साहेबांना फोन लावायचा प्रयत्न केला. पण इन्स्पेक्टर म्हात्रेंनी तो तिच्या कडून खेचून घेतला. " आत्ता कोणालाही फोन लावून देणार नाही. चल, बस आतमधे." असं म्हणून तिला आणि बरोबरच्या राजस्थानी मुलीला त्यांनी कोठडीत ढकलले.लॉक लावता लावता रागाने म्हणाले, " बस रात्रभर इथेच.मंदबुद्धी मुलीकडून धंदा करवते. ? " नारायणलाही एका कोठडीत ढकललं..... विद्युत बेनची अपेक्षा भलंमोठं रॅकेट सापडेल अशी होती. तक्रार वजा आवाजात ती म्हणाली, " बीजो छोकरीको भी लेके आना था. " हे पाहा बेन, इन्फॉर्मेशन प्रमाणे पकडून आणलेलं आहे. आमचं काम आम्ही केलं , आता तुम्ही जाऊ शकता. " ..... त्यावर त्या भडकून म्हणाल्या," आपने काम आधार अधुरा कर दिया. इतका जवाब तो आपको प्रेस कॉन्फरन्समे देना पडेगा. " .....
त्यावर म्हात्रे शांतपणे म्हणाले," पाहू काय होतंय ते. सध्या तूम्ही निघा. आम्हाला जमना आणखी त्या पोरींचे जाबजबाब घ्यायच्येत. आम्हाला आमचं काम करु द्या. "
असं म्हंटल्यावर बेन नाराज होऊन निघून गेल्या.
*******************************
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी राजमानेना पोलीस स्टेशनला बोलवून सुराडकरांनी तक्रार नोंदवून घेतली. राजमाने थोडे वैतागले होते. ते पाहून इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, " काळजी करु नका आम्ही लवकरात लवकर तुमच्या मिसेसचा शोध लावण्याचा प्रयत्न करु. " हे ऐकल्यावर राजमाने फक्त उपरोधिकपणे हसले आणि निघता निघता म्हणाले, " पाहू काय होतय ते. "....
सुराडकर त्यावर काहीच बोलले नाही. सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया अशाच असणार याची त्यांना कल्पना होती......
राजमाने घरी आले. विशाखाने त्यांना येताना पाहून दरवाजा मुद्दामच उघडला आणि दारात उभी राहिली. राजमानेंनी एकदा तिच्याकडे अनोळखी नजरेने पाहिलं. आणि आपल्या खोलीकडे निघाले. वास्तविक पाहता तिला त्यांना विचारायचं होतं ,तुमची बायको सापडली का ,पण त्यांचा मख्ख चेहरा पाहून तिने शब्द आतल्या आत गिळले. राजमाने आत शिरले आणि त्यांना जाणवलं की खूपच पसारा पडलाय. त्यांनी तो जेमतेच आवरला. थोडक्यात आवरण्याचा निष्फळ प्रयत्न केला. आता परत जेवायला बाहेरच जावं लागेल. बायको असली की चहा नाश्ता जेवण आयतं समोर येतं.मग ते आराम खुर्चीत बसून विचार करू लागले. हे नक्की काय चाललंय कळेना. त्यांना मालतीच्या वडलांचा उगाचच राग येऊ लागला. म्हातारा नक्कीच तिला घेऊन गेला असला पाहिजे. असा विचार करुन ते तिच्या वडलांचा राग राग करु लागले. मग ते उद्या बघू असा विचार करुन झोपण्याच्या तयारीला लागले. जेवणाला सुट्टी देऊन ते झोपण्याचा प्रयत्न करु लागले. पोट रिकामं असलं तरी झोपेची पेंग येऊ लागली ........... रात्रीचा दीड वाजत होता. अचानक दरवाज्याची कडी वाजली.राजमानेना आवाज अर्धवट ऐकू आला.थ़ोड्या वेळाने कडी हलकेच वाजली. आता मात्र ते खडबडून जागे झाले. ते धडपडत उठले. आवाज न करता ते दरवाज्या जवळ पोहोचले. दरवाज्या किलकिला करून त्यांनी बाहेर पाहिले. बाहेर गुडुप्प अंधार होता. त्यात त्यांना मानवी आकृती दिसली. मग त्यांनी सताड दरवाजा उघडला. समोर मालतीचे वडील हात जोडून उभे होते. ते अत्यंत खालच्या आवाजात विव्हळत ह़ोते. राजमानेना जबरदस्त राग आला. पण वडील म्हणाले," जावंईबापू मालतीची आई थोड्याच वेळापूर्वी हॉस्पिटलात गेली हो. तुम्ही तिला घेऊन येता का माझ्या बरोबर. ? "
आधी आलेला राग गिळून राजमानेंनी लाईट लावला. त्यांना घरात घेत म्हणाले, " मालती घरात नाही. तिला कोणीतरी पळवून नेली आहे. किंवा ती तुमच्या कडेच आली असणार. तिची आई गेल्याचा बहाणा करुन ती घरी आहे की नाही हे पाह्यला आलात का ? ".... त्यावर काकुळतीला येऊन वडील म्हणाले," नाही हो. मी खोटं कशाला बोलेन ? ती घरी आली असती तर मी तिला न्यायला आलो असतो का ? विश्वास ठेवा माझ्यावर. "..... आणि हो ती घरी नाही ? ".
.......,मग कुत्सित पणे राजमाने म्हणाले," लग्नाच्या वेळीही सगळं खरं सांगितलं नाहीत. तिला मुलगी आहे, हे लपवून ठेवलंत. आत्ता तरी मी विश्वास का ठेवायचा ? बोला ." असं म्हंटल्यावर ते हुंदके देत म्हणाले, देव कोणती परिक्षा घेतोय ,का ही कळत नाही. " आणि ते डोळे पुशीत दरवाज्याबाहेर पडले. आणि अंधारात दिसेनासे झाले. राजमानेना हे सर्व खोटं वाटलं आणि ते अंथरुणावर पडले. पण झोप लागेचना. मग ते उठले. लाईट लावून आरामखुर्चीत बसले. अचानक ते धडपडत उठले आणि मालतीची आई खरंच गेली तर नसेल असा विचार करुन जेमतेम, हाताला येतील ते कपडे चढवून बाहेर पडले. खोलीतला लाईट तसाच होता. मग त्यांच्या मनात आलं निदान आपण हॉस्पिटलचं नाव तरी विचारायला पाहिजे होतं. वडील नक्कच फार लांब गेले नसतील असा विचार करुन रस्त्यावर धावत सुटले. मग जवळच असलेल्या एसटी स्टँड वर ते मालतीच्या वडलांना शोधू लागले. एका बाकड्यावर ते उदासपणे बसलेले दिसले. त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन सगळ्या घटना वडलांना सांगितल्या. रात्रीची बस नसल्याने ते मालतीच्या बाबांना घरी घेऊन आले.
आत शिरल्या शिरल्या बाबा म्हणाले, " हॉस्पिटलचं बिल वगैरे सगळं भरलंय तरी बॉडी बाहेर काढून ठेवल्ये.काय सांगणार. म्हणून तर तुमच्या कडे आलो. "
"नाहीतर नसता आलात नाही का ?" राजमाने तिरकसपणे बोलले. त्यावर मालतीचे बाबा काहीच बोलले नाही. " सकाळपर्यंत तरी बॉडी घेऊन जायला हवी. तसं सांगितलंय. ". ......" बरोबर, पण चार वाजल्याशिवाय बस नाही. तोपर्यंत थांबावं लागेल. " असं म्हणून राजमाने आपल्या अंथरुणावर पडले. मालतीचे बाबा मात्र भिंतीला टेकून बसले. काय करणार बिचारे.
........ घड्याळात तीनचे टोले पडले.बाबांना जेमतेमच डुलकी लागली. त्यातही स्वप्नात त्यांना मालतीच्या आईने हालवले. " अहो उठा, झोपलाय काय ? नदीवर जायला वेळ होतोय.चला,चला, ....." असं म्हंटल्यावर ते जागे झाले. आणि त्यांना स्वप्न पडल्याचे लक्षात आलं.राजमाने घोरत होते. आपण जावं की काय या विचारात होते. पण आपल्या एकट्याच्याने पुढची तयारी कशी होणार ? मुलगा नसल्याची जाणीव त्यांना प्रकर्षानं झाली. पण परिस्थिती वेगळी होती. अचानक, राजमाने घोरण्याचे थांबले.आणि उठून बसले. त्यांनी बाबांना विचारले, " किती वाजले ? " साडेतीन वाजत होते. मोबाईल मधे पाहिल्यावर ते उठून बसले. आत्ता खरंतर त्यांना चहा हवा होता. खरंतर भूकही लागली होती. स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी दूध आहे का ते पाहिलं. फ्रीजमधून दूध काढून तापवण्यासाठी भांड पाहून. लवकरच चहा केला. दोन कप घेऊन ते बाहेर आले. चहा घेता घेता बाबा म्हणाले, " निघायला हवं. मला वाटतं, मी निघालं. " .....राजमाने भडकून म्हणाले," मी नको येऊ का ? ...." त्यावर बाबा म्हणाले, " नाही हो,तसं नाही. म्हणजे आपण लवकर निघायला हवं. एवढंच. " यांच्याशी जास्त बोलण्यात अर्थ नाही, असा विचार करुन त्यांनी कपडे घालायला सुरुवात केली........दहा पंधरा मिनिटातच ते घराबाहेर पडले. ........
****************************** विशाखा केव्हाच झोपली होती. मी घरी आलो तेव्हा काहीच दिसलं नाही. त्यामुळे शेजारी काय घडलंय हे समजायला मार्ग नव्हता.त्यांच्या घराला कुलुप होतं. पुढचे दोन दिवस काहीच घडलं नाही.........
*******************************
सासरे जांवई दोघे एसटी स्टँड वर पोहोचले. चारचि बस जेमतेच मिळाली. सकाळी साडेसहाला दोघे गावी पोहोचले. हॉस्पिटल अथारिटिज बरोबर थोडी वादावादी झालि . पण एकदाच दाहसंस्कार आटपला. दहा वाजत होते. राजमानेंनी बस पकडली. त्या आधी त्यांनी स्टँड वर जेवून घेतले. त्यांच्या गावी उतरले, तर समोर इन्स्पेक्टर सुराडकर उभे.जणू राजमाने केव्हा येणार हे माहित होतं.
त्यांना पाहून राजमाने म्हणाले," तुम्हाला खाजगी आयुष्य नसतं का हो ?"

(क्रमशः)
अरुण कोर्डे
©®
अरुण कोर्डे
©®