शापित स्त्री ( भाग ६)

जमना येऊन उभी राहिली.............
        जमना येऊन उभी राहिली. अजून म्हात्रे बोलतच होते. "...... but Sir we have information from a social worker,who is with us. " त्यावर शहा साहेब म्हणाले," ते मला काय पन माहीत नाय. माज्याकडे कंप्लेंट नाय आली पायजे." आणि त्यांनी फोन जमनाला द्यायला सांगितला. मग जमनाचं ऐकून घेत समजावणीच्या सुरात म्हणाले," मै बैठा हूं ना. " फोन बंद झाला. मग ते सगळेच जमनाच्या मागे निघाले..काही अंतर गेल्यावर इन्स्पेक्टर शिंदेंना आणि एका कॉन्स्टेबलला डाव्या बाजूच्या खोल्या तपासायला सांगून उजव्या बाजूच्या खोल्या तपासण्यासाठी जमनाच्या मागे ते निघाले. हे विद्युतबेनला आवडलं नाही. पण ती बोलली नाही.प्रत्येक खोलीत जुन्याच पोरी होत्या. कुठेच काही सापडेना. तेव्हा ते विद्युतबेनला म्हणाले," बघा बेन खात्रीची माहिती नसली म्हणजे असं होतं. आता आम्हाला वरिष्ठांचे चार शब्द ऐकावेच लागतील. "  डावीकडील खोल्यांमध्ये काहीच न सापडल्याने शिंदे नाराज होऊन परत आले. तेव्हा म्हात्रे म्हणाले," आपलं नशीब जोरावर नाही.ठीक आहे. चला जमनाबेन दुसऱ्या मजल्यावर कोणत्या खोल्या आहेत,दाखवा. " त्यावेळी आलेले सगळेच जण जमनच्या बाथरूम जवळ कंटाळून उभे  होते.  जमना त्यांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मागे लागली. तेवढ्यात नारायण आला. त्याला पाहून तिला राग आला. नेमका कामाच्या वेळेस कुठे होता हा ? तिने स्वतः:वर कंट्रोल ठेवून त्याला म्हंटले , " कहॉं मर रहे थे तुम ? ऐसा साब लोग आयेगा तो उनको कौन देखेगा और जानकारी कौन देगा ? मै धंदा छोडके ये काम करुं ?अभी कमसे कम इनको दूसरे मालेपर तो ले जाव ,कामचोर कहीं का ? " तो त्यांना घेऊन निघणार तेवढ्यात इन्स्पे. म्हात्रे म्हणाले, " अरे ये बाथरूम तो खोलो.
           ते ऐकून वरच्या जिन्याकडे वळलेली जमना म्हणाली," अरे साब‌ बाथरूम तो बाथरूम है. उधर क्या मिलेगा आपको? थोडा तो एतबार करो. " मग शिंदे तुसडेपणाने  म्हणाले, " जहॉं नहीं देखेंगे, वही तो तुम लोग  लाईन करते है. चलो,‌चलो, उशीर नहीं करनेका . बाथरूम खोलके दिखाना." घाबरलेल्या जमनाने तसे न दाखवता लॉक उघडून," मेरेकू क्या ? देखके तसल्ली कर लो."  ते पाहून शिंदे म्हणाले," बाथरूम कोई लॉक करता है क्या ? " .... " वो जमनका है. और वो अब जिंदा  नहीं ,इसलिए लॉक किया. " दरवाजातून आत शिरत सगळ्या भिंती वाजवून पाहत,एका ठिकाणी पोकळ भाग दिसताच खालच्या बाजूने जोरदार लाथ मारताच भिंतीच्या रंगात लपवलेला दरवाजा तुटून एका बाजूला लोंबू लागला.आतली डाळीची एक गोण बाहेर पडली. " अरे, अरे साब ये क्या करते है, इधर तो हम धानका गोनी रखते हैं. " .. मग त्यांनी बरोबरच्या कॉन्स्टेबलकडून आतल्या गोणी काढायला सुरुवात केली. ते पाहून जमना तिथून काढता पाय घेत म्हणाली," उधर कुछ नहीं मिलनेवाला. फालतूमे धान खराब कर रहे है. " तेवढ्यात हवलदाराने दोन गोणींमधे अडकलेला लाल रंगाचा दुपट्टा जोरात ओढला. तशी आतून एक राजस्थानी बेशुद्धावस्थेतली मुलगी खाली पडली. तिला पाहून त्यांनी जमनाला विचारलं, " आणखी किती मुली लपवल्येत ? " मुलीचा श्वास कोंडला होता. मुलीच्या तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं. तिला पाहून जमनाला फेफरं यायचं बाकी राहिलं. तरीही ती दडपून बोलली. " अरे साब ये लडकी कल रात को डरी हुई आयी और बोली उसके पिछे गुंडे पडे है और उसको छिपाव करके बोलने लगी. फिर मैने तो उसे निकल जानेको कहां.वो गिडगिडायी पॉंव पकडने लगी" तेवढ्यात  नारायण कडे पाहून तिने विचारले, " है ना नारायण ? "  ... नारायण मान डोलवत हो म्हणाला. मग मात्र शिंदे नारायणच्या कानफटात मारीत ओरडले," हो काय म्हणतो रे ? , तुम्ही दोघे म्हणजे उंदराला मांजर साक्षी " आता मात्र जमनाची चुरुचुरु बोलणारी  जीभ लुळी पडली. तिला घाम फुटायला लागला. शिंदे विद्युतबेनकडे वळून म्हणाले ," आपली इन्फॉर्मेशन खरी निघाली. चला आता आणखी सर्च घ्या. असं म्हणत आणखी गोणी बाहेर काढल्या. आणखीही पोरी सापडतील असं वाटलं. पण तसं काही झालं नाही.मग त्यांनी पो. स्टेशन मधून पाच सहा लेडीपोलीसना बोलावून घेतलं. रेडिंग पार्टी आणखी शोधाशोध करुं लागली.आता ते सगळे दुसऱ्या मजल्यावर गेले. आता मात्र जमनाने अडवणूक करण्यासाठी स्वतःच डोकं फिरल्या सारख्या सगळ्या खोल्या उघड्या केल्या.फक्त एक रुम सोडून, जी तिची स्वतःची होती. कारण तिथल्या गुप्त खोलीत जावेद मियाने आणलेली पाच लाखांची बाई होती. काय वाट्टेल ते झालं तरी ती तिला हातची घालवणार नव्हती. एकीकडे तिने शहा साहेबांना फोन लावला. आणि गुजराती मधे  जमनाने  कसा राजस्थानी मुलीला आश्रय दिला ते रंगवून सांगितलं.म्हणजे ती मुलगी धंद्यासाठी आणली नव्हती. त्यावर साहेब म्हणाले," उनको जो करना है करने दो. तुम बेफिक्र रहो.मै हूॅं ना ? " असं म्हणत त्यांनी फोन बंद केला.
         एकेक खोली उघडून पाहणं चालू होतं. आतल्या पोरी पोलीस दिसले की किंचाळत बाहेर यायच्या. खोल्यांमागून खोल्या तपासणं चाललं होतं. तेवढ्यात जमनाला फोन आला. तो गोहरबाईचा होता. तिने जमनाला पाच लाखांच्या बाई बद्दल विचारलं. त्यावर जमना म्हणाली, " अरे पपनस खाव नी.जुल्लाब एकदम बंद हो जाते है." पोलीस आले की त्यांची ही सांकेतिक भाषा होती. ते ऐकून म्हात्रे ओरडले, " एक कोणाशी बोलतेस ? " तिच्या हातातून फोन खेचून घेतला. पण तो बंद झाला होता.मग त्यांनी तिच्या खोलीकडे जात तोच फोन पुन्हा लावीत म्हंटलं, " किसको बोल रही थी पपनस खाव ? " तेवढ्यात तीनचार लेडी कॉन्स्टेबल आल्या. त्यांनी तिच्या खोलीचं दार उघडलं. तशी ती म्हणाली," अरे मेरी सहेली है नी उसासे बात कर रही थी. " मग त्यांचा फोन लागला पण कोणीच उचलला नाही. त्यांनी तिला परत देत म्हंटलं," चल, उघड ही खोली. अरे साब ये मेरा बेडरूम है. इसमे क्या देखनेका. आपने परमिशन ली है ? एक औरतका बेडरूम चेक करना चाहते हो. " त्यावर शिंदेंनी लेडी कॉन्स्टेबलला खूण केली. तिने " तुमको परमिशन चाहिए? य राहा परमिशन,"  असं म्हणत फाटकन जमनाच्या कानफटात मारली. त्यावर जमना म्हणाली  ," आपको ये भारी पडेगा." थरथरत तिने परत शहा साहेबांना फोन लावला. " अरे साब देखोनी ये लोगोंका काम खतम हुवा है फिरभी ये तकलीफ दे रहे है." असं म्हंटल्यावर शहा साहेबांनी फोन म्हात्रेना द्यायला सांगितला. " अरे तुम्हारे पास  जो इन्फॉर्मेशन है उसके मुताबिक मिल गया ना ? बंद करो रेड. और स्टेशन पहुॅंच जावं मै भी आ रहा हूॅं उधर. Come on pack up the raid and come back. That's my order. "
       मग मात्र रेड बंद करण्याशिवाय उपायच राहिला नाही. मात्र त्यांनी सापडलेली मुलगी, नारायण आणि जमना यांना घेऊन ते पोलीस स्टेशनकडे निघाले.धडधडत्या छातीने ते स्टेशन मधे प्रवेशले. पण शहा साहेबांची नामोनिशाण नव्हती. मग त्यांना शंका आली, खरोखरच शहा साहेब फोनवर होते की दुसरं कोणी ? अशी शंका आल्याबरोबर स्वतःवर ताबा न राहिल्याने त्यांनी जमनाच्या सणकन कानफटात मारली.
" खोटं बोललीस माझ्याशी ? कोण होता तो शहा साहेबांच्या आवाजात बोलत होता ? बोल लवकर.नाहीतर आणखी मारीन. ? " त्यावर जमना रडत रडत  म्हणाली," अरे साब, मै झूठ बात नथी करती. और आपने कैसे मारा मुझे ? सामने लेडी पोलीस है फिरभी ? "

(क्रमशः)
अरुण कोर्डे
©®


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →