कातरवेळ ही तुझी आठवण घेऊनी येते,
मला घेऊन भूतकाळात ही जाते,
सतत डोळ्यासमोर येतो चेहरा तुझा,
भ्रम तुटल्यावर कळते हा तर भास माझा.
मला घेऊन भूतकाळात ही जाते,
सतत डोळ्यासमोर येतो चेहरा तुझा,
भ्रम तुटल्यावर कळते हा तर भास माझा.
अजुनही सतावते तुझ्या गालावरची खळी,
माझ्या नावाचे कुंकू का नाही तुझ्या भाळी?
सोडून जातांना मला किती तू रडलीस,
कायमची फक्त तूच ह्रदयात जडलीस.
माझ्या नावाचे कुंकू का नाही तुझ्या भाळी?
सोडून जातांना मला किती तू रडलीस,
कायमची फक्त तूच ह्रदयात जडलीस.
तुझ्या स्वप्नांनी हुरहुर दाटली,
ओढीने तुझ्या परमोच्च पातळी गाठली,
असे वाटते डोळे वाचत तुझे रहावे,
चंद्राच्या शीतल सावलीत मिठीत तुला घ्यावे.
ओढीने तुझ्या परमोच्च पातळी गाठली,
असे वाटते डोळे वाचत तुझे रहावे,
चंद्राच्या शीतल सावलीत मिठीत तुला घ्यावे.
अबोला तुझा जीव घेईल माझा,
सदैव रहायचंय मला फक्त तुझा,
तुझं ते हसणं, तुझं ते बोलण, पुन्हा जगायचंय,
तुझ्या निळ्याशार डोळ्यात कायमच हरवायचंय.
सदैव रहायचंय मला फक्त तुझा,
तुझं ते हसणं, तुझं ते बोलण, पुन्हा जगायचंय,
तुझ्या निळ्याशार डोळ्यात कायमच हरवायचंय.
सांग तू येशील का नव्याने भेटायल?
सांग माझी साथ देशील का?
एकदा मागे वळून पहा,
मी अजून तिथेच आहे,
तुझी वाट पाहत उभा.
सांग माझी साथ देशील का?
एकदा मागे वळून पहा,
मी अजून तिथेच आहे,
तुझी वाट पाहत उभा.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
