Login

"स्वाभिमान" माझी दौलत

“मी तिथे कधीच थांबत नाही, जिथे माझी इज्जत कमी आणि माझी गरज जास्त असते.”हे वाक्य फक्त अहंकार नाही, तर आयुष्याने शिकवलेला अनुभव असतो.
काही ठिकाणं अशी असतात, जिथे आपली उपस्थिती फक्त गरजेपुरती असते.
आपण असलो तर कामं होतात, अडचणी सुटतात, वेळ निभावून जातो. पण त्या बदल्यात मिळतं काय?
ना आपुलकी. ना आदर. ना मनापासूनची किंमत.

माणूस आयुष्यात पैसा, यश, प्रसिद्धी पुन्हा मिळवू शकतो.
पण एकदा हरवलेला स्वाभिमान परत मिळवताना आत्मा थकून जातो.

“मी तिथे कधीच थांबत नाही, जिथे माझी इज्जत कमी आणि माझी गरज जास्त असते.”
हे वाक्य फक्त अहंकार नाही, तर आयुष्याने शिकवलेला अनुभव असतो.

कारण नातं तेच सुंदर असतं, जिथे तुमच्या असण्याला किंमत असते.
फक्त कामासाठी आठवण काढणारी माणसं आणि मनापासून साथ देणारी माणसं यात खूप फरक असतो.
गरज संपली की बदलणारे चेहरे आणि परिस्थिती बदलली तरी साथ न सोडणारे हात. हे आयुष्य वेळोवेळी दाखवत राहतं.

कधी कधी आपणच चुकतो.
लोकांच्या आयुष्यात स्वतःला इतकं झोकून देतो, की आपल्या अस्तित्वाची किंमतच कमी करून टाकतो.
नेहमी उपलब्ध राहणाऱ्या माणसाची किंमत लोकांना उशिराच कळते.
आणि काहींना तर कधीच कळत नाही.

एका ठिकाणी सतत अपमान सहन करत राहणं म्हणजे स्वतःच्या मनाला रोज थोडं थोडं मारत राहणं असतं.
तुमचं बोलणं दुर्लक्षित होत असेल, तुमच्या भावनांना किंमत नसेल, तुमचा वापर फक्त सोयीसाठी होत असेल. तर तिथून शांतपणे दूर होणंच योग्य असतं.

कारण स्वाभिमान हा आवाज करून जपायचा नसतो.
तो शांतपणे अंतर ठेवून जपायचा असतो.

जगात प्रत्येकाला तुमची गरज असू शकते, पण प्रत्येक जण तुमचा आदर करेलच असं नाही.
म्हणूनच स्वतःची जागा ओळखायला शिकावं लागतं.
जिथे तुमच्या प्रेमाची थट्टा होते, जिथे तुमच्या वेळेची किंमत नसते, जिथे तुमच्या मनापेक्षा तुमच्या उपयोगाला महत्त्व असतं. तिथे जास्त काळ थांबणं म्हणजे स्वतःलाच कमी लेखणं असतं.

कधी कधी दूर जाणं हे नातं तोडणं नसतं.
तर स्वतःला वाचवणं असतं.

आयुष्य खूप छोटं आहे.
ते अशा लोकांसाठी खर्च करू नका, ज्यांना तुमच्या मनापेक्षा तुमच्या उपयोगात जास्त रस आहे.
त्या माणसांसोबत राहा, ज्यांना तुमची गरज नसतानाही तुमची साथ हवी असते.

कारण खरी माणसं तुमची किंमत तुमच्या कामामुळे नाही.
तर तुमच्या अस्तित्वामुळे करतात.
  1. लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065, topsunil@gmail.com
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →