Login

साया - 44

त्या अदृश्य शक्तीने समीर सोबत घेतला नीलचाही बळी.

एकदाचा नील कसा बसा घरी पोहोचला. तो डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जाऊनच आडवा पडला. काही वेळ तो शांत पडून राहिला थोड्यावेळाने स्वतःहून उठला आणि फ्रेश होऊन खिडकी बाहेर काहीतरी पाहतो विचार करत उभा होता. विचार करत असला तरीही त्याचे मन कुठेही लागत नव्हते मनात फक्त समीर कल्याणी आणि ही अदृश्य शक्ती हेच विचार चक्र रंगात होते तसाच तो परत कॉटवर जाऊन पडला.

त्याला अचानक काही वेळानंतर बाथरूम मधून पाणी सांडण्याचा आवाज येऊ लागला. तो बाथरूम मध्ये पाहण्यासाठी गेला पण तिथे कोणी ही नव्हते. नळ मात्र तसा चालू होता. त्याला आठवत होते की, त्याने नळ बंद केला होता. तर मग हा नळ कोणी चालू केला? याच विचारात तो बाहेर निघाला. आणि समोर पाहते तर त्याची ती व्यवस्थित शिस्तबद्ध असलेली रूम पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेली होती. एकही वस्तू त्याची जागेवर नव्हती सर्व हवेमध्ये उडत होत्या कॉट हा मोडून तोडून फेकून दिलेला होता. हे सगळे पाहून त्याचे डोळे विस्फारले. तो तसाच त्या वस्तूला पाहत पाहत त्याच्याखाली मधोमध जाऊन उभा राहिला. त्याच वेळेस वरून पंखा अचानक........


पुढे........


त्याच वेळेस वरून पंखा अचानक........

करकर आवाज करू लागला.

खोलीत हवेत फिरणाऱ्या वस्तूंचा वेग क्षणोक्षणी वाढत होता.

टेबलावरची पुस्तकं...

काचेचे ग्लास...

फोटोफ्रेम...

सगळंच जणू एखाद्या अदृश्य वादळात अडकून गोल फिरत होतं.

नील जागेवरच उभा राहिला.

त्याचा श्वास वाढला होता.

"कोण आहे...?" त्याचा आवाज थरथरत बाहेर पडला.

"तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे?"

" तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे!"

"तुम्ही हे सगळं का करत आहात?"

"कोण आहे?"पण त्याला कोणतंही उत्तर मिळालं नाही.


फक्त...

भिंतीवर लटकलेलं घड्याळ अचानक थांबलं.

त्याचे काटे...

३:१७ वर येऊन स्थिर झाले. हे पाहून त्याला कल्याणीची आठवण झाली.

त्याच क्षणी छतावरील पंखा पहिल्यापेक्षा जास्त आवाज करत हलू लागला.

"कर्रर... कर्रर..."

नीलने सहज वर पाहिलं.

पंख्याचा हुक हलत होता. त्याला पाहून तर लिहिला मात्र त्याच्या डोळ्यासमोर मृत्यू चालवली. कारण जणू तो कोणत्याही क्षणी तुटणार होता. हे पाहून नील मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला.

मात्र त्याच्या पायाखाली काहीतरी आलं. आणि

त्याचा तोल गेला. तसाच तो.....

तो जमिनीवर कोसळला.

तो एवढ्या जोरात पडला की, क्षणभर त्याला काहीच समजलं नाही.

उत्तर काही वेळाने तो उठण्याचा प्रयत्न करत असतानाच...

वरून एक मोठा आवाज घुमला.

धाड!

छतावरील पंखा तुटून खाली पडला.

तो सरळ नीलच्या अंगावर आदळला.

खोलीत एकच गडगडाट झाला.

काही क्षण सर्वत्र शांतता पसरली.

फक्त...

तुटलेल्या धातूचा किरकिरणारा आवाज ऐकू येत होता.

नील वेदनेने विव्हळत होता. तेव्हाच हवेत तरंगत असलेल्या सर्व वस्ती एकदम दनादन खाली आदळू लागल्या.

नीलच्या अंगात दुःखाची बीज कडाडली होती. त्याने हलण्याचा प्रयत्न सुरू केला.

पण त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हतं. पंखा काढण्याचा जणू त्याचे हातही अपयशी ठरत होते.

त्याचा श्वास जड झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

तरीही त्याने थरथरत्या हाताने पंखा बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला.

पण जणू त्याच्यातली सगळी ताकदच संपली होती.

...

अचानक खोलीतील लाईट पुन्हा एकदा लुकलुकू लागले.

एकदा...

दोनदा...

त्यामुळे त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक भरल्यासारखे वाटत होते. त्याचे डोळ्यात जणू कोणी काहीतरी टाकले असावे. एवढा त्याला त्रास जाणवू लागला.

आणि मग संपूर्ण खोली लालसर प्रकाशाने भरून गेली.

नील स्वतःला तरीही उठवण्याचा प्रयत्न करीत होता. ते त्याला झेपले नाही तरी त्याने सर्वत्र एकदा मान वळवून नजर फिरवली.

समोरच्या भिंतीवर काहीतरी त्याला उमटत असल्याचे दिसले.


जणू अदृश्य बोटांनी ओल्या रंगातून कोणीतरी एक चिन्ह काढत होतं.

सुरुवातीला एक वर्तुळ...

मग त्यातून हळूहळू एक मोठा डोळा आकार घेत गेला.

आणि त्याच्या मध्यभागी...

एक छोटंसं हृदय.

तेच चिन्ह.

जे त्याला कल्याणीच्या घरापासून ते आता झालेल्या प्रत्येक मृत्यूच्या ठिकाणी दिसल होतं.

प्रत्येक रहस्याशी जोडलेलं.

आता मात्र नीलच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसू लागली.

"नाही..."

तो पुटपुटला.

"हे... अशक्य आहे..."

त्याच क्षणी खोलीत पुन्हा तोच भयभीत करणारा स्त्रीस्वर घुमला.

अतिशय मंद...

पण स्पष्ट.

"सत्याच्या खूप जवळ आलास, डॉक्टर..."

"पण काही सत्य...

हे किंमत घेतल्याशिवाय समोर येत नाही."

नीलने घाबरून आजूबाजूला पाहिलं.

कोणीच नव्हतं.

आवाज मात्र प्रत्येक दिशेने येत असल्यासारखा वाटत होता.

खिडकी स्वतःहून उघडली.

थंडगार वारा आत आला.

घरातील कागद हवेत उडू लागले. खिडकीचा पडदा ही हवेत तरंगत होता.

त्यांपैकी एक कागद नीलच्या समोर अलगद येऊन पडला.

त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं.....

"अजून शेवट झालेला नाही."

नीलने तो कागद हातात घेण्याचा प्रयत्न केला.

पण त्याचे हात थरथरत होते.

त्याची नजर धूसर होत चालली होती.

भिंतीवरील डोळ्याचं चिन्ह मात्र अधिक स्पष्ट दिसू लागलं.

त्याला क्षणभर भास झाला...

जणू त्या चिन्हातील डोळा त्याच्याकडे पाहत होता.

आणि त्या छोट्याशा हृदयाची धडधड त्याला ऐकू येत होती.

धड...

धड...

धड...

ती धडधड त्याच्या स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांशी जुळू लागली.

नीलचा श्वास मंदावत गेला. काही वेळेस त्याच्या मनात फक्त समीर आणि कल्याणीचा विचार येत होता. समीरला तर तो वाचवू शकला नाही, पण कदाचित कल्याणीला आपण वाचू शकतो असा त्याचा विचार होता. पण त्याआधी आपला बळी का गेला असेल? हा विचार त्याच्या मनात येऊन गेला. आणि आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर फिरू लागला.

त्याचवेळी त्याच्या कानात शेवटचे शब्द घुमले....

"सत्य लपवलं गेलं होतं.....

पण संपलं नव्हतं....."

खिडकी पुन्हा जोरात आपटली.

लाईट पूर्णपणे बंद झाले.

संपूर्ण खोली अंधारात बुडाली.

...

काही क्षणांनी...

बाहेरून शेजाऱ्यांना मोठा आवाज ऐकू आला. सर्वजण नीलच्या घराकडे पाहू लागले. काही लोक धावत नीलच्या घराकडे आले. त्यांनी दरवाजा ठोकला पण कोणताही आतून कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही.

दार आतून बंद होतं. त्यांना दार उघडणे शक्य झाले नव्हते. बराच प्रयत्न करून त्यांनी दार उघडलं. सर्वांना वरच्या खोलीच्या खिडकीत काहीतरी जाणवलं होतं. ते पाहून सर्वजण त्याच खोलीकडे धावत गेले.

आतलं दृश्य पाहून सगळे स्तब्ध झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि आश्चर्याचा धक्का होता. प्रत्येकाच्या चेहऱ्याचा रंग उडाला.

खोली पूर्ण अस्ताव्यस्त झालेली होती.

फर्निचर तुटलेलं होतं.

छतावरील पंखा जमिनीवर पडलेला होता.

त्याखाली नील निश्चल अवस्थेत पडला होता.

त्याच्या श्वासाची चाहूल लागत नव्हती.

भिंतीवर...

धुळीत आणि ओलाव्यात उमटलेलं तेच रहस्यमय चिन्ह दिसत होतं.....

एक डोळा...

आणि त्याच्या मध्यभागी...

एक छोटंसं हृदय.

कोणाचीही हिंमत पुढे जाण्याची होत नव्हती. सर्वजण घाबरलेल्या अवस्थेत फक्त स्तब्ध होऊन पाहत होते. काही क्षणांनी त्यातील एका तरुणाने पोलिसांना फोन करून सांगितले.

इन्स्पेक्टर चव्हाण घटनास्थळी पोहोचले. समोर लिहिला पाहून त्यांनाही धक्काच बसला.

त्यांनी संपूर्ण खोलीची पाहणी केली.

पुन्हा एकदा जे याआधी दिसले त्यांना तेच या केस मध्ये आढळले ......

ना जबरदस्तीने खोलीत प्रवेश केल्याच्या खुणा होत्या.

ना नील शिवाय दुसऱ्या व्यक्तीचे ठसे.

ना कोणताही स्पष्ट पुरावा.

फक्त एक रिकामी खोली...

आणि भिंतीवर तेच चिन्ह.

चव्हाण काही क्षण नीलकडे पाहत राहिले.

त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता....

जर नीलही गेला असेल...

तर आता या रहस्यामागचं सत्य शोधणार कोण?

आणि...

त्या डोळ्याच्या चिन्हाचा पुढचा बळी कोण असणार?

खिडकीबाहेर पुन्हा एकदा वीज चमकली.

क्षणभर तिच्या प्रकाशात...

रस्त्याच्या पलीकडे पांढऱ्या कपड्यात एक अस्पष्ट आकृती उभी असल्याचा भास झाला.

पण प्रकाश नाहीसा होताच...

ती आकृतीही अंधारात विरून गेली.

-------------------------------------------------------------
कथा आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा. तुमचा प्रत्येक प्रतिसाद मला पुढचा भाग अधिक छान शब्दात लिहिण्याची प्रेरणा देतो.

आणि अशाच रहस्यमय कथा वाचण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. पुढच्या भागात अनेक धक्कादायक रहस्यांचा उलगडा होणार आहे!
तर वाचत रहा "साया"
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →