Login

साया -43

इन्स्पेक्टर चव्हाण यांना सापडली ती फाईल.



नील बराच वेळ मोबाईलकडे पाहत राहिला.

अनेक दिवसांनी...

पहिल्यांदाच त्याला वाटलं...

कदाचित तपासाला आता एखादी नवी दिशा मिळणार होती.

पण...

त्याला अजूनही कल्पना नव्हती...

की त्या जुन्या फाईलमध्ये दडलेलं सत्य केवळ समीरच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार नव्हतं...

तर त्याच्या स्वतःच्या आयुष्यालाही एका अशा वळणावर नेणार होतं, जिथून परत फिरणं कदाचित अशक्य होणार होतं.



                 पुढे......


त्या रात्री नीलला झोपच लागली नाही. त्याच्या नजरेपुढे समीरचा तो निरागस चेहरा येत होता. याशिवाय डोक्यात फक्त विचारचक्र सुरू होते.

समीरचा मृत्यू...

स्वातीचा रहस्यमय अंत...

शेखरचा अपघात...

२०१८ चा फोटो...

आणि प्रत्येक ठिकाणी दिसणारं ते एकच चिन्ह...

एक डोळा... आणि त्याच्या मध्यभागी एक छोटंसं हृदय.

जणू प्रत्येक घटना त्याला एका अदृश्य दिशेने खेचत होती. काहीतरी त्याला संकेत देत होती. एवढं समजूनही तो त्याबद्दल पुढे काहीही करू शकत नव्हता त्याच्या हातातून एकेक करून बऱ्याच व्यक्ती या जगातून मृत्यूच्या दारात फोडल्या जात होत्या याचा त्याला खूप पश्चाताप होऊ लागला.

त्यातूनच त्याच्या मनात एक गोष्ट पुन्हा पुन्हा येत होती.

"मी या सगळ्यात आलोच कसा? माझा या सगळ्या घटनांची काय संबंध. उगीचच मी यामध्ये गुरफडल्या जात आहे की काय?"

मी दूर दूरवर या घटनांच्या संबंधित नाही. मी या रहस्याचा भागही नव्हतो.

मी फक्त समीरचा मित्र होतो.

समीरच्या एका फोनवर मी इथे त्याला मदत करायला आलो होता.

मला वाटलं होतं. समीर आणि कल्याणीला या संकटातून बाहेर काढेल. त्यांना संकटातून मी सुरक्षित बाहेर काढू शकतो याच विचाराने मी त्याच्या फोनवर इथे आलो

पण...

मी स्वतः या संकटाचा साक्षीदार बनलो आहे. त्याचा एक भाग झाल्यासारखे मला वाटत आहे.

आणि तरीही...

मी माझ्या मित्राला वाचवू शकलो नाही. हीच गोष्ट मला आतून पोखरत आहे. लवकरात लवकर न्याय मिळवून दे कदाचित हा त्याच्यावरून उपाय होऊ शकते. विचार करत  असतानाच मध्यरात्री त्याला झोप लागली.


---
पण लगेचच त्याला पाच वाजताच जाग आली तेवढ्याच पहाटे त्याने मोबाईल हातात घेतला आणि त्यावर चव्हाण यांचा मेसेज आलेला होता.  त्याने तो पाहिला आणि तो उठून  फ्रेश होऊन तयारी करून जवळपास साडेसहा वाजता...

नील पोलीस ठाण्यात पोहोचला.

इन्स्पेक्टर चव्हाण आधीपासूनच त्याची वाट पाहत होते.

त्यांच्या टेबलावर एक जुनी, धुळीने माखलेली फाईल ठेवलेली होती.

फाईलच्या मुखपृष्ठावर लाल शाईने लिहिलं होतं—

"प्रकरण क्र. ४७/२०१८ – बंद."

चव्हाण काही क्षण त्या फाईलकडे पाहत राहिले.

"ही फाईल आम्हाला मुख्य रेकॉर्डमध्ये मिळाली नाही."

"मग?"

"ती एका जुन्या लोखंडी कपाटाच्या  तळाखाली लपवलेली होती."

नीलच्या भुवया उंचावल्या.

"म्हणजे कोणीतरी मुद्दाम लपवली असू शकते?"

"बहुधा."


---

चव्हाण यांनी ती फाईल उघडली.

आत काही जुनी छायाचित्रं होती.

वाड्याचे फोटो...

वडाच्या झाडाचे फोटो...

आणि काही पंचनामे.

पण त्यामध्ये एक गोष्ट विचित्र होती.

प्रत्येक महत्त्वाच्या पानावर काळ्या शाईचा मोठा डाग पडला होता.

जणू मुद्दाम मजकूर अस्पष्ट करण्यात आला होता.

"हे बघा."

चव्हाणांनी एक पान पुढे केलं.

तिथे फक्त काही शब्द स्पष्ट दिसत होते,

"...तरुणी..."

"...बेपत्ता..."

"...साक्षीदार..."

"...फोटो..."

"...पुरावा गायब..."

बाकी सर्व अक्षरं काळ्या डागाखाली झाकली गेली होती.


---

नील फाईलचे पानं उलटत राहिला.

अचानक त्याला एका कागदावर एक परिचित स्वाक्षरी दिसली.

तो थबकला.

"हे..."

चव्हाणांनी विचारलं,

"ओळखीचं नाव आहे का?"

नील काही क्षण गप्प राहिला.

"ही स्वाक्षरी समीरची आहे."

चव्हाण दचकले.

"काय?"

"हो."

"पण २०१८ मध्ये समीर या प्रकरणात का होता?"

दोघेही काही क्षण निःशब्द झाले.

हा प्रश्न त्यांच्यापैकी कोणाकडेच उत्तर नव्हतं.


---

तेवढ्यात...

पोलीस ठाण्याच्या सर्व लाईटचा प्रकाश अचानक लुकलुकू लागला.

एकदा...

दोनदा...

नाही तर बऱ्याचदा लाईटचा प्रकाश लुकलुकू करत होता...

मग संपूर्ण इमारत काही क्षण अंधारात बुडाली.

जनरेटर सुरू होण्याआधीच्या त्या काही सेकंदांत...

नीलला स्पष्टपणे कोणाच्यातरी पावलांचा आवाज ऐकू आला.

टक...

टक...

टक...

जणू कोणीतरी अगदी त्यांच्या केबिनबाहेरून चालत होतं.

नीलने दाराकडे पाहिलं.

चव्हाणांनीही तेच ऐकलं होतं.

दोघे एकाच वेळी बाहेर धावले.

पण बाहेर कोणीही नव्हतं अगदी शांतता होती.

एकही पोलीस कर्मचारी तिथे नव्हता.

फक्त...

एका भिंतीवर शेवटी पाण्याने उमटलेलं तेच चिन्ह दिसत होतं.

डोळा...

आणि मध्यभागी हृदय.

क्षणातच ते पाणी खाली ओघळताना दिसू लागले. आणि

चिन्ह नाहीसं झालं.


---

"हे मीही पाहिलं..... हे काय होतं...."

चव्हाणांच्या आवाजात प्रथमच भीती होती.

"हो...". नील हळूच म्हणाला.

आता त्याला जाणवत होतं...

हे केवळ खुनाचं प्रकरण नव्हतं.

तर कोणीतरी...

किंवा काहीतरी अप्रत्यक्षरीत्या अदृश्य शक्ती त्यांच्यावर नजर ठेऊन होती.....

त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होतं.


---

त्याच संध्याकाळी...

नील समीरच्या हॉस्पिटलच्या केबिनमध्ये बसला होता.

समीरची खुर्ची अजूनही तशीच होती.

टेबलावर त्याचा स्टेथोस्कोप ठेवलेला होता.

भिंतीवर त्याचा हसरा फोटो लावलेला होता.

नीलने तो फोटो हातात घेतला.

त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

"माफ कर, मित्रा..."

"मी उशिरा आलो."

"तुला वाचवू शकलो नाही."

खोलीत काही क्षण शांतता पसरली.

तेवढ्यात...

समीरच्या टेबलावर ठेवलेली घंटी स्वतःहून हलकेच वाजली.

टण...

नील दचकला.

त्याने आजूबाजूला पाहिलं.

कोणीच नव्हतं.

पुन्हा...

टण...

यावेळी आवाज थोडा मोठा होता.

त्याने सावधपणे टेबलाजवळ जाऊन घंटी उचलली.

घंटीखाली एक दुमडलेला कागद ठेवलेला होता.

तो आधी तिथे नव्हता.

नीलने कागद उघडला.

त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती—

"ज्याला तू शोधतोयस... तो तुला शोधत आहे."

खाली...

तेच चिन्ह.

एक डोळा.

आणि त्याच्या मध्यभागी...

एक छोटंसं हृदय.

नीलच्या हातातून कागद खाली पडला.

त्याने लगेच दार उघडून बाहेर पाहिलं.

पण बाहेर त्याला कोणीही दिसले नाही सर्वत्र शांतता पसरलेली होती.

पण दूर...

मेन गेट च्या जवळ त्याला...

पांढऱ्या कपड्यात एक स्त्री काही क्षण उभी असल्याचे त्याला दिसले. आणि अचानक .......

वीज चमकली.

त्यामुळे जणू काही त्याच्या डोळ्यापुढे क्षणभर अंधार झाला.

आणि लगेचच काही क्षणात प्रकाश परत आला...

आणि ती आकृती गायब झाली होती. नील काही क्षण गोंधळात पडला त्याला काय करावे आणि कसे रिॲक्ट हे कळतच नव्हते. तो लगेचच तिथून कसा बसा बाहेर निघून गेला पण घरी जात असतात. त्याला त्याच्या नजरे पुढे तीच आकृती गाडीच्या समोर दिसत होती. कधी कधी तर त्याला ती त्याच्या बाजूला बसलेली जाणवत होती. पण प्रत्यक्ष नजरेत निरखून पाहता काहीही समोर नसायचे.


---

एकदा चा नील कसा बसा घरी पोहोचला. तो डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जाऊनच आडवा पडला. काही वेळ तो शांत पडून राहिला थोड्यावेळाने स्वतःहून उठला आणि फ्रेश होऊन खिडकी बाहेर काहीतरी पाहतो विचार करत उभा होता. विचार करत असला तरीही त्याचे मन कुठेही लागत नव्हते मनात फक्त समीर कल्याणी आणि ही अदृश्य शक्ती हेच विचार चक्र रंगात होते तसाच तो परत कॉटवर जाऊन पडला.

त्याला अचानक काही वेळानंतर बाथरूम मधून पाणी सांडण्याचा आवाज येऊ लागला. तो बाथरूम मध्ये पाहण्यासाठी गेला पण तिथे कोणी ही नव्हते. नळ मात्र तसा चालू होता. त्याला आठवत होते की, त्याने नळ बंद केला होता. तर मग हा नळ कोणी चालू केला? याच विचारात तो बाहेर निघाला. आणि समोर पाहते तर त्याची ती व्यवस्थित शिस्तबद्ध असलेली रूम पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेली होती. एकही वस्तू त्याची जागेवर नव्हती सर्व हवेमध्ये उडत होत्या कॉट हा मोडून तोडून फेकून दिलेला होता. हे सगळे पाहून त्याचे डोळे विस्फारले. तो तसाच त्या वस्तूला पाहत पाहत त्याच्याखाली मधोमध जाऊन उभा राहिला. त्याच वेळेस वरून पंखा अचानक........


क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →