Login

साया -38

समीरच्या नजरेपुढे सुरू झाला मृत्यूचा खेळ. यातून समीर स्वतःला वाचवू शकेल का?




समीरने घाबरून दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून
दार हलतही नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केले. त्याच्या कपाळावर घाम फुटला. पण त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही.

"कोण आहे तिकडे?"
"का करत आहे हे सगळं?"
"माझ्याशी असे का खेळतंय?"
हे बोलत असताना त्याचा आवाज थरथरत होता.
त्याच वेळी...

खोलीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खिडकीचा जुना पडदा हलकेच हलला.

जणू.....

त्यामागे कोणीतरी उभं होतं. ते स्पष्टपणे जाणवत होते. समीरने टॉर्च त्या दिशेने रोखताच.

पडदा शांत झाला. तो सावधपणे पुढे गेला. आणि एकदम पडदा बाजूला केला.

मागे...
फक्त तुटलेली खिडकी दिसत होती. बाहेर वडाच्या झाडाच्या पारंब्या वाऱ्यावर हलत होत्या.

अचानक...

खाली अंगणातून कोणीतरी त्याचं नाव घेतल्यासारखं वाटलं.
"...समीर..."

तो धावत खिडकीजवळ आला. खाली अंधार होता. त्याला
कोणीच दिसत नव्हतं.

मात्र हे पाहत असताना अचानक.....

त्याच्या पायाखालील लाकूड घसरलं.


                      पुढे......



त्याने खाली पाहिलं.
जुन्या फरशीचा एक भाग तुटलेला होता.
त्या रिकाम्या जागेतून खालील मजला दिसत होता.

आणि...

खाली धुळीत पडलेली एक जुनी मानवी सांगाड्याची आकृती त्याच्या नजरेस पडली.

समीरचा श्वास जणू रोखला गेला. तो काही क्षण स्तब्ध उभा राहून त्याकडे एकटक पाहत होता.

त्या सांगाड्याकडे. पाहत असताना, अचानक त्याचा आकार एकदम बदलू लागला. पहिले त्याने गोलाकार कृती बनवली नंतरच त्याच्यामध्ये आकार बदलून हळूहळू  त्याचे हृदय आकारात परिवर्तन झाले. हे पाहून समीरला जणू चक्कर येऊ लागले होते. ती कृती इथे पूर्ण झाली नाही, तर त्याच्या अवतीभवती अचानक डोळा निर्माण झाला. थोडक्यात


एक डोळा...


आणि त्याच्या मध्यभागी एक छोटंसं हृदय.
समीरने थरथरत्या हाताने टॉर्चचा प्रकाश होईल तितक्या हिंमतीने धीराने स्थिर ठेवला.

त्याच्या मनात एकच विचार घुमत होता.

"या वाड्यात अनेक वर्षांपासून काहीतरी दडलं आहे. ज्याचा गुन्हेगार तू आहेस..."

आणि त्याच क्षणी...
खाली पडलेला सांगाडा त्याला स्तब्ध असल्याचे लक्षात आले. जणू काही झालेच  नसावे. त्याला भास झाला असावा अशा प्रकारे तो चलबिचल होऊन आजूबाजूला आणि परत त्या सांगाड्याकडे पाहू लागला.


काही वेळ हाच प्रकार सुरू राहिला. नंतर समीरने स्वतःला सावरले. त्याने खोल श्वास घेतला.

आणि तो आल्यापासून आतापर्यंत जे काही त्याच्यासोबत घडलं ते सर्व काही तो परत विचार करू लागला आणि त्यावरून त्याला आता पूर्ण खात्री झाली होती की,
या वाड्यात काहीतरी अशी अदृश्य उपस्थिती आहे, जी प्रत्येक पावलावर त्याच्याकडे पाहत आहे...
आणि त्याने इथून बाहेर पडायचं असेल, तर त्याला या रहस्याचा सामना करावाच लागणार होता.


वाड्याच्या दालनात पसरलेल्या अंधाराकडे पाहत तो काही क्षण जागेवरच उभा राहिला. बाहेर पावसाचा आवाज आता मंद झाला होता, पण त्या शांततेमुळेच वातावरण अधिक भयानक वाटत होतं.

त्याने टॉर्चचा प्रकाश चारही बाजूंना फिरवला.

धुळीने झाकलेले फर्निचर...

भिंतींवरून निघालेला चुना...

कोपऱ्यांत पसरलेली कोळ्यांची जाळी...

आणि हवेत दरवळणारा ओलसर, कुजका वास.

प्रत्येक गोष्ट जणू अनेक वर्षांपासून तशीच पडून होती.

"इथे नेमकं काय घडलं असेल...?" तो स्वतःशीच पुटपुटला.

तो सावधपणे पुढे सरकत होता. प्रत्येक पाऊल टाकताना जमिनीवरचं काहीना काही पायाखाली येऊन त्याचा  विचित्र आवाज येत होता.

अचानक...

त्याच्या मागून हलकासा आवाज आला.

जणू कोणीतरी त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत चालत होतं.

समीरने घाबरून थरथरत न लगेच मागे वळून पाहिलं.

पण दिसत कोणीच नव्हतं.

फक्त अंधार.

त्याने स्वतःला समजावलं.

"कदाचित माझाच भास असेल उगीचच तो स्वतःला सहानुभूती देत होता."

तो पुन्हा पुढे निघाला.

मात्र काही सेकंदांत तोच आवाज पुन्हा ऐकू आला.

यावेळी तो स्पष्ट होता.

एकदा...

दोनदा...

तिसऱ्यांदाही त्याला तसेच जाणवले....

जणू खरंच त्याच्या मागे कुणीतरी शांतपणे चालत होतं.

समीर थांबला.

आवाजही थांबला.

तो पुन्हा चालू लागला.

आवाज पुन्हा सुरू झाला.

त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या.

त्याने मोबाईल काढून नीलला फोन करण्याचा प्रयत्न केला.

पण स्क्रीनवर नेटवर्क नव्हतं.

त्याने वैतागून मोबाईल खिशात ठेवला.

तेवढ्यात...

वरच्या मजल्यावर कुठेतरी एखादं दार हळूहळू उघडल्याचा आवाज झाला.

"कर्क..."

समीरची नजर जिन्याकडे वळली.

वर पूर्ण अंधार होता.

पण त्याला क्षणभर तिथे एखादी काळी सावली उभी असल्याचा भास झाला.

तेवढ्यात बाहेर एक जोरदार विज चमकली.

त्यामुळे संपूर्ण दालन क्षणभर उजळलं.

आणि त्या प्रकाशात त्याला असं वाटलं की, जिन्याच्या कठड्याजवळ कोणीतरी उभं राहून त्याच्याकडे पाहत आहे.

पुढच्याच क्षणी पुन्हा अंधार पसरला.

समीरने धाडस करून दोन पावलं पुढे टाकली.

इतक्यात...

त्याच्या उजव्या कानाजवळून बर्फासारखी थंड हवा गेली.

तो दचकून मागे सरकला.

त्याच्या श्वासाचा वेग वाढला.

आता त्याला स्पष्ट दिसलं होत की, या वाड्यात तो एकटा नव्हता. अजून कोणीतरी त्याला सोबत होतं.

अचानक...

समोरच्या बंद खोलीचं दार स्वतःहून काही इंच उघडलं.

आतून मंद वारा बाहेर आला.

दार हळूहळू पुन्हा बंद झालं.

समीर काही क्षण त्या दाराकडे पाहत राहिला.

कुतूहल आणि भीती यांच्यात संघर्ष सुरू होता.

शेवटी त्याने टॉर्चचा प्रकाश दारावर टाकला आणि सावधपणे पुढे गेला.

दार उघडताच आत धुळीने भरलेली एक रिकामी खोली दिसली.

तुटकी खुर्ची...

कोपऱ्यात पडलेलं जुनं कपाट...

आणि जमिनीवर पडलेली काचेची फुटकी फ्रेम.

तो आत शिरला.

अचानक...

त्याच्या मागे याहीवेळी दार जोरात बंद झालं.

"धाड!"

समीरने घाबरून दार उघडण्याचा प्रयत्न केला.

दार हलतही नव्हतं.

त्याने जोर लावला.

पुन्हा प्रयत्न केला.

काहीच उपयोग झाला नाही.

त्याच वेळी खोलीत एक कुजबुज ऐकू आली.

ती इतकी मंद होती की शब्द स्पष्ट कळत नव्हते.

पण आवाज नक्कीच एका स्त्रीचा होता.

समीरने टॉर्चचा प्रकाश इकडे-तिकडे फिरवला.

पण आवाज आला असला तरीही कोणीच दिसत नव्हतं.

कुजबुज मात्र थांबत नव्हती.

ती हळूहळू वाढत गेली.

जणू अनेक आवाज एकाच वेळी काहीतरी बोलत होते.

समीरच्या कानात गोंधळ झाला त्याच्या डोक्यात काहीतरी विचित्र प्रकारचं काही तरी कडाडल असे त्याला वाटत होते. समीरने कान झाकले.

"कोण आहे तिथे?"

त्याचा थरथरता आवाज रिकाम्या खोलीत घुमला.

बाकीच कुजबूज चालू असली तरीही त्याच्या प्रश्नाला उत्तर आलं नाही.

फक्त...

अचानक खोलीचं तापमान कमी झालं.

त्याच्या श्वासातून धुरासारखी वाफ बाहेर पडू लागली.

आणि समोरच्या भिंतीवर टॉर्चचा प्रकाश पडताच त्याला काहीतरी वेगळं दिसलं.

धुळीवर कोणीतरी नुकतंच बोट फिरवल्यासारख्या रेषा उमटल्या होत्या.

त्या रेषा हळूहळू एका चिन्हाचा आकार घेत होत्या.

एक डोळा.

आणि त्याच्या मध्यभागी...

एक छोटंसं हृदय.

समीरच्या हातातून टॉर्च जवळजवळ निसटली.

त्याने पुन्हा दार उघडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी दार सहज उघडलं.

तो क्षणाचाही विलंब न करता बाहेर धावत आला.

कॉरिडॉरमध्ये येताच त्याने मागे वळून पाहिलं.

दार पूर्ण उघडं होतं.

आत मात्र पुन्हा शांतता होती.

जणू काहीच घडलं नव्हतं.

समीरने घाईघाईने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

तो मुख्य दरवाजाकडे चालू लागला.

पण त्याला अचानक जाणवलं,

ज्या दिशेने तो चालत होता, त्या दिशेने दरवाजा नव्हता.

तो थांबला.

पुन्हा मागे वळला. आणि

त्याच कॉरिडॉरमध्ये तो गोल गोल फिरत होता.

वाड्याचा मार्ग जणू बदलत होता.

त्याच क्षणी...

दूरवरून एक हलकीशी पावलांची चाहूल त्याच्या कानावर आली.

टक...

टक...

टक...

यावेळी ती चाहूल त्याच्या दिशेने येत होती.

समीरने परत निरागस प्रयत्न केला. टॉर्चचा प्रकाश त्या दिशेने टाकण्याचा.

याआधीप्रमाणे अंधाराशिवाय काहीच दिसलं नाही.

पण ती चाहूल थांबली नव्हती.

त्याचा श्वास वेगाने चालू लागला. आणि अचानक मुख्य द्वार हळूहळू .......

क्रमशः.....


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →