हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टर आणि नर्स तयार होत्या.
कल्याणीला स्ट्रेचरवरून थेट आपत्कालीन विभागात नेण्यात आलं.
रक्तदाब तपासला गेला.
ईसीजी लावण्यात आला.
सलाईन सुरू करण्यात आलं.
काही आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.
नील स्वतः प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होता.
---
जवळपास एका तासानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाले...
त्यांच्या प्रयत्नाने कल्याणीची प्रकृती स्थिर झाली, पण ती अजूनही बेशुद्ध होती.
डॉक्टर म्हणाले,
"शरीरावर थकव्याचा आणि मानसिक ताणाचा मोठा परिणाम दिसतोय. तिला निरीक्षणाखाली ठेवावं लागेल."
यावर नीलने फक्त मान हलवली.
यावर नीलने फक्त मान हलवली.
त्याच्या मनात मात्र वाड्यातलं प्रत्येक दृश्य पुन्हा पुन्हा फिरत होतं.
तेवढ्यात...
समीरच्या रूममधून नर्स धावत आली.
"सर... सर...!"
समीरच्या रूममधून नर्स धावत आली.
"सर... सर...!"
पुढे........
"काय झालं?"
"डॉ. समीर शुद्धीवर आले आहेत." नील लगेच धावत त्याच्या रूममध्ये गेला.
समीर हा जागेवर मान हलवत होता. त्याचे डोळे बंद होते. जनु काही त्याच्या डोळ्यासमोर काही दृश्य फिरत असावेत.
समीर हा जागेवर मान हलवत होता. त्याचे डोळे बंद होते. जनु काही त्याच्या डोळ्यासमोर काही दृश्य फिरत असावेत.
समीरची ही अवस्था पाहून नील काळजीत आला आणि त्याने लगेच त्याच्या माथ्यावर हात ठेवून त्याला आपुलकीने आवाज दिला.
"समीर डोळे उघडत आहे ठीक आहे."
"समीर डोळे उघडत आहे ठीक आहे."
दिल चा आवाज समीरच्या कानावर पडतात, समीरने हळूहळू डोळे उघडले.
त्याने आजूबाजूला अनोळखी नजरेने पाहिलं.
मग हळूहळू त्याची नीलकडे नजर गेली.
"कल्याणी...?"
त्याने पहिलाच प्रश्न केला.
नीलने शांत आवाजात उत्तर दिलं,
"ती सुरक्षित आहे."
"मी तिला त्या वाड्यातून परत आणलं."
हे ऐकून समीरच्या डोळ्यांत पाणी आलं.
"ती... ठीक आहे ना?" समीरने काळजीने हलक्या आवाजात विचारले.
"सध्या बेशुद्ध आहे. पण डॉक्टर उपचार करत आहेत." नील नेही तितक्यात शांततेत त्याला उत्तर दिले.
कल्याणी सुरक्षित आहे हे ऐकून समीरने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला.
समीरच्या डोळ्यांत पाणी आलं.
"मी... तिला थांबवू शकलो नाही. ती यासगळ्यात पूर्णपणे अडकली आहे."
"स्वतःला दोष देऊ नकोस." नील त्याला शांतपणे सांगत होता.
"आधी तू पूर्ण बरा हो."
समीरने मान हलवली.
पण त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसत होती.
काही क्षण दोघेही शांत राहिले.
मग समीर मंद आवाजात म्हणाला,
"नील..."
"तू... त्या वाड्याच्या आत गेला होतास?"
"हो."
"तिथे... काही दिसलं का?"
नील काही क्षण विचारात पडला.
मग शांतपणे म्हणाला,
"दिसलं खूप काही..."
"पण समजलं... अजून काहीच नाही."
हे ऐकून समीरने डोळे मिटले.
त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती स्पष्ट दिसत होती.
आणि त्याच वेळी...
हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एका खिडकीवर पावसाचे थेंब अलगद ओघळत होते.
त्या धुकट काचेवर...
हळूहळू...
जणू एखाद्या अदृश्य बोटाने...
एक चिन्ह उमटू लागलं...
एक डोळा...
आणि त्याच्या मध्यभागी... एक छोटंसं हृदय.
पण त्या क्षणी...
ते चिन्ह पाहण्यासाठी तिथे कोणीच नव्हतं.
---
पहाटेचे साडेपाच वाजले होते.
हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये नेहमीसारखीच शांतता होती. नाईट शिफ्ट संपण्याच्या तयारीत होती. काही नर्स रिपोर्ट लिहित होत्या, तर काही रुग्णांची शेवटची तपासणी करत होत्या.
मात्र आयसीयूच्या बाहेर उभा असलेला नील मात्र पूर्ण रात्र जागीच होता.
त्याच्या डोळ्यांत झोप नव्हती. फक्त नि फक्त काळजी दिसत होती.
समोरच्या काचेआड समीर आणि कल्याणी दोघेही वेगवेगळ्या बेडवर उपचार घेत होते.
रात्रभर दिलेल्या औषधांमुळे कल्याणीचा श्वास आता स्थिर झाला होता. तिचा रक्तदाबही नियंत्रणात आला होता. समीरच्या डोक्यावरील जखमेवर पट्टी बांधण्यात आली होती.
तरीही...
नीलच्या मनातील अस्वस्थता काही कमी होत नव्हती.
त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार तो ओसाड वाडा, वडाचं झाड आणि त्या बंद खोलीचं दार उभं राहत होतं.
---
दोन तासांनी...
कल्याणीच्या बोटांची हलकी हालचाल झाली. तिथे असलेल्या नर्सच्या लगेच हे लक्षात आलं. तिने लगेच नीलकडे धाव घेतली.
"सर, कल्याणी मॅडम ला शुद्ध येत आहे.
नर्सने लगेच नीलला बोलावलं.
नील धावतच तिच्या बेडजवळ आला. आणि तिला आवाज दिला.....
"कल्याणी..."
तिने हळूहळू डोळे उघडले.
तिची नजर काही क्षण इकडे-तिकडे फिरली. ती ही समीर प्रमाणे अनोळखी नजरेने सर्व पाहू लागली.
"मी..."
"इथे कशी आले?" तिच्या सुकलेल्या ओठातून शब्द बाहेर पडले.
नील ने तिला काहीही उत्तर दिले नाही. आणि पहिले नीलने तिची नाडी तपासली. मग तो म्हणाला,
"तुला काही आठवतंय का?"
तिने डोळे मिटून डोक्याला हात लावला आणि आठवण्याचा प्रयत्न केला.
"मी... मी..."
"घरी होते."
"मग..."
ती अचानक थांबली.
तिच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"मला... याशिवाय काहीच आठवत नाही."
नील शांत झाला.
त्याने पुढे काही विचारलं नाही. ठीक आहे तू जास्त ताण घेऊ नकोस. आता आराम कर.
कारण त्याला अपेक्षित उत्तर तेच होतं.
---
दुपारपर्यंत दोघांची प्रकृती सुधारत गेली.
डॉक्टरांनी सांगितलं—
समीरला दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवावं लागेल. त्यासोबतच कल्याणीलाही पूर्ण विश्रांतीची गरज होती.
---
संध्याकाळ झाली.
बाहेर पुन्हा हलका पाऊस सुरू झाला.
नील तिथेच केबिनमध्ये बसून रिपोर्ट्स पाहत होता.
पण त्याचं लक्ष कामात नव्हतं.
तो वारंवार सीसीटीव्ही फुटेज तपासत होता.
समीरच्या घराचं...
हॉस्पिटलचं...
पार्किंगचं...
पण कुठेही संशयास्पद काही दिसत नव्हतं.
---
रात्री साडेदहा वाजता...
नर्स पूजा घाबरतच नीलच्या केबिनमध्ये आली.
"सर..."
"आयसीयूमध्ये विचित्र प्रकार घडतोय."
नील लगेच उठला.
"काय झालं?"
"कल्याणी मॅडम झोपेत आहेत."
"पण त्यांच्या मॉनिटरचे रीडिंग अचानक बदलत आहेत."
दोघे धावत आयसीयूमध्ये पोहोचले.
मॉनिटरवर सर्व काही काही सेकंद सामान्य होतं.
मग अचानक...
हृदयाचे ठोके वाढू लागले.
बीप...
बीप...
बीप...
आणि पुन्हा काही सेकंदात सर्व सामान्य.
नीलने मशीन तपासलं.
काही दोष नव्हता.
त्याने कल्याणीची तपासणी केली.
तिचा श्वास शांत होता.
ती गाढ झोपेत होती.
---
"कदाचित सेन्सर सैल झाला असेल."
नील स्वतःलाच समजावत म्हणाला.
पण...
तो बोलत असतानाच...
कल्याणीच्या बंद डोळ्यांतून एक अश्रू हळूच बाहेर आला.
ती अजूनही झोपेतच होती.
---
त्याच वेळी...
समीरच्या बेडजवळ ठेवलेला पाण्याचा ग्लास हलकासा थरथरला.
पूजाने काचातून ते पाहिलं.
"सर..."
नीलने मागे वळून पाहिलं.
पण त्याने पाहताच ग्लास स्थिर झाला.
"भास झाला असेल."
तो तिला म्हणाला.
---
मात्र...
आयसीयूच्या बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये...
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक सावली क्षणभर दिसली.
पांढऱ्या कपड्यातील एखादी स्त्री कॉरिडॉरच्या टोकाशी उभी होती.
ड्युटीवरील सुरक्षा रक्षकाने लगेच त्या दिशेने धाव घेतली.
पण...
तिथे कोणीच नव्हतं.
---
रात्र वाढत गेली.
नीलने दोघांनाही सौम्य निद्रादायक औषध दिलं.
"आज तरी शांत रात्र जाऊ दे..."
तो मनात म्हणाला.
---
मध्यरात्री बारा वाजून काही मिनिट झाले असतील,
आयसीयूतील सर्व दिवे क्षणभर लुकलुकले.
जनरेटर सुरू झाला.
वीज पुन्हा आली.
सगळं पूर्ववत झालं.
पण...
त्या काही सेकंदांच्या अंधारात...
कल्याणी झोपेतच अगदी मंद आवाजात पुटपुटत होती.....
"सावध व्हा...ती अजून... इथेच आहे..."
नीलने ते स्पष्ट ऐकलं.
तो तिच्याजवळ गेला.
"कल्याणी? काय झाले."
ती पुन्हा शांत झाली.
जणू काही बोललीच नव्हती.
---
पहाटेच्या सुमारास...
समीरची झोप अचानक उघडली.
त्याने त्याची नजर असावधपणे चहूबाजूंनी फिरवली. आणि समोर पाहतच....
आयसीयूच्या काचेपलीकडे...
कॉरिडॉरच्या टोकाशी...
एक स्त्री काही क्षण उभी असल्यासारखी त्याला दिसली.
तिचे लांब केस चेहऱ्यावर आले होते.
ती हलली नाही.
फक्त उभी होती.
समीर घाबरून उठण्याचा प्रयत्न करू लागला.
"नील..."
त्याने पूर्ण ताकदनिशी हाक मारली.
नील धावत आला.
"समीर काय झालं?"
"तिथे..."
समीरने थरथरत्या हाताने कॉरिडॉरकडे बोट दाखवलं.
नीलने मागे वळून पाहिलं.
कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता.
"तिथे कोणी नाही."
समीर काही बोलला नाही.
कारण...
त्याला खात्री होती.....
त्याने कोणालातरी पाहिलं होतं.
---
त्याच क्षणी...
हॉस्पिटलच्या जुन्या रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेल्या अनेक वर्षांपूर्वीच्या फाईलींच्या कपाटातून...
एक जुनी फाईल स्वतःहून खाली पडली.
त्या फाईलच्या मुखपृष्ठावर धुळीतून एक शब्द स्पष्ट दिसत होता—
"प्रकरण क्रमांक १७..."
आणि त्याच्या खाली...
एक नाव लिहिलेलं होतं. जे अस्पष्ट झालं होतं वाचता येत नव्हते.
नीलला याची अजून कल्पनाही नव्हती...
पण त्या फाईलमध्ये दडलेलं सत्य त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरणार होतं.
