वाड्याच्या आत...
कल्याणीने थरथरत एक पाऊल उंबरठा ओलांडून आत टाकलं.
घरात पूर्ण अंधार होता.
जुन्या लाकडाचा आणि ओलसर मातीचा वास दरवळत होता.
भिंतींवर धुळीचे जाड थर होते.
मात्र...
एका बंद खोलीच्या दाराखालून...
अतिशय मंद...
लालसर प्रकाश बाहेर येत होता.
कल्याणी नकळत त्या दाराकडे चालू लागली.
ती दारासमोर येऊन थांबली.
आतून एक मंद स्त्रीस्वर ऐकू आला—
"...इतक्या वर्षांनी... शेवटी... तू आलीस..."
कल्याणीचा हात दाराच्या कडीवर गेला.
आणि त्याच क्षणी...
दूरवरून नीलच्या कारचे हेडलाईट्स त्या वाड्याच्या भिंतींवर पडले...
पण त्याला अजून कल्पनाही नव्हती...
की त्या दाराच्या पलीकडे फक्त एक रहस्य नव्हतं—
तर अनेक वर्षांपूर्वी दडपून टाकलेलं एक सत्य त्याची वाट पाहत होतं.
पुढे......
नीलची कार चिखलाने भरलेल्या कच्च्या रस्त्यावरून वेगाने पुढे जात होती.
मुसळधार पावसामुळे समोरचं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं.
वायपर सतत चालू होते, पण पावसाचा मारा इतका प्रचंड होता की प्रत्येक काही सेकंदांनी काच पुन्हा धूसर होत होती. त्यामुळे पुढचे काहीही दिसत नव्हते.
अचानक...
समोर अंधारात त्या जुन्या वाड्याचं गेट हेडलाईटच्या प्रकाशात दिसू लागलं.
गंजलेलं लोखंडी गेट...
एका बाजूला तुटलेलं कुंपण...
आणि त्यामागे उभा असलेला काळोखात हरवलेला वाडा.
नीलने कार थांबवली.
इंजिन बंद होताच आजूबाजूला एक विचित्र शांतता पसरली.
फक्त पावसाचा आवाज...
आणि अधूनमधून होणारा विजांचा कडकडाट.
त्याने टॉर्च, मोबाईल आणि कारमधील फर्स्ट-एड बॅग घेतली.
गेट ढकलताच...
"कर्कररर..."
त्या आवाजाने जणू संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्याच्या कानावर जनु कोणी किंचाळी केली असे त्याला वाटले.
---
वाड्याच्या अंगणात पाऊल टाकताच त्याच्या पायाखाली सुकलेल्या पानांत साचलेल्या पाण्याच्या पिचकऱ्या उडाल्या.
जुन्या विहिरीजवळ तुटलेली दगडी मूर्ती पडली होती.
भिंतींवर हिरव्या शेवाळाचा थर चढला होता.
खिडक्यांच्या चौकटी मोडकळीस आल्या होत्या. आत जाताच एक उग्र वास त्याला येऊ लागला.
एका विजेच्या चमक्यात नीलची नजर समोरच्या भिंतीवर गेली...
भिंतीवर एक मोठं चित्र होतं.
धुळीने झाकलेलं.
त्याने हात फिरवून धूळ बाजूला केली.
चित्रात एका कुटुंबातील चार माणसं उभी होती.
पण...
त्या चौघांच्या चेहऱ्यावर धारदार वस्तूने खोल ओरखडे मारलेले होते.
जणू कुणीतरी मुद्दाम त्यांचे चेहरे नष्ट केले होते.
फक्त.....
नील काही क्षण चित्राकडे पाहत राहिला.
"हे कोण असतील...?"
त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला. यांचे काय झाले असेल,
पण त्याने या सगळ्या विचारातून स्वतःला बाहेर काढले. कारण त्याला आधी कल्याणीचा शोध घेणे महत्वाचे होते. म्हणून त्याने आधी कल्याणीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
---
त्याने हळूच मुख्य दरवाजा ढकलला.
दार उघडताच कुजलेल्या लाकडाचा आणि ओलसर मातीचा वास नाकात शिरला.
आत पूर्ण अंधार होता. नजरेस काहीही दिसत नव्हते. त्याने टॉर्च काढली. टॉर्चचा प्रकाश भिंतीवर फिरू लागला.
भिंतींवर जुन्या काळातील अनेक चित्रं होती.
काही चित्रांचे रंग पूर्ण उडाले होते.
काही फ्रेम तुटलेल्या होत्या.
एका भिंतीवर मोठं घड्याळ लटकत होतं.
त्याचे काटे...
रात्री ३:१७ वर थांबलेले होते.
नीलच्या अंगावर शहारे आले.
हीच वेळ...
यापूर्वीही त्याने पाहिली होती.
---
तो सावधपणे पुढे चालत होता. कल्याणी कुठं नजरेस पडते का ते पाहत होता.
प्रत्येक पावलागणिक जमिनीवरील लाकूड किरकिरत होतं.
अचानक...
वरच्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा आवाज आला.
"धाड!"
तसा निलच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याची पाऊले जागेवर खिळल्या गेली. पण मनात कल्याणीची काळजी होती. ती त्याला स्वस्त राहू देत नव्हती.
नीलने ज्या दिशेने आवाजा आला टॉर्च त्या दिशेने रोखली.
त्याला तिथंकाहीच दिसलं नाही. शांतता भंग करत
"कल्याणी...!"
त्याने तिच्या नावाने हाक मारली.
पण त्याच्या हाकेला उत्तर मिळाले नाही.
"कल्याणी... माझा आवाज ऐकू येतोय का? तू आतमध्ये आहेस का?"
पण पुन्हा तिथे त्याचा आवाज बंद होताच शांतता पसरली.
---
तो तिथेच न थांबता हळूहळू जिन्याकडे गेला.
जिना जुना होता.
प्रत्येक पायरीवर पाऊल ठेवताना त्याच्या मनात नवीन विचार घर करत होता.
वर पोहोचल्यावर लांब कॉरिडॉर दिसला.
दोन्ही बाजूंना बंद खोल्या.
काही दारं अर्धवट उघडी.
काही पूर्ण बंद.
कॉरिडॉरच्या शेवटी एक खिडकी उघडी होती.
तिथून पडदा वाऱ्यावर हलत होता.
त्या हलणाऱ्या पडद्यामुळे त्याला तिथे कोणी व्यक्ती उभी असल्याचा भास झाला.
तो धावत तिकडे गेला. त्याला वाटले ती कल्याणीच असू शकते.
पण...
तिथे त्याला जवळ जाताच कोणीच दिसले नाही. फक्त वाऱ्यावर उडणारा खिडकीचा मळकट पडदा होता.
---
तेवढ्यात...
त्याच्या कानावर अतिशय मंद आवाज आला.
जणू कोणीतरी खोल श्वास घेत होता.
नील शांत झाला. त्याने कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला.
त्याने आवाजाच्या दिशेने टॉर्च फिरवला.
कॉरिडॉरच्या शेवटच्या खोलीचं दार अर्धवट उघडं होतं.
आवाज तिथून येत होता.
तो हळूहळू दाराजवळ गेला.
त्याने हात पुढे केला. लगेच त्याच्या मनात काही विचार आला आणि त्याने हात मागे घेतला. पण काही वेळाने परत हात पुढे करून त्याने दार ढकललं.
दार आवाज करत उघडलं...
आत पाऊल टाकताच जे दिसले ते पाहून त्याला धक्का बसला...
समोर जमिनीवर कोणीतरी उलटं पडलेलं होतं. ज्याचे कपडे फाटलेले, अंगावर पूर्ण जखमा, नखातून रक्त निघत होते त्यावर माती दिसत होती. केस पूर्ण विस्कटलेले.
"कल्याणी!" त्याच्या तोंडातून तिचे नाव निघाले. आणि
नील धावत तिच्याजवळ गेला. तिला त्याने हाताने सरळ केले.
---
कल्याणी पूर्ण बेशुद्ध होती.
तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.
हातावर माती आणि रक्ताचे डाग होते.
नखं पूर्ण तुटलेली रक्ताळलेली होती.
तिचा श्वास मंद पण नियमित चालू होता.
नीलने तातडीने तिची नाडी तपासली.
ती जिवंत होती.
त्याने तिच्या डोळ्यांवर टॉर्च टाकून प्रतिसाद तपासला.
तिचा प्रतिसाद मंद होता.
"कल्याणी... ऐकू येतंय का?"
तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
त्याने पुन्हा हाक मारली.
"कल्याणी... डोळे उघड."
ती हललीही नाही.
---
त्याने पाण्याच्या बाटलीतलं पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं. तिचा न मिळालेला प्रतिसाद पाहता .....
नीलने लगेच तिच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले.
तिच्या कपाळावरची जखम स्वच्छ केली.
हातावरील रक्त पुसलं.
पण ती शुद्धीवर येत नव्हती.
त्याच्या मनात काळजी वाढू लागली.
"इथे एक क्षणही थांबणं योग्य नाही."
---
त्याने कल्याणीला काळजीपूर्वक उचललं.
ती पूर्ण निश्चल होती.
तिला खांद्यावर घेत तो जिन्याकडे वळला.
तेवढ्यात...
संपूर्ण वाड्यात एक जोरदार वाऱ्याचा झोत फिरला.
वरच्या मजल्यावरील अनेक दारं एकाच वेळी आपटली.
धाड! धाड! धाड!
नील दचकला.
पण थांबला नाही.
तो वेगाने खाली उतरू लागला.
---
मुख्य दरवाजाजवळ येताच त्याला असं जाणवलं...
जणू कुणीतरी त्याच्याकडे पाहत आहे.
त्याने मागे वळून पाहिलं.
वरच्या बाल्कनीत...
अंधारात...
क्षणभर एखादी सावली उभी असल्यासारखी वाटली.
विज चमकली.
प्रकाश पडला.
आणि...
तिथे कोणीच नव्हतं.
"हा माझा भास होता..."
तो स्वतःशी म्हणाला.
---
नीलने कल्याणीला कारमध्ये झोपवलं.
गाडी सुरू केली.
मुसळधार पावसातून तो पुन्हा शहराच्या दिशेने निघाला.
---
हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टर आणि नर्स तयार होत्या.
कल्याणीला स्ट्रेचरवरून थेट आपत्कालीन विभागात नेण्यात आलं.
रक्तदाब तपासला गेला.
ईसीजी लावण्यात आला.
सलाईन सुरू करण्यात आलं.
काही आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.
नील स्वतः प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होता.
---
जवळपास एका तासानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाले...
त्यांच्या प्रयत्नाने कल्याणीची प्रकृती स्थिर झाली, पण ती अजूनही बेशुद्ध होती.
डॉक्टर म्हणाले,
"शरीरावर थकव्याचा आणि मानसिक ताणाचा मोठा परिणाम दिसतोय. तिला निरीक्षणाखाली ठेवावं लागेल."
यावर नीलने फक्त मान हलवली.
यावर नीलने फक्त मान हलवली.
त्याच्या मनात मात्र वाड्यातलं प्रत्येक दृश्य पुन्हा पुन्हा फिरत होतं.
तेवढ्यात...
समीरच्या रूममधून नर्स धावत आली.
"सर... सर...!"
समीरच्या रूममधून नर्स धावत आली.
"सर... सर...!"
