Login

साया -30

समीरची झालेली अवस्था पाहून नील ने घेतला एक निर्णय.


ती मंद आवाजात मान तिरपी करून, चेहऱ्यावर क्रूरता दाखवत म्हणाली.

"मी सांगितलं होतं ना...

माझ्या आड येऊ नकोस."

समीरचा घसा कोरडा पडला. त्याचे अंग घामाने भिजले, हातपाय थरथरु लागले. तोंडातून शब्द यायला तयार नव्हते. तरीही त्याने हिंमत करून तिला सांगितले,

"तू... तू माझी कल्याणी नाहीस..."

हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा भाव एका क्षणात बदलला.

तिचे डोळे रागाने लाल झाले.

ती जोरात किंचाळली. एव्हढी की

त्या किंचाळीचा आवाज संपूर्ण फ्लॅटमध्ये घुमला. समीरच्या कानात किर्रेर्र असा आवाज घुमू लागला. त्याने दोन्ही हात दोन कानावर ठेवले आणि त्याच्या काही लक्षात येण्या आधीच,

पुढच्याच क्षणी...

तिने बाजूला ठेवलेली जड लाकडी खुर्ची दोन्ही हातांनी उचलली. क्षणभर ती हवेत धरून ठेवली. आणि पूर्ण ताकदीने भिंतीकडे फेकून दिली.

धाड!

भिंतीवर लावलेला फोटो तुटून खाली पडला. काचेचे तुकडे पूर्ण खोलीत चार बाजूंना उडाले.

त्या आवाजाने समीर अजूनच घाबरला. आणि हळूहळू मागे सरकू लागला.

हे पाहून कल्याणी अजूनच रागात आली. .....


                           पुढे.......


तिने टेबलाला एक जोरात लाथ मारली.

आणि टेबल खाली पडले.

त्यावरील पुस्तके, फाईली, लॅपटॉप, फुलदाणी सगळं जमिनीवर पडलं.

शोकेसमधील वस्तू एकामागोमाग खाली कोसळू लागल्या.

काही सेकंदांत व्यवस्थित असलेली खोली रणांगणासारखी दिसू लागली. सर्वत्र तुटलेल्या वस्तू, पुस्तक, काच पडलेले दिसू लागले. हे सगळं पाहून समीरला तिच्या जखमा ही दिसत होत्या. त्या त्याला खूप वाईट वाटत होते तो तिला सावरण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न करत होता.

कल्याणी ज्यावेळेस शांत उभी राहत होती. त्यावेळेस त्याला तीच्यामध्ये त्याची बायको दिसून येत होती. म्हणून तू तिला रोखण्याचा प्रयत्न करत होता.

समीर तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला सोबतच तिला त्याने आवाजही दिला.

"कल्याणी! थांब कल्याणी!  माझं ऐक!"

ती त्याच्याकडे झपाट्याने वळली.

दोघांमध्ये फक्त काही फुटांचं अंतर होतं.

तिने कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्याला जोरात ढकललं. तिची स्पीड एवढी जास्त होती की समीरला नेमकं काय झाले हेही लक्षात आले नाही. आणि तो.....

समीर जोरात हवेतच मागे फेकला गेला.

त्याचं डोकं सोफ्याच्या कडेला आदळलं.

तो तितक्याच प्रेशर ने खाली कोसळला.

त्याच्या  कपाळाला जोरात धडका बसला, त्याला जखम झाली. त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागलं.

काही क्षण त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली.

तो उठण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता.

पण त्याच शरीर त्याला साथ देत नव्हतं.

कल्याणी काही क्षण त्याच्याकडे निर्विकारपणे पाहत राहिली.

मग...

ती हळूहळू मुख्य दरवाजाकडे चालू लागली.

दरवाज्याजवळ पोहोचल्यावर ती काही क्षण तिथेच थांबली.

एकदाही मागे न पाहता तिने दार उघडलं. आणि बाहेर निघून गेली.

...

इमारतीबाहेर येताच तिने एक रिकामी रिक्षा थांबवली.

रिक्षाचालकाने मागे वळून पाहल. त्याला कल्याणीच्या चेहऱ्यावरचे हावभाव जरा विचित्रच वाटले. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण या वेळेस ती फार भीतीदायक नसून जरा शांत आणि निस्तेज अशी होती. त्याने समोर पाहून त्याला विचारले,

"कुठे जायचं मॅडम?"

काही क्षण ती शांत राहिली.

मग मंद आवाजात एका शहराबाहेरील जुन्या वाड्याचं नाव सांगितलं.

रिक्षा तिथून स्टार्ट झाली. आणि रस्त्यावर धावू लागली.

शहर हळूहळू मागे पडत होतं. दिवे लांब जात होते. पूर्ण रस्ता रिकामा होता. पूर्ण शांतता पसरली होती. मात्र कल्याणी ही कधी शांत, तर कधी स्वतःच एकटी मान हलवत होती आणि चेहऱ्यावर क्रूर हास्य आणत होती. काही वेळाने ती पूर्ण स्तब्ध होऊन बसली.  ऑटो ड्रायव्हर तिच्यावर समोरच्या काचातून लक्ष ठेवून होता. आता त्याला ही भीती वाटू लागली होती. पण बिचारा काहीही बोलू शकत नव्हता आणि काही करू ही शकत नव्हता.

संध्याकाळचं आभाळ काळ्या ढगांनी भरून गेलं होतं.

रिक्षा शेवटी एका जुन्या, मोडकळीस आलेल्या घराजवळ थांबली.

आजूबाजूला कोणीही नव्हतं.

वर्षानुवर्षे बंद असल्यासारखं ते घर दिसत होतं.

गंजलेलं लोखंडी फाटक.

तुटलेलं कुंपण.

भेगा पडलेल्या भिंती.

घराच्या समोर एक प्रचंड जुनं वडाचं झाड उभं होतं.

त्याच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या.

वारा सुटला की त्या हलत होत्या. जणू काही एखाद्या वाऱ्याच्या झोक्याने ते सर्वकाही कोलमडून पडेल.असे वाटत होते.

कल्याणी शांतपणे रिक्षेतून उतरली.

तिने घराकडे पाहिलंही नाही.

ती सरळ त्या वडाच्या झाडाकडे चालू लागली.

झाडाखाली पोहोचल्यावर ती अलगद बसली.

तिने डोळे मिटले.

जणू...

ती कोणाची वाट पाहत होती.

...

दरम्यान...

नील शक्य तितक्या वेगाने गाडी चालवत समीरच्या फ्लॅटकडे निघाला.

समीरचा थरथरता आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता.

"नील लवकर ये..."

गाडी इमारतीसमोर थांबताच तो धावत वर गेला.

फ्लॅटचं दार अर्धवट उघडं होतं.

"समीर!"

त्याने आतमध्ये पाऊल ठेवता हा पायाखाली काचेचे तुकडे आले. त्याचा आवाज त्याला आला. त्याने लगेच सर्वत्र नजर टाकली.
त्याने आजूबाजूला पाहिलं...

आणि तो जागेवरच थबकला.

संपूर्ण हॉलमधील साहित्य उद्ध्वस्त झाले होते.

फर्निचर मोडलं होतं.

खुर्च्या तुटल्या होत्या.

टेबलाचे तुकडे विखुरले होते.

भिंतीवरील चित्रं खाली पडली होती.

फुटलेल्या काचेवर रक्ताचे काही ठिपके दिसत होते.

नीलच्या छातीत धडधड वाढली. मनातं भीती निर्माण झाली. आणि त्याच्या मनात लगेच समोर बद्दल विचार आला. त्याने त्याला आवाज देण्यास सुरुवात केली..


"समीर!"

त्याला समोरचे उत्तर मिळाले नाही.

"समीर... कुठे आहेस?"

त्याचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता.
"समीर"

तो प्रत्येक खोलीत धावत गेला.

स्वयंपाकघर.

बेडरूम.

बाल्कनी.

कोणीच नव्हतं.

त्याने पुन्हा घाबरून जीवाच्या आकांताने मोठ्याने हाक मारली.

"समीर!"

यावेळी...

अगदी मंद कण्हण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला.

"...नील..."

तो क्षणभर थांबला.

आवाज पुन्हा आला.

"...इकडे..."

नीलने आवाजाच्या दिशेने पाहिलं.

हॉलमधील मोठ्या सोफ्याच्या मागे काहीतरी हलल्यासारखं दिसलं. आणि हळूहळू एक हात रक्ताने माखलेला त्याला नजरेस पडला.

तो धावत तिकडे गेला.

आणि...

त्याला धक्काच बसला. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

समीर तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

त्याच्या कपाळावर खोल जखम झाली होती.

शर्ट रक्ताने माखला होता.

श्वास चालू होता.

पण तो अत्यंत कमकुवत दिसत होता.

"समीर!"

नील त्याच्या जवळ काच बाजूला सारून गुडघ्यावर बसला.

"हे काय झालं?"

समीरने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.

त्याचे ओठ थरथरत होते.

"ती..."

"ती... निघून गेली..."

"कोण?"

"...कल्याणी..."

"...पण..."

तो बोलताना थांबला.

त्याच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती.

"...ती... एकटी नव्हती..."

हे ऐकताच नीलचा चेहरा गंभीर झाला.

"याचा अर्थ काय?"

समीरने थरथरत्या हाताने मुख्य दरवाज्याकडे बोट दाखवलं.

"ती... शहराबाहेर... जाताना दिसली."

"ती... जुन्या घराकडे..."

"वडाच्या... झाडाजवळ..." गेली असेल. त्याशिवाय तिकडे काही नाही. निलच्या मनात विचार आला. तो समीरला म्हणाला, तू काळजी नको करुस मी परत आणतो तिला. हे ऐकून त्याने डोळे मिटले.

तो बेशुद्ध झाला.

नीलने तात्काळ त्याची नाडी तपासली.

ती चालू होती.

त्याने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला.

पण त्याच्या मनात आता एकच विचार घुमत होता....

कल्याणी त्या ओसाड घरात का गेली? तिथे त्या अदृश्य शक्तीबद्दल काही माहिती मला मिळेल का? कदाचित त्या आत्म्याचा आणि त्या जागेचा काही संबंध असू शकतो. मी तिथे जाणे आवश्यक आहे.

आणि त्या वडाच्या झाडाखाली ती काय करत असेल?
तेव्हाचबाहेर अचानक विजांचा कडकडाट झाला.

खिडकीतून आलेल्या वाऱ्याने जमिनीवर पडलेला एक कागद नीलच्या पायाशी येऊन थांबला.

त्याने तो उचलला.

त्या कागदावर फक्त एकच चिन्ह होतं रक्ताने काढलेले...

एक डोळा...

आणि त्याच्या मध्यभागी... एक छोटंसं हृदय.

आता नीलला खात्री झाली होती...

त्या चिन्हाचा कल्याणी, समीर आणि ती अदृश्य शक्ती म्हणजे तो आत्मा, ते जुनं घर याचा काहीतरी नक्कीच संबंध आहे. तो शोधने आता आवश्यक आहे. त्याशिवाय या सर्वातून त्यांची सुटका होणे कठीण आहे.

"रक्ताने काढलेला डोळा... आणि त्याच्या मध्यभागी असलेलं हृदय... हा फक्त एक इशारा होता की मृत्यूची सुरुवात?"
तुमच्या मते त्या जुन्या वाड्यात नीलला काय सापडेल? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा भाग आणखी रहस्यमय आणि थरारक असेल! वाचत रहा....."साया."


पुढील भागासाठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि भाग कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा तुमची छोटीशी कमेंट मला पुढील भाग लिहिण्याचे प्रोत्साहन देते. धन्यवाद.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →