Login

साया - 29

कल्याणी च्या हातून परत झाला समीर चा घात.
संध्याकाळी जवळपास सातच्या सुमारास तो घरी परतला.

दार उघडताच त्याला घरात अंधार जाणवला. त्याने घरात जाताच तिला आवाज दिला......

"कल्याणी?"

पण मागच्या सारखे याहीवेळी तसेच झाले.  त्याला उत्तर मिळाले नाही.

त्याने घरातील लाईट लावले.

ती हॉलमध्येही नव्हता. हॉलमध्ये रिकामा होता.

त्याने किचनमध्ये जाऊन ही पाहिले, तेही शांत होतं. त्याने बाहेर येऊन परत एकदा आवाज दिला.....

"कल्याणी?"

या वेळी त्याचा आवाज थोडा मोठा झाला.

त्याला बेडरूमचं दार अर्धवट उघडं दिसलं. हळूहळू तो त्या दिशेने चालत गेला. हळूच त्याने आत डोकावले. नंतर तो आत गेला. त्याने खोलीत पूर्ण नजर फिरवली.

कल्याणी खिडकीजवळ उभी होती. तिची पाठ त्याच्याकडे होती. ती पूर्णपणे स्थिर होऊन उभी होती. जनु काही पुतळा उभा केला असावा.

"कल्याणी..."

ती त्याच्या आवाजाने जराही हलली नाही.

"परत काही झाले का?"

समीर तिच्याजवळ गेला.

"तुझी तब्येत ठीक आहे ना?"

हळूहळू ती त्याच्याकडे वळली.

तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता.

डोळे निर्विकार.

"मी ठीक आहे."

आवाज शांत होता.

पण त्यात नेहमीची ऊब नव्हती.

समीरने हसण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी त्याच्या मनात थोडी भीती होती. तरीही त्याने तिला विचारले,

"आज इतकी शांत का आहेस?"

क्षणभर ती काही ही न बोलता गप्प राहिली.

मग ती म्हणाली,

"तुला शांतता आवडत नाही का?"

समीरला तिचं बोलणं विचित्र वाटलं. त्याच्या मनात एक भीतीची लहर निर्माण झाली.

"तसं नाही... पण तू अशी कधी वागत नाहीस ना म्हणून मी विचारले."

हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलू लागला.

भुवया आकुंचनल्या.

श्वास जोरात होऊ लागला.

"म्हणजे?"

"मी कस वागायला हवं?"

समीर तिचे शब्द कानावर पडताच दचकला. त्याच्या मनातील भीती अजूनच वाढली.

"अगं, मी तसं काही म्हणालो नाही."

"मग काय म्हणालास?"

तिचा आवाज आता चढला होता.

"तुला माझ्यात नेहमी काहीतरी चूकच दिसते!"

"कल्याणी, शांत हो..."

"मला शांत राहायला सांगू नकोस!"

ती अचानक मोठ्याने ओरडली.

तो एव्हढा घाबरला की, नकळत समीर दोन पावलं मागे सरकला.

तो तिला समजावण्यासाठी पुढे झाला.

"ऐक, आपण बसून बोलूया."

त्याने तिच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला.

पुढच्याच क्षणी...

तिने जोरात त्याला ढकललं.

समीरचा तोल गेला. आणि तो मागे जाऊन भिंतीवर आपटला.


                        पुढे.......



"कल्याणी!" त्याने आवाजाचा जोर वाढवत तिचे नाव उच्चारले. कदाचित ती त्याचा हात धरून त्याला पडण्यापासून वाचवेल ही त्याची अपेक्षा होती. पण

उलट ती त्याच्याकडे रागाने पाहत होती. जनु काही आता त्याला संपविल्याशिवाय गप्पा बसणे नाही एवढी द्वेषाने भरलेला तिचा चेहरा दिसत होता.

तिच्या डोळ्यांत एक वेगळाच कठोरपणा होता. जणू ती त्याला ओळखतच नव्हती.

"सांगितले होते ना माझ्याजवळ येऊ नकोस!"

ती पुन्हा ओरडली.

समीरने चांगलाच गोंधळला आणि घाबरला होता. खूप उशिरा त्याच्या लक्षात आले नीलला फोन करायचे. नीलला फोन करण्यासाठी त्याने खिशातून मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला.

तेवढ्यात...

कल्याणीची नजर काहीतरी शोधत होती. आणि अचानक तिची नजर खोलीतील कॉटकडे गेली.

ती वेगाने त्या दिशेने गेली. ती जात असताना समीरने तिला पाहिले. समीरला वाटलं ती त्यावर जाऊन बसणार. किंवा काही शोधत असेल..

पण पुढच्या क्षणी जे घडलं, ते पाहून भयंकर होते. ते पाहता क्षणी त्याच्या अंगावर शहारे आले.

तिने कॉटच्या खालच्या बाजूला हात घातला.

आणि एका झटक्यात तिने तो एकाच हाताने उचलला.

समीरचे डोळे विस्फारले. तो तिला एका अनोळखी घाबरलेल्या नजरेने बघत होता. नकळत त्याच्या तोंडातून शब्द निघाले.

"हे... कसं शक्य आहे..."

तो जे पाहत होता त्यावरच  त्याचा विश्वास बसला नाही. त्यात अजून भर म्हणजे

तिने ती कॉट तशीच एका हाताने वर उचलली आणि बाजूला फेकून दिली.

धाड!

कॉट खिडकीवर आदळली. आणि खिडकीचे काच फुटण्याचा जोरात आवाज आला.

काचेचे तुकडे संपूर्ण खोलीत विखुरले.

फुटलेल्या काचेचे काही तुकडे उडून कल्याणीच्या हातावर आणि कपाळाजवळ लागले.

त्यामुळे तिला बारीक जखमा झाल्या.

रक्ताचे काही थेंब तिच्या गालावरून ओघळू लागले.

पण...

तिच्या चेहऱ्याचे हा भाव थोडेही बदले नाही जणू तिला त्याचा काही फरक पडला नाही. तिला जणू काही वेदनाच होत नव्हत्या.


ती तशीच उभी राहून होती आणि नंतर तिने तिचा मोर्चा परत समीर कडे वळविला. मला पाहताच

तिच्या ओठांवर हळूहळू एक विचित्र हास्य उमटलं.

समीरने थरथरत्या हातांनी नीलला फोन लावला.
"ह.....हॅलो....."

"नील...."

"नील... लगेच ये!"

समीरचा आवाज ऐकून नील ही जरा घाबरला"काय झालं?"

"कल्याणी... तिचं वागणं पुन्हा बदललं आहे... आणि..."

त्याचा आवाज थरथरला.

"तिने... कॉट उचलून फेकली."

फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली.

"मी लगेच येतो. तोपर्यंत तिच्यापासून सावध रहा. तिला चिडवू नकोस. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न ही करु नको. आणि जर ती स्वतःला किंवा तुला इजा करण्याचा प्रयत्न करत असेल तर लगेच आपत्कालीन नंबर वर कॉल करून मदत मागव."


समीरने मान डोलावली, जरी नील त्याला पाहू शकत नव्हता.

फोन ठेवून त्याने पुन्हा कल्याणीकडे पाहिलं.

ती फुटलेल्या खिडकीजवळ उभी होती.

बाहेरून थंड वारा आत येत होता.

तिचे केस वाऱ्यावर हलत होते.

तिच्या हातावरून रक्ताचे थेंब हळूहळू जमिनीवर पडत होते.

पण तिची नजर...

ती अजूनही समीरवरच खिळलेली होती.

आणि त्या नजरेत असा गूढ भाव होता की समीरला तिची भीती वाटत होती. त्याशिवाय त्याला कल्याणी मध्ये दुसरे काहीही दिसत नव्हते.

समीर अजूनही थरथरत उभा होता. एका फुकेत तो खाली पडेल अशी त्याची अवस्था झाली होती.

त्याच्या डोळ्यांसमोर फुटलेल्या खिडकीच्या काचेचे तुकडे विखुरलेले होते.

बेड बाजूला उलटलेला होता.

खोलीत धुळीचा हलका स्तर पसरला दिसत होता.

समोर...

कल्याणी निश्चल उभी होती.

तिच्या कपाळावरून रक्ताचा थेंब  गालावरून खाली येत होता.

पण तिच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता.

ती शांत होती...

इतकी शांत की ती शांतताच अधिक भीतीदायक वाटत होती.

"कल्याणी..."

समीरने पुन्हा एकदा हाक मारली.

यावेळी तिने हळूहळू मान त्याच्याकडे वळवली.

तिच्या ओठांवर एक विचित्र स्मित उमटलं.

अचानक...

ती मोठ्याने हसू लागली. समीरला स्पष्ट जाणवत होते की, हे सगळे कल्याणीचे हसणे नाही. ती एवढी क्रूर असू शकत नाही. ती त्याला असा त्रास कधीही देणार नाही.

ते हसू कल्याणीचं नव्हतं.

त्यात ओळखीचा गोडवा नव्हता, तिचे प्रेम, आपुलकी काहीही त्याला जाणवले नाही.

ते कोरडं...

रिकामं...

भीतीदायक.....

आणि अंगावर काटा आणणारं होतं.

"तू अजून इथेच आहेस...?"

ती मंद आवाजात मान तिरपी करून, चेहऱ्यावर क्रूरता दाखवत म्हणाली.

"मी सांगितलं होतं ना...

माझ्या आड येऊ नकोस."

समीरचा घसा कोरडा पडला. त्याचे अंग घामाने भिजले, हातपाय थरथरु लागले. तोंडातून शब्द यायला तयार नव्हते. तरीही त्याने हिंमत करून तिला सांगितले,

"तू... तू माझी कल्याणी नाहीस..."

हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा भाव एका क्षणात बदलला.

तिचे डोळे रागाने लाल झाले.

ती जोरात किंचाळली. एव्हढी की

त्या किंचाळीचा आवाज संपूर्ण फ्लॅटमध्ये घुमला. समीरच्या कानात किर्रेर्र असा आवाज घुमू लागला. त्याने दोन्ही हात दोन कानावर ठेवले आणि त्याच्या काही लक्षात येण्या आधीच,

पुढच्याच क्षणी...

तिने बाजूला ठेवलेली जड लाकडी खुर्ची दोन्ही हातांनी उचलली. क्षणभर ती हवेत धरून ठेवली. आणि पूर्ण ताकदीने भिंतीकडे फेकून दिली.

धाड!

भिंतीवर लावलेला फोटो तुटून खाली पडला. काचेचे तुकडे पूर्ण खोलीत चार बाजूंना उडाले.

त्या आवाजाने समीर अजूनच घाबरला. आणि हळूहळू मागे सरकू लागला.

हे पाहून कल्याणी अजूनच रागात आली. आणि तिने.....


क्रमशः.......


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →