घरात एक विचित्र शांतता होती. जणू प्रत्येक भिंत काहीतरी लपवत होती. नीलची नजर सहज घरभर फिरली.
घरात काहीच विस्कटलेलं नव्हतं. पण तरीही वातावरणात एक अनामिक दडपण होतं. आजूबाजूला निरीक्षण करत ते
दोघेही हळूहळू बेडरूमकडे गेले.
दोघेही हळूहळू बेडरूमकडे गेले.
दार अर्धवट उघडं होतं.
समीरने हलकासा धक्का दिला.
दार चर्रकन उघडलं.
आत...
कल्याणी खुर्चीवर बसली होती.
मान पूर्ण खाली झुकलेली.
केस चेहऱ्यावर पसरलेले.
हात मांडीवर स्थिर.
ती पूर्णपणे निश्चल होती.
"कल्याणी..."
समीरने हळू आवाजात हाक मारली.
कोणताही प्रतिसाद नाही.
तो तिच्याजवळ गेला.
"काय झालं?"
तरीही ती काही बोलले नाही किंवा कोणतीही हालचाल तिने केली नाही.
"कल्याणी..."
तरीही काही तिने प्रतिसाद दिला नाही.
नीलने समीरकडे पाहिलं.
"बहुतेक तिची तब्येत बिघडली आहे."
तो डॉक्टर म्हणून पुढे झाला.
"मी पाहतो."
नील हळूहळू तिच्याजवळ गेला. आणि.........
पुढे........
तो डॉक्टर म्हणून पुढे झाला.
"मी पाहतो."
नील हळूहळू तिच्याजवळ गेला. त्याने सौम्य आवाजात विचारलं,
"कल्याणी... माझा आवाज ऐकू येतोय का?"
दोघेही विचारत पडले असे अचानक कल्याणीला काय झाले की ती एकाही आवाजाला हाक देत नाही.
"तुम्ही ठीक आहात?"
कसलाच प्रतिसाद नाही. ती थोडीशी हालचाल ती सुद्धा कल्याणी करत नव्हती. आवाज देणे तर खूप लांब राहिले.
त्याने तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवला.
त्या स्पर्शाबरोबर...
कल्याणीन डोकं झटक्याने वर केलं.
नीलच्या छातीत धस्स झालं. तिच्या अशा एकदम झटक्याने नील अचानक मागे फेकला गेला. आणि तो जरा घाबरल्यासारखाच म्हणजे आश्चर्यचकित झाला.
तिचे डोळे पूर्ण लाल नव्हते, पण इतके मोठं मोठे वाटत होते की त्यात नैसर्गिक भाव दिसत नव्हते.
ती एकटक डोळ्याचे पापडीन हलवता निल कडे तिने डोळे रोखून धरले होते. चेहऱ्यावर कसलाही भाव नाही अगदी भेसूर चेहरा दिसत होता आणि ओठावर एक विचित्र प्रकारचे जणू काही ताणून धरलेले भयानक हास्य उमटले होते.
ती एकटक डोळ्याचे पापडीन हलवता निल कडे तिने डोळे रोखून धरले होते. चेहऱ्यावर कसलाही भाव नाही अगदी भेसूर चेहरा दिसत होता आणि ओठावर एक विचित्र प्रकारचे जणू काही ताणून धरलेले भयानक हास्य उमटले होते.
आणि आवाज तोही...
तिचा नव्हता. काही वेगळाच आवाज तिचा येत होता.
जो मंद, आणि थंड असा जाणवला.
तिचा नव्हता. काही वेगळाच आवाज तिचा येत होता.
जो मंद, आणि थंड असा जाणवला.
"खूप... उशीर... केलास... डॉक्टर..."
तिने तोंडातून शब्द काढतच नीलच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तो नकळत दोन पावलं मागे सरकला.
त्याच्या बाजूला असलेला समीर सुद्धा घाबरला होता. समीरने घाबरून विचारलं,
"कल्याणी... हे काय बोलतेयस? आणि अचानक काय झाले तुला? किती आवाज देत आहोत आम्ही तुला?"
"कल्याणी... हे काय बोलतेयस? आणि अचानक काय झाले तुला? किती आवाज देत आहोत आम्ही तुला?"
ती हळूहळू समीरकडे वळली. तिच्या त्या वळण्याचा पद्धतीत आणि पाहण्यात ही विचित्रपणा होता. क्षणभर ती त्याच्याकडे पाहत राहिली.
मग पुन्हा हसली.
"तू... मला... ओळखलंच... नाहीस..."
तिचे असे विचित्र बोलणे आणि पाहणे पाहून समीर गोंधळून गेला.
"कल्याणी!"
ती अचानक पुन्हा मान खाली घालून शांत बसली. जणू काही काहीच घडलं नव्हतं.
खोलीत पुन्हा मृत शांतता पसरली. नीलने समीरकडे पाहिलं.
दोघांच्याही चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
पण नीलच्या मनात एक वेगळाच प्रश्न घोर घालत होता.
तिने "डॉक्टर" म्हणताना माझ्याकडेच का पाहिलं?
आणि...
दोघांच्याही चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
पण नीलच्या मनात एक वेगळाच प्रश्न घोर घालत होता.
तिने "डॉक्टर" म्हणताना माझ्याकडेच का पाहिलं?
आणि...
"खूप उशीर केलास" याचा अर्थ काय?
तो पुन्हा एकदा कल्याणीकडे पाहू लागला.
त्याच क्षणी...
तिच्या हाताची बोटं हळूहळू हलू लागली.
ती जमिनीवर नखाने काहीतरी काढत होती. दोघेही खाली वाकून पाहू लागले.
रेषा...
वर्तुळ...
आणि काही क्षणांतच...
जमिनीवर तेच परिचित चिन्ह उमटलं.
एक डोळा...
आणि त्याच्या मध्यभागी... एक छोटंसं हृदय.
आणि त्याच्या मध्यभागी... एक छोटंसं हृदय.
नील आणि समीर हे एकमेकांकडे आश्चर्य चकित होऊन पाहत राहिले.
कारण आता ते चिन्ह...
कारण आता ते चिन्ह...
फक्त एका भिंतीवर किंवा काचेवर नव्हतं. तर
ते त्यांच्या समोर...
ते त्यांच्या समोर...
कल्याणीच्या हाताने रेखाटलं जात होतं. आणि त्या क्षणी दोघांनाही जाणवलं. ते ज्या पासून दूर पाळण्याचा प्रयत्न करत होत तेच संकट आता त्यांच्यासोबत चालत होतो आणि त्यांच्या घरात स्थाईक झालं होतं..
थोडक्यात रहस्य आता फक्त त्यांचा पाठलाग करत नव्हतं.
ते त्यांच्या घरात शिरलं होतं.
थोडक्यात रहस्य आता फक्त त्यांचा पाठलाग करत नव्हतं.
ते त्यांच्या घरात शिरलं होतं.
खोलीत इतकी शांतता पसरली होती की तिघांच्याही श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
जमिनीवर कल्याणीने नखांनी काढलेलं ते चिन्ह...
एक डोळा... आणि त्याच्या मध्यभागी एक छोटंसं हृदय...
नील काही क्षण त्याकडे पाहतच राहिला. समीर हा पुरता घाबरला होता. त्याला पुढे काय करायचे आणि काय बोलायचे हेही सुचत नव्हते. जाण्याआयाआ काही त्यांनी सर्व काही नील वर सोडून दिले होते.
त्याच्या मनात एकच विचार घुमत होता.
हेच चिन्ह... पुन्हा!
समीरच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या.
"नील... हे... हे तिने कधी काढलं?"
नीलने उत्तर दिलं नाही. तो सावधपणे कल्याणीकडे पाहत होता.
ती पुन्हा मान खाली घालून अगदी निश्चल बसली होती.
जणू काही तिथे काहीच घडलं नव्हतं.
डॉक्टर म्हणून नीलने स्वतःला सावरलं.
"समीर... घाबरू नकोस. आधी तिची तपासणी करू."
समीरने मोठ्या धीराने कशीबशी मान हलवली.
नील हळूहळू पुढे सरकला.
त्याने टॉर्च काढून कल्याणीच्या डोळ्यांत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.
ज्या क्षणी प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला...
तिने विजेच्या वेगाने नीलचा मनगट पकडला.
तिची पकड इतकी घट्ट होती की नीलच्या हातातून टॉर्च खाली पडला.
"कल्याणी... सोड!" समीर ओरडला.
पण...
ती समीरकडे पाहतही नव्हती. अगदी तिची मान खाली आणि डोळे जमिनीवर खिळले होते. काही क्षणात तिने तिचे डोळे फक्त नीलवर रोखलेले होते.
ती मंद आवाजात म्हणाली,
"तू... मला शोधतोयस..."
"पण..."
"सत्य शोधण्याची किंमत खूप मोठी असते..."
नीलने हात सोडवण्याचा प्रयत्न केला.
पण तिच्या हातात एव्हढी ताकद होती की, समीर स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवू शकण्यास असमर्थ होता.
समीरने जबरीने तिचा हात दूर करण्याचा प्रयत्न केला.
क्षणातच कल्याणीने समीरकडे मान वळवली.
तिच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य उमटलं.
"तू पुन्हा वाचलास..."
"पण किती दिवस?"
समीरच्या अंगावर काटा उभा राहिला.
"कल्याणी... मी आहे... तुझा समीर!"
ती काही क्षण त्याच्याकडे एकटक पाहत राहिली.
मग अचानक तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
अश्रू वाहत होते...
पण ओठांवरचं ते भेसूर हास्य तसंच होतं.
हे दृश्य इतकं विचित्र होतं की नीललाही काही क्षण काही सुचेना.
अचानक...
खोलीतील दिवे लुकलुकू लागले.
एकदा...
दोनदा...
तीनदा...
आणि पूर्ण खोली अंधारात बुडाली.
समीर घाबरून ओरडला,
"नील!"
"घाबरू नको समीर मी इथेच आहे."
त्याने मोबाईलची टॉर्च सुरू केली. दोघांनी कल्याणीकडे पाहिलं...
खुर्ची रिकामी होती. कल्याणी नव्हती पण त्यांना ती त्यांच्या जवळून चालत जातानाही दिसली नाही.
"कल्याणी!"
समीरचा आवाज थरथरला.
दोघेही घाईघाईने आजूबाजूला पाहू लागले.
तेवढ्यात...
खोलीच्या कोपऱ्यातून मंद हसण्याचा आवाज आला.
"हहहहह..."
नील ने मोबाईलचा प्रकाश त्या दिशेने वळवला.
कल्याणी भिंतीजवळ उभी होती.
पण...
ती ज्या पद्धतीने उभी होती, ते पाहून दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला.
तिचं डोकं एका बाजूला जवळजवळ नव्वद अंश वाकलं होतं.
दोन्ही हात शरीराला चिकटलेले.
आणि डोळे...
पापणी न लवता त्यांच्याकडे रोखून धरले होते. ते एवढे मोठे आणि भीतीदायक दिसत होते की, काही वेळ असेच ती पाहत राहिली तर डोळे बाहेर पडतील.
ती हळूहळू म्हणाली, तिच्या आवाजात एक भीती निर्माण करणारी धार होती.
"ती... परत... आली आहे..."
"कोण?" नीलने धैर्य एकवटत विचारलं.
ती उत्तरली नाही.
फक्त उजवा हात वर करून खोलीच्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिच्या चेहऱ्यावरून त्या दोघांनी हळूहळू तिच्या हाताच्या दिशेने नजर फिरवली.
भीत भीत दोघांनीही त्या दिशेने पाहिलं.
पण तिथे काहीच नव्हतं.
पुन्हा परत त्यांनी त्याच गतीने त्यांची नजर कल्याणीकडे वळविली...
आणि तिकडे पाहतात त्यांचा जीव मुठीत आला. क्षणभर दोघांचाही श्वास थांबला.
कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा.
पुढील भाग अजिबात चुकवू नका! कारण आता नील, समीर आणि कल्याणीसमोर उभं राहणार आहे असं रहस्य, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला कायमचं वेगळं वळण मिळणार आहे...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
