तिने हळूहळू हात वर केला.
आणि काचेवर बोटाने एक चिन्ह काढलं.
एक डोळा.
त्याच्या मध्यभागी एक छोटंसं हृदय. ते पाहून नीलच्या मनात भीतीची लहर निर्माण झाली. त्याच्या छातीत जोरात धडधड होऊ लागले.
कारण हेच चिन्ह त्याने समीरच्या घराच्या किचनमध्ये पाहिलं होतं. त्याला पाहूनच समीर घाबरला होता.
तो घाईघाईने पुन्हा इमारतीत शिरला. यावेळी त्याने रिसेप्शनवर बसलेल्या महिलेने त्याच्याकडे पाहिलं त्याला आवाज दिला पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. किंवा तो एवढ्या घाईत गेल की तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचलाच नाही. लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर पोहोचला.
आणि तिच्या केबिनकडे धावत गेला. त्याने केबिन चा दरवाजा उघडला
आणि तिच्या केबिनकडे धावत गेला. त्याने केबिन चा दरवाजा उघडला
पण...
केबिन रिकामी होती.
खुर्ची रिकामी होती.
खिडकी बंद होती.
आणि काचेवर कोणतंच चिन्ह नव्हतं.
जणू काही काहीच घडलं नव्हतं.
फक्त टेबलावर ठेवलेल्या एका कागदावर एक सही केलेली होती. त्याने तो हातात घेऊन पहिला. त्यावरून त्याला काही तरी समजले. आणि तो त्याचे निरीक्षण करत होता.
नीलच्या हातातून तो कागद जवळजवळ निसटला.
कारण त्या ठिकाणी त्याला एक फोटो दिसला. आणि जवळच काही औषध ठेवलेले होते. जे कदाचित त्याच तरुणीचे होते.
दर्शनी की भावना.....
पुढे......
नील काही क्षण त्या रिकाम्या केबिनमध्ये स्तब्ध उभा राहिला. तो चहूबाजूंनी तिला शोधत होता.
आत्ताच काही क्षणांपूर्वी त्याने स्वतःच्या डोळ्यांनी त्या तरुणीला खिडकीत उभं पाहिलं होतं.
तिने त्याच्याकडे पाहिलं होतं.
हात उचलला होता. आणि काचेवर तेच रहस्यमय चिन्ह काढलं होतं.
डोळा...
आणि त्याच्या मध्यभागी एक छोटंसं हृदय.
मात्र आता...
त्या केबिनमध्ये तिचा असल्याचा काही पुरावा नव्हता. ती केबिन एवढी भयानक आणि अस्वस्थ करणारी वाटत होती. जणू काही त्या केबिनमध्ये कधी कोणी येत नसावं भयभीत करणारं वातावरण त्या केबिनचे वाटत होते.
नीलने संपूर्ण खोलीवर नजर फिरवली.
टेबल व्यवस्थित होतं.
खुर्ची आत ढकललेली होती. जणू त्यावर कधी कोणी बसलेलेच नसावे.
संगणक ही बंद होते.
खिडकीच्या काचा स्वच्छ होत्या.
जणू त्या खोलीत गेल्या काही मिनिटांत कोणी आलंच नव्हतं. हेच प्रकर्षाने त्याला जाणवत होतं.
"हे कसं शक्य आहे...?" तो स्वतःशीच पुटपुटला.
त्याने पुन्हा खिडकीजवळ जाऊन काच तपासली.
बोटांचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. पण काहीच नव्हतं.
क्षणभर त्याच्या मनात विचार आला...
मी जे पाहिलं... ते खरंच होतं का?
की...
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे माझं मन माझी फसवणूक करत आहे? सत्य की भास माझेच मला कळणे अवघड झाले आहे.
एक डॉक्टर म्हणून तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता.
भास?
की आभास?
अतिताणामुळे निर्माण झालेली चुकीची जाणीव?
हे सर्व वैद्यकीयदृष्ट्या शक्य होतं.
पण...
झुंबर कोसळण्याची घटना?
समीरच्या घरात दिसलेलं ते चिन्ह?
फोटो फ्रेममधून सापडलेला संदेश?
कल्याणीची अवस्था?
या सगळ्याचं स्पष्टीकरण केवळ मानसिक ताणात देता येईल का?
त्याचे मिळत असलेल उत्तर...
'नाही.'
त्याने डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला.
तेवढ्यात त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या फाईलकडे गेली.
घाईघाईत उठताना कदाचित ती तशीच राहिली असावी.
त्याने परवानगीशिवाय फाईल उघडावी का, याबद्दल क्षणभर तो विचार करू लागला.
त्याच्या व्यावसायिक नैतिकतेला ते पटत नव्हतं.
मात्र...
या प्रकरणाने जणू आता त्याच्या जीवनात वैयक्तिक स्वरूप घेतलं होतं.
त्याने यावेळी मागचा पुढचा विचार न करता सावधपणे फाईल उघडली.
पहिल्याच पानावर भावना प्रधान यांचं नाव होतं. ते पाहून त्याला धक्काच बसला. तो परत कोणत्यातरी विचारत पडला. थोड्या वेळानंतर त्याने परत आपले लक्ष त्या फाइल कडे वळविले.
त्याखाली संस्थेची माहिती.
सामाजिक उपक्रम.
अनाथ मुलांसाठी चालणारे प्रकल्प.
विविध जिल्ह्यांमधील भेटी.
सगळं अगदी अधिकृत आणि व्यवस्थित.
नील प्रत्येक पान काळजीपूर्वक वाचत गेला.
त्याला काहीही संशयास्पद दिसत नव्हतं.
फाईल बंद करणार इतक्यात...
एक छोटासा फोटो खाली घसरून जमिनीवर पडला.
नीलने तो उचलला.
फोटोमध्ये भावना काही लहान मुलांसोबत उभी होती.
सगळे हसत होते.
त्यांच्या मागे एका अनाथाश्रमाची इमारत दिसत होती.
नीलचा श्वास क्षणभर अडकला.
कारण...
तो हाच अनाथाश्रम होता.
जिथे त्याची त्या मुलीशी पहिली भेट झाली होती.
फोटोच्या मागे फक्त एक तारीख लिहिलेली होती.
१७ ऑक्टोबर.
वर्ष मात्र लिहिलं नव्हतं.
त्याने फोटो पुन्हा पुन्हा पाहिला.
सगळं अगदी सामान्य होतं.
पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली.
फोटोमध्ये भावना हसत होती.
मात्र...
तिच्या डोळ्यांमध्ये आनंद नव्हता.
एक विचित्र पोकळी होती.
जणू ती कॅमेऱ्याकडे पाहत नव्हतीच.
तर...
कॅमेऱ्याच्या मागे उभ्या असलेल्या कोणाकडे तरी पाहत होती.
"सर...?"
अचानक त्याच्या मागून आवाज आला.
नील एकदम आलेल्या त्या आवाजाने दचकला.
रिसेप्शनवरील तीच महिला दारात उभी होती.
"तुम्ही अजून इथेच आहात?"
"हो... मी निघतच होतो."
"मॅडम बाहेर गेल्या."ती शांतपणे म्हणाली.
"कधी?" नील ने आश्चर्याने विचारले.
"दहा मिनिटांपूर्वी."रिसेप्शनवरील महिला म्हणाली.
नीलच्या चेहऱ्यावर आश्चर्य कमी न होता वाढतच होत.
"कुठून गेल्यात त्या?"
"मागच्या जिन्याने." ती म्हणाली.
"मागचा जिना?" त्याने त्यादिशेने पाहत परत विचारले.
"हो."ती.
नील लगेच त्या दिशेने बाहेर पडला.
कॉरिडॉरच्या शेवटी एक छोटासा जिना त्याला दिसला.
तो त्यावरून खाली उतरला. मागच्या बाजूला एक छोटं गेट होतं.
गेट उघडं होतं. म्हणजे...
ती खरंच तिथून बाहेर गेली होती यात काही शंका नव्हती..
तो तिला आजूबाजूला बराच वेळ शोधत राहिला.
पण ती पुन्हा कुठेच त्याला दिसली नाही.
---
संध्याकाळपर्यंत नीलचं मन कामात लागलंच नाही.
हॉस्पिटलमध्ये परत आल्यानंतरही त्याच्या डोक्यात सतत तेच विचार फिरत होते.
एका रुग्णाची तपासणी करतानाही त्याचं लक्ष विचलित होत होतं. औषध लिहिताना त्याने दोनदा चूक केली. आणि विशेष म्हणजे त्याच्या ते लक्षात ही आले नाही. नर्सने ती दुरुस्त करून दिली.
"सर, तब्येत ठीक आहे ना?" पूजा नर्सने काळजीने विचारलं.
नीलने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला.
"हो... थोडा थकलोय."
पण त्यालाच माहीत होतं...
तो थकलेला नव्हता. तो गोंधळलेला होता.
---
सायंकाळी त्याने आपल्या केबिनचं दार आतून बंद केलं.
टेबलावर एक मोठा पांढरा कागद ठेवला.
मग त्याने त्या प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीचं नाव लिहायला सुरुवात केली.
समीर.
कल्याणी.
भावना.
दर्शनी.
अनाथाश्रम.
रहस्यमय मुलगी.
फोटो.
डोळ्याचं चिन्ह.
झुंबर.
अपघात.
किचनमधील लाल चिन्ह.
यानंतर त्याने प्रत्येक नावामध्ये रेषा काढून संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.
दहा मिनिटं...
वीस मिनिटं...
अर्धा तास...
पण प्रत्येक वेळी एकच गोष्ट समोर येत होती.
सर्व धागे कुठेतरी जाऊन त्या रहस्यमय मुलीकडेच मिळत होते.
मात्र...
ती नेमकी कोण होती?
भावना?
दर्शनी?
की...
दोघींपैकी कोणीच नाही? याच गोंधळलेल्या स्थितीत तो घरच्या दिशेने निघाला.
---
त्या रात्री तो घरी परतला. नेहमीप्रमाणे आईने दार उघडलं.
"आज खूप उशीर झाला." तिने काळजीने विचारलं
"हो थोडं काम होतं." त्याने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं.
पण आईने त्याचा चेहरा पाहताच विचारलं,
"नील, काय झाले. काय सुरू आहे मनात."
"सांगशील का?"
तो काही क्षण शांत राहिला. मग तिला खांद्याला धरून तिच्या शेजारी सोफ्यावर जाऊन बसला.
"आई..."
"कधी असं होते का..."
"की समोर सत्य दिसत आहे..."
"पण तरी ते खोटं वाटतं?"
आई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.
मग शांतपणे म्हणाली,
"हो."
"आणि कधी कधी खोटं इतक्या विश्वासाने समोर येतं..."
"की आपण त्यालाच सत्य मानतो."
"म्हणून निर्णय घाईत घेऊ नकोस."
"सत्याला समोर यायला वेळ लागतो."
आईचं हे वाक्य नीलच्या मनात खोलवर उतरलं.
---
रात्री उशिरा तो पुन्हा त्या फोटोसमोर बसला.
मोबाईलमध्ये झूम करून प्रत्येक चेहरा पाहू लागला.
