कारण...
त्याच्या मागे एक मुलगी धावत होती. तिचे केस वाऱ्याने उडत होते. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण तिची नजर मात्र सरळ त्याच्यावर रोखलेली होती. नीलने तिला पाहिले आणि तो पुन्हा धावू लागला.
आता त्याचा वेग आधीपेक्षा वाढला होता. तो ज्या रस्त्यावर धावत होता तो पूर्ण खाली होता. त्याच्या चारही बाजूंनी कोणीही नजरेस पडत नाही.
चारही बाजूला फक्त अंधार पसरला होता.
मागून येणाऱ्या पावलांचा आवाज मात्र जवळ येत होता.
मागून येणाऱ्या पावलांचा आवाज मात्र जवळ येत होता.
अजून जवळ...
आणखी जवळ...
आणि अचानक...
पुढे........
धावत असताना त्याचा पाय रस्त्यावरील दगडाला लागून त्याला ठेच लागली.
"आह!"
तो जोरात पुढे कोसळला. त्याच्या हाताला आणि गुडघ्याला मार लागला. तो उठण्याचा प्रयत्न करू लागला.
पण तेवढ्यात...
समोरून एक प्रखर प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडला. त्याने वर पाहिलं. पण त्याला समोरचे काही दिसत नव्हते. त्याने हात डोळ्यावर हात ठेवून डोळे प्रकाशापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या कानावर कार त्याच्या कडे येत असल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. ती कार प्रचंड वेगाने त्याच्याकडे येत होती. या गाडीचे हेडलाईट्स त्याच्या डोळ्यांवर पडत होते. त्याला काहीच दिसत नसले तरी तो उठण्याचा प्रयत्न करत होता. पण शरीर साथ देत नव्हतं.
गाडीचा वेग वाढतच होता. ती त्याच्या जवळ येत होती.
गाडीचा वेग वाढतच होता. ती त्याच्या जवळ येत होती.
त्या क्षणी...
त्याच्या कानात एक आवाज घुमला.
"उशीर होण्याआधी सत्य शोध..." नीलने घाबरून आजूबाजूला पाहिलं. तो आवाज तिचाच होता. त्या मुलीचा.
पुढच्याच क्षणी...
गाडी अगदी त्याच्यासमोर आली.
"नाही...!"
नील मोठ्याने ओरडला.
आणि...
तो जोराने श्वास घेत जागा झाला.
त्याचं संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं.
हृदय इतक्या जोराने धडधडत होतं की जणू छातीबाहेर येईल असं वाटत होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. पण त्याला काहीच दिसले नाही. कारण तो त्याच्या खोलीत होता.
सगळं शांत होतं.
खिडकीबाहेर सकाळचे हलके किरण दिसत होते.
काही क्षण तो तसाच बसून राहिला.
त्याने कपाळावरचा घाम पुसला.
"फक्त स्वप्न होतं..."
तो स्वतःशीच पुटपुटला.
पण मन मात्र ते मान्य करायला तयार नव्हतं.
कारण त्या स्वप्नातील एक गोष्ट त्याला सतत अस्वस्थ करत होती.
"उशीर होण्याआधी सत्य शोध..."
हे शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते.
नील उठला. खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. सूर्य उगवत होता. एक नवीन दिवस सुरू होत होता. पण त्याला आता एक गोष्ट स्पष्ट समजली होती. हे रहस्य लवकरात लवकर शोधावे लागेल. ते आता काहीकाळ फक्त शांत झालं आहे.
आणि कदाचित...
ते त्याला परत बोलवत आहे.
नील फ्रेश होऊन बाहेर आला आणि त्यांने आईला हाक मारली आणि तिने हसत त्याच्यासाठी चहा आणि नाष्टा आणला. त्यांनी नेहमीप्रमाणे नाष्टा केला आईचे पाय लागला आणि बाहेर ड्युटीवर निघून गेला. जाताना त्याने न चुकता आईला सांगितले कदाचित त्याला रात्री उशीर होऊ शकते. त्याची वाट पाहत जाऊ नकोस आता सध्या कामाचे प्रेशर जास्त आहे त्यामुळे तू जेवून झोपून घे जा.
"कामाचे कितीही प्रेशर असले तरी स्वतःची काळजी घेणे हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे तू वेळेवर जेवण करत जा आणि तुझी काळजी घेत चल म्हणजे मला तुझी वाट पाहण्याची गरज पडणार नाही," आईने हसत उत्तर दिले.
यावर नील काहीही न बोलता हसत निघून गेला. कारण त्याला समजले आईला कितीही सांगितले तरी ती तिची सवय सोडणार नाही.
तो त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाला. वातावरण नेहमीप्रमाणे बाहेरच शांत आणि थंड हवा होती. दिवस अगदी त्याला प्रसन्न वाटत होता. मध्येच त्याला गौरीचा फोन आला त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटले. पण ते फार काळ टिकले नाही. फोन रिसिव्ह करण्यासाठी त्याने हातात घेतला. तो फोन उचलणारच तेवढ्यात त्याला गाडी समोरून कोणीतरी क्रॉस झाल्यासारखे वाटले. त्याने एकदम ब्रेक लावला. आणि त्या झटक्याने त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला. त्याने मान वर करून पाहिले असता गाडीसमोर कोणीही नव्हते. पण लगेच त्याने आजूबाजूला इकडे तिकडे पाहण्यास सुरवात केली. त्याला दूर गर्दीत तीच तरुणी दिसली. त्याच्या सत्कार सोहळ्यात झुंबर पडले त्यावेळेस समीर कडे लक्ष देऊ न होती. त्याने लगेच तिचा पाठलाग सुरू केला. एका अनाथ आश्रमात गेली होती. पाठोपाठ तोही गेला की त्या आश्रमा सर्व मुलांसोबत खेळत होती आणि हसून त्यांना गोष्टी सांगत होती. हे पाहून मेलेला थोडे आश्चर्य वाटले.
तिथून ती एका मेडिकल वर गेली तिने काही औषधे खरेदी केली आणि लगेचच त्या ठिकाणाहून बाहेर निघून गेली. ही मेडिकल स्टोअरमधून बाहेर जाताच लगेच त्या मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन तिने घेतलेल्या औषधांची चौकशी केली. त्याला ते काहीतरी संशयातच वाटले. ट्रॅफिक असल्यामुळे ती मुलगी रस्ता क्रॉस करू शकली नाही आणि तेवढ्यातच नाही तिथून निघून तिच्याजवळ गेला त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
"हॅलो मॅम, माझं नाव नील आहे." त्याने बोलण्यास सुरुवात केली.
तिने त्याला पाहिले आणि एक रागीट कटाक्ष टाकून ती आपला चेहरा फिरवून समोर चालायला लागली.
"ओके सॉरी, मला माहिती आहे आपण अनोळखी आहोत. म्हणून तुम्ही कदाचित माझ्याशी बोलायला तयार नाही. पण आपण बोलल्याशिवाय आपली ओळख होणार नाही ना."
तिने रागाने त्याच्याकडे पाहिले. आणि म्हणाली, "हे बघा मिस्टर मला तुमच्याशी ओळख करण्यात काहीही इंटरेस्ट नाही कृपया मला त्रास देणे बंद करा."
नीलला समजले, त्या मुलीसोबत बोलणे एवढेही सोपे काम नाही. म्हणून डायरेक्ट त्याने त्या दिवशी हॉलमध्ये झालेल्या विषयाला हात घातला. "ओके फाईन मग मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत फक्त त्याचे उत्तर द्या. तुम्ही त्या दिवशी ते डॉक्टर च्या कार्यक्रमात काय करत होता. आणि तुम्ही त्या झुंबरला नजरेने कसे काय हलवले कसं काय शक्य आहे ते. कसं केलं ते तुम्ही मला सांगा."
आता मात्र तिचा पारा चांगलाच चढला होता की त्याच्यावर जोरात ओरडून रागावली, तुम्हाला काय म्हणायचं आहे त्या हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्याकडे ओळखपत्र होतं. मी तिथे येऊ नये अशी बंदी नव्हती. त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही काय झुंबर बद्दल काय बोलत आहात मला काही कळत नाहीये."
नील, अच्छा म्हणजे तुम्ही जे केलं ते तुम्हालाच कळत नाही आहे. तुम्ही झुंबर नजरेने कशे काय हलवले आणि खेचले, समोरच्या दिशेने कसे नजरेने लोटले. ही मॅजिक तुम्हाला कशी जमते मलाही शिकवा."
तिने आजूबाजूला एकदा नजर टाकली आणि परत नीलवर आपला निशाणा साधला, "तुम्ही मूर्ख आहात का? स्वतःला डॉक्टर म्हणून घेतात आणि नजरेने कोणी एवढे मोठे झुंबर हलवू शकते का? डोक्यावर पडले का? स्वतःचा आधी इलाज करा. आणि मग स्वतः नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावा. अशा फालतू गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही.
एवढे बोलून ती त्या ठिकाणाहून घाईघाईत निघून गेली.
नील ही तिच्या पाठीमागे निघाला. पण लगेचच मधात लागोपाठ एका मागे एक दोन तीन कार आल्या आणि ती तेवढ्यात कुठे नाहीशी झाली ती परत त्याच्या नजरेस पडली नाही. नील ने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती त्याला कुठेही दिसली नाही. तो पुरता निराश झाला होता. आता कुठे शोधायचं या विचारात असतानाच त्याचा फोन परत वाजला आणि तो गाडीच्या दिशेने निघून गेला. तो गाडीत बसला आणि हॉस्पिटलमध्ये निघून गेला. पण त्याच्या डोक्यात तेच विचार फिरत होते. तीच तरुणी जी आपल्याला हॉलमध्ये दिसली होती. तिने सर्व काही घडून आणले असे तिच्या हावभावावरून वाटत होते. पण आता ते आपल्याला कधी पाहिले नाही असा आव आणत तिने उत्तर दिले. तिला परत शोधावेच लागेल. ती इथेच कुठेतरी राहत असेल. परत दुसऱ्या दिवशी या ठिकाणी याच वेळी येण्याचा त्याने निर्णय घेतला.
नील ही तिच्या पाठीमागे निघाला. पण लगेचच मधात लागोपाठ एका मागे एक दोन तीन कार आल्या आणि ती तेवढ्यात कुठे नाहीशी झाली ती परत त्याच्या नजरेस पडली नाही. नील ने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती त्याला कुठेही दिसली नाही. तो पुरता निराश झाला होता. आता कुठे शोधायचं या विचारात असतानाच त्याचा फोन परत वाजला आणि तो गाडीच्या दिशेने निघून गेला. तो गाडीत बसला आणि हॉस्पिटलमध्ये निघून गेला. पण त्याच्या डोक्यात तेच विचार फिरत होते. तीच तरुणी जी आपल्याला हॉलमध्ये दिसली होती. तिने सर्व काही घडून आणले असे तिच्या हावभावावरून वाटत होते. पण आता ते आपल्याला कधी पाहिले नाही असा आव आणत तिने उत्तर दिले. तिला परत शोधावेच लागेल. ती इथेच कुठेतरी राहत असेल. परत दुसऱ्या दिवशी या ठिकाणी याच वेळी येण्याचा त्याने निर्णय घेतला.
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
