सावत्र सासूबाई - भाग - 1
रमा, ये रमा इकडे ये, हा काय किचनमध्ये पसारा करून ठेवला आहेस, आपल्या हाताला स्वच्छतेची सवय असावी, सकाळी कांदा चिरला होतास, त्याच्या साली पण अजून तिथेच आहेत, कोथिंबीरचे देठ तिथेचं एका कोपऱ्यात टाकून ठेवले आहेस, आपलं किचनमधलं कामं आवरल्यावर लगेंचंच हा सगळा कचरा तुला डस्टबीनमध्ये टाकायला काय होतं गं... सरिताताई आपल्या सुनेला रमाला ओरडून बोलतं होत्या.
रमा बेडरूममधूनच ओरडून बोलली, आई माझी महत्वाची मिटिंग होती अकरा वाजता म्हणून मी पटकन नाश्ता करून मिटिंगसाठी आत आले..मी नंतर आवरते ते सगळं..
रमा वर्क फ्रॉम होम करत होती, रमा सरिताच्या सावत्र मुलाची अभयची बायको होती, अभयच्या आईच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर अभयच्या वडिलांनी रामरावांनी सरिताशी अभय सहा वर्षाचा असताना लग्न केलं होतं, सरिता तशी प्रेमळ होती, पण स्वभावाने कडक होती, आणि तिला स्वच्छतेंच अतिशय वेड होतं, इकडची वस्तू तिकडे केलेली तिला चालत नसे.
सरिताला कालांतराने दोन जुळी मुलं झाली होती, कौस्तुभ, कस्तुरी अशी त्यांची नावं होती, दोघेही आता कॉलेजला बारावीला होती, अभय, कौस्तुभ, कस्तुरी सक्ख्या भावंडांप्रमाणे रहात असतं, अभयही आपल्या लहान भावंडांचे खूप लाड करत असे, त्यांना कॉलेजसाठी पॉकेटमनी देत असे, त्यांना वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट्स आणत असे.
रमा आणि अभयचं प्रेम जमल्यावर अभयने रमाला बजाऊन सांगितलं होतं, माझी आई सावत्र आहे, कडक आहे तीं, पण तीने माझ्यात आणि तिच्या मुलांतं दुजाभाव केलेला नाही आहे, मला तीने प्रेमाने सांभाळलं आहे त्यामुळे तिला दुखवायचं नाही आहे, तीं स्वभावाने खूप कडक आहे पण मनाने तशी हळवी आहे तीं, तिला अजिबात पसारा केलेला चालतं नाही, तिला उलटं बोलायचं नाही, तिला प्रेमाने तु जपायचं आहेस, तिच्याशी नीटचं वागायचं आहेस तु.
बाबा स्वभावाने खूप शांत आहेतं ते तुला कधीच एका शब्दाने काहीच बोलणार ही नाहीत, पण आई कधीतरी ओरडेल, चिडेल तर् अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही, तींला सतत ओरडायची सवय आहे, कारण तिला सगळं नीट, स्वच्छ लागतं, ते तुला कदाचित लगेचं जमणार नाही, पण हळूहळू जमवायचं ते, त्यावरून तीं तुला ओरडल्यावर तिला उलटं उत्तर करायचं नाहीसं तु..
हो रें मी जमवून घेईनं सगळं असं तेव्हा रमा अगदी आत्मविश्वासाने अभयला बोलली होती, पण आता तिला आपल्या सासूबाईंचं हे सतत ओरडणं त्रासदायक वाटतं होतं.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - रमा आपल्या सावत्रसासूबाईशी भविष्यात कशी वागते ते आणि त्यामुळे तिला काय त्रास होतो ते )
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
