सासूबाईंचा परीघ
भाग -१
भाग -१
मेघना रोजच्या प्रमाणे ऑफिसमधून आली आणि तिने गाडीतून खाली उतरून गेट उघडून गाडी पार्किंग मध्ये लावली.
सवयीने पर्स मधून चावी काढत पायऱ्या चढत होती तर तिला दरवाजा उघडा दिसला.
तिचे तिलाच हसू आले किती सवयीची गुलाम आपण.
ती साफ विसरूनच गेली होती की घरात आज आपली नवीन सुनबाई शुभा आहे म्हणून.
ती साफ विसरूनच गेली होती की घरात आज आपली नवीन सुनबाई शुभा आहे म्हणून.
शुभाने हसून सासूबाईंचे स्वागत केले. मेघनानेही सुंदर हास्याने प्रत्युत्तर दिले.
असं संसर्गजन्य हास्य कौटुंबिक सुसंवादाचं एक चांगलं लक्षण असतं.
शुभा सासूबाईंसाठी पाणी आणावे म्हणून स्वयंपाक घरात वळली तर मेघना नेहमीप्रमाणे सवयीने तिच्या रुममध्ये गेली.
शुभा सासूबाईंसाठी पाणी आणावे म्हणून स्वयंपाक घरात वळली तर मेघना नेहमीप्रमाणे सवयीने तिच्या रुममध्ये गेली.
चेहऱ्यावर थंडगार पाण्याचा शिडकावा केला की तिला सगळा शीण निघून गेल्यासारखा वाटायचे.
थोडक्यात ताजेतवाने.
तिने लगेच घरातले सैलसर सुती कपडे घातले आणि प्रसन्न चेहऱ्याने ती परत हॉलमध्ये आली.
डायनिंग समोरची खुर्ची ओढून त्यावर बसत तिने डायनिंग टेबल वरच्या परडीतले संत्र सोलायला घेतले.
तेवढ्यात स्वयंपाक घरातून शुभा पाण्याचा ग्लास घेऊन आली.

"ये, अगं बस. मी काय पाहुणी आहे कां?" मेघना हसत हसत म्हणाली,
"बस. "
संत्र्याच्या फोडींची प्लेट तिच्यासमोर करत म्हणाली,
" घे."
"बस. "
संत्र्याच्या फोडींची प्लेट तिच्यासमोर करत म्हणाली,
" घे."
शुभाला एकदम हायसं वाटलं. एकदम डोक्यावरचं ओझं उतरल्याची जाणीव झाली तिला.
शुभाही कम्प्युटर इंजिनीअर. तिने लग्नाआधी दोन महिने आईसोबत माहेरी राहता यावे म्हणून नोकरी सोडलेली.
ती पुण्याला आणि शशांक नागपूरला. म्हणून ती आता नागपूरला दुसऱ्या कंपन्यांमध्ये इंटरव्यू देत होती.त्यामुळे घरीच होती.
सासू-सासरे नवरा सगळे नोकरी करणारे.
थोडक्यात काय तर सुशिक्षित आणि व्यस्त कुटुंब.
थोडक्यात काय तर सुशिक्षित आणि व्यस्त कुटुंब.
शुभा लग्नाआधी एक दिवस नोकरीवरून घरी आली आणि नेहमीप्रमाणे ऑफिस बॅग सोफ्यावर भिरकावत
मलूल होऊन सोफ्यावर बसली. आईने पाणी आणून दिले.
मलूल होऊन सोफ्यावर बसली. आईने पाणी आणून दिले.
त्यावेळी तिचे बाबा तिला म्हणाले होते," बाईसाहेब, आज आई पाणी हातात आणून देतेय सासरी गेल्यावर कोण देईल?
त्यातून तुम्ही असं घर निवडलंय की तुमच्या सासुबाई सुद्धा क्लास वन ऑफिसर आहेत म्हटलं."
त्यातून तुम्ही असं घर निवडलंय की तुमच्या सासुबाई सुद्धा क्लास वन ऑफिसर आहेत म्हटलं."
शुभाने हा विचारच कधी केला नव्हता. शशांक तिला तिच्या मैत्रिणीच्या लग्नात भेटला तिथेच ओळख झाली आणि पाहता क्षणी प्रेम.
विरोध कुणाचाच नव्हता कारण बोट ठेवायला जागा नव्हती.
दोन्ही कुटुंब सुखवस्तू , सुसंस्कारीत. दोन्हीकडे मुलांच्या पसंतीवर ,निवडीवर सकारात्मकता होती.
पण वडिलांच्या सावध इशाऱ्याने शुभा पुरती भांबावून गेली.
तिच्या मनात विचारांचे काहूर उठले.
तिच्या मनात विचारांचे काहूर उठले.
सासुबाई क्लास वन ऑफिसर म्हणजे तितक्याच शिस्तीच्या असतील.
ऑफिसमध्ये हाता खालच्या लोकांकडून काम करून घेताना त्यांच्यावर शिस्तीचा बडगा आणि वेळ पडल्यास ओरडाही करावा लागत असेल.
तसेच त्या घरी तर वागणार नाहीत ना?
शुभाच्या मनात आधीच भीती व्यापून राहिली.
त्यातच भर म्हणून जो तो तिला तेच म्हणायचा," बापरे तुझ्या सासूबाई तर क्लास वन ऑफिसर म्हणजे..."

तीच पूर्वग्रहदूषितता डोक्यात घेऊन आणि मनात सासूविषयीचे एक वेगळेच चित्र रंगवून सासर घराचा उंबरठा ओलांडून तिने गृहप्रवेश केला होता.
त्यामुळे मनावर 'मणामणाचे'(मनामनाचे) ओझे होते.तिने स्वतःला चिमटा काढून बघितला.
आता जे घडतंय ते खरा ट्रेलर आहे का?
की 'दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे'...
की 'दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे'...
बघूया पुढील भागात भाग -२मधे
©®शरयू महाजन
©®शरयू महाजन
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने