गावाकडच्या गोष्टी :
सरोळी गावातील वारकरी दिंडी – भक्ती, परंपरा आणि एकात्मतेचा सोहळा
सरोळी गावातील वारकरी दिंडी – भक्ती, परंपरा आणि एकात्मतेचा सोहळा
वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची अमूल्य परंपरा आहे. "ज्ञानोबा-तुकाराम" या जयघोषाने दुमदुमणारी दिंडी म्हणजे भक्ती, समता, प्रेम आणि सेवाभावाचा उत्सव. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील सरोळी गावातही ही वारकरी परंपरा अनेक वर्षांपासून भक्तिभावाने जपली जात आहे.
आषाढी एकादशी जवळ आली की गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. वारकरी पांढरे शुभ्र वस्त्र, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मृदंग आणि भगवी पताका घेऊन दिंडीत सहभागी होतात.सकाळी महादेव मंदिर येथे विठ्ठल-रुक्मिणीची मनोभावे पूजा केली.त्यानंतर वीणापूजन करुन दिंडीसाठी गावातील महादेव मंदिराजवळ सर्व वारकरी व अबालवृध जमा होतात. दिंडी गावातील हनुमान गल्ली, पेठ गल्ली व वारकरी गल्ली अशी चालत राहते.
"राम कृष्ण हरी", "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या नामघोषांनी संपूर्ण गाव दुमदुमून जाते. अभंग, भारुडे, हरिपाठ आणि कीर्तन यांमधून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या शिकवणीचा प्रसार केला जातो. प्रत्येक दारासमोर चोपदार, विठ्ठल - रुक्मिणीच्या वेशातील वारक-यांची आनंदाने पूजा केली जाते. महिला आपल्या दारासमोर सुबक रांगोळी काढतात. गावातील महिला या दिंडीत उत्साहाने सामील होतात. त्यांच्या हातात टाळ व मुखी हरीनामाचा जयघोष चालू असतो. दिंडीत त्या झीम्मा - फुगडी खेळतात. दिंडीतील भक्तीमय वातावरणात त्या तल्लिन होऊन जातात. विठ्ठलाची सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे या दिंडीत सहभागी होतात.

सरोळी गावात अशा दिंडीचे आषाढवारी, माघवारी व महाशिवरात्र याप्रसंगी आयोजन केले जाते. कित्येक वर्षापासून असलेली परंपरा आजही तितक्याच भक्तीभावाने जपली आहे. यामध्ये गावातील सर्वभजनी मंडळ यांच्या अनमोल योगदानामुळे दिंडीला शोभा येते.
सरोळीतील दिंडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व समाजघटकांचा सहभाग. जात, धर्म, पंथ यांचा कोणताही भेद न ठेवता सर्वजण एकत्र येऊन विठ्ठलनामाचा गजर करतात. त्यामुळे गावात सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ होतो. लहानमुले विठ्ठलाच्या वेशभुषा करुन वारीत सहभाग घेतात. हाती पताका घेऊन नाचतात. भविष्यातील दिंडीचे ते प्रतिक असतात.
दिंडी विठ्ठलाच्या जयघोषात गावभर फिरत असते. पेठ गल्लीत जुन्या चावडीजवळ रिंगण सोहळा होतो. येथे वारकरी, महिला, लहान मुले वारीतील विविध खेळ खेळतात. अभंग व टाळ चिपळ्यांचा नाद सर्वत्र घुमला जातो. विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी पुढे चालते.
सकाळपासून चाललेल्या दिंडीत वारकरी व लोकांचा उत्साह तसाच कायम असतो. भक्तीचा हा नेत्रदिपक सोहळा बघण्यासारखा असतो. भक्तीच्या या अलौकिक सोहळ्यात वयोवृद्ध महिला व पुरुष आनंदाने सहभागी होतात. भक्तिमय वातावरणात दिंडी परत महादेव मंदिराजवळ कधी येते हे समजत नाही.शेवटी महादेव मंदिरात आरती व भजन करुन विणापूजनाने दिंडीची सांगता होते. यावेळी दिंडीतील सर्व वारकरी, महिला, लहानमुले यांना फलाआहार दिला जातो.
आपल्या गावातील दिंडी ही केवळ धार्मिक परंपरा नसून जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे. साधेपणा, संयम, परस्पर सहकार्य, पर्यावरणप्रेम, शिस्त आणि सेवाभाव यांचे संस्कार दिंडीतून घडतात. लहान मुलांनाही या परंपरेची ओळख होते आणि तेही आनंदाने दिंडीत सहभागी होतात.
आजच्या धकाधकीच्या जीवनात दिंडी माणसाला आत्मिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि समाजाशी जोडून ठेवण्याचे कार्य करते. म्हणूनच सरोळी गावातील दिंडी ही गावाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनातील एक जिवंत परंपरा आहे. ही परंपरा पुढील पिढ्यांनीही जपावी, वाढवावी आणि विठ्ठलभक्तीचा हा वारसा अखंड ठेवावा, हीच सर्वांची भावना आहे.

"विठ्ठल नामाचा गजर,
सरोळीचा भक्तीचा साज;
दिंडीतून जपली परंपरा,
हेच गावाचे खरे राज."
सरोळीचा भक्तीचा साज;
दिंडीतून जपली परंपरा,
हेच गावाचे खरे राज."