श्वेताचे बाबा घरी आल्या आल्या श्वेता त्यांच्याकडे धावत जाते.बाबा बाबा ....आहे बघा मी काल शाळेत काढलेल चित्र.
श्वेताचे बाबा तिने काढलेल्या चित्राकडे न बघताच म्हणतात...अरे वा छान काढलं आहेस..... बाबांनी चित्राकडे न बघताच आपल कौतुक केलं. हे श्वेताच्या लक्षात येताच श्वेता पुन्हा बोलते बाबा बघा तरी मी काय काढलंय ते....
श्वेताचे बाबा त्रासलेल्या आवाजात बोलतात श्वेता थांब मी आत्ताच कामावरून आलोय ना!
आणि बाबा तुम्हाला माहिती आहे का , टीचर ने मला चॉकलेट सुद्धा दिलं हे बघा.
त्यावर श्वेताचे बाबा म्हणतात घरात एवढ्या कॅडबरी पडलेल्या असताना देखील तुला टीचर ने दिलेल्या एका चॉकलेटचा किती आनंद झाला आहे. तुम्हा मुलांना कशाचा आनंद होईल काही सांगता येत नाही .
श्वेताचे बाबा फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसतात श्वेता पुन्हा चित्रकलेची वही बाबांना दाखवते .
श्वेताचे बाबा तिने काढलेलं चित्र बघून बोलतात चित्र छान काढलं आहेस. पण चित्र काढून पुढे भविष्यात करणार काय? तुला काय कोणाच्या घराच्या भिंती रंगवायच्या आहेत का?
बाबांनी आपलं काहीच कौतुक केलं नाही या गोष्टीचे श्वेताला फार वाईट वाटते....श्वेता उतरलेल्या चेहऱ्याने चित्रकलेची वही पुन्हा तिच्या बॅगेत नेऊन ठेवते.
त्याचवेळी श्वेताची मैत्रीण पल्लवी तिला बोलवण्यासाठी घरी येते . श्वेता... चल आमच्या घरी अभ्यास करण्यासाठी आपण दोघी अभ्यास करूया.
श्वेता चित्रकलेची वही घेऊन पल्लवीच्या घरी अभ्यास करण्यासाठी जाते . ती पल्लवीच्या बाबांना तिने काढलेलं चित्र दाखवते, ते चित्र पाहिल्यानंतर पल्लवीचे बाबा श्वेताच्या चित्राचं फार कौतुक करतात . तिने काढलेल्या चित्राचे नीट निरीक्षण करून तिने ते चित्र किती सुंदर काढलं आहे. हे तिला सांगतात . त्या चित्रात तिने अजून कोणते बदल केले तर हे चित्र अजून सुंदर दिसेल हे देखील पल्लवीचे बाबा श्वेताला समजावून सांगतात. हे पाहिल्यानंतर श्वेताला खूप आनंद होतो. श्वेताने काढलेले चित्र पाहून पल्लवीचे बाबा तिला शाबासकी देतात. असंच रोज चित्र काढलस तर एक दिवस मोठी चित्रकार होशील . असा ते श्वेताला आशीर्वाद देतात.
श्वेता मनातच विचार करते पल्लवीच्या बाबांनी जसे माझे कौतुक केले. तसे कौतुक माझ्या बाबांनी केले असते तर.
श्वेता मनातच विचार करते पल्लवीच्या बाबांनी जसे माझे कौतुक केले. तसे कौतुक माझ्या बाबांनी केले असते तर.
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
