Login

संघर्षाला कवटाळताना  - भाग  -1

Sangharsh

संघर्षाला कवटाळताना  - भाग  -1


    कविताच्या डोळ्यांतं आज आनंदाश्रु होते, कारण आज तिचा मुलगा अमर आयएएस अधिकारी म्हणून सन्मानित होतं होता. इथपर्यंत त्याला पोहचवण्यासाठी कविताने स्वतःला कितीवेळा मोडलं होतं, कितीवेळा ती खचली होती, एकांतात अनेकदा रडली होती.


      कविता देशमुख, आजपासून पंचवीस वर्षांपूर्वीची कविता खूप वेगळी होती, स्वप्नंनांनी भरलेले डोळे, चेहऱ्यावर निरागस हास्य, छोटया छोटया गोष्टींमध्ये आनंद शोधणारी एक साधी मुलगी अशी ही कविता.


     कविता आणि किशोरचं अरेंज म्यॅरेज झालं होतं, किशोर एका नामांकित कंपनीतं इंजिनियर होता, तर् कविताने बी.एड. पूर्ण केलं होतं, दोघांचं आयुष्य अगदी सुखात चाललं होतं.


     लग्नानंतर दोन वर्षांनी संसारवेलीवर फुलं उमललं, मुलगा झाला, त्याचं नाव अमर ठेवण्यात आलं, अमर झाल्यापासून घरचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं, घर आनंदी झालं होतं, त्याच्या बोबड्या बोलांनी घरभर आनंद पसरला होता.


   कविताचं आयुष्य अगदी परिपूर्ण वाटतं होतं, सुखी संसार, प्रेम करणारा नवरा, आणि गोंडस मुलगा, आणखी काय हवं असतं एका स्त्रीला...


   पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं,


एके दिवशी किशोर ऑफिसमधून येताना त्याचा अपघात झाला, कविताला फोन आल्यावर ती धावतच हॉस्पिटलला पोचली, किशोर ऑपरेशन थिएटरमध्ये होता, थोड्यावेळाने डॉक्टर बाहेर येऊन बोलले.


   सॉरी मिसेस. देशमुख आम्ही खूप प्रयत्न केले, पण आम्ही किशोरला वाचवू शकलो नाही.


डॉक्टरांच्या ह्या एका वाक्याने कविताचं संपूर्ण आयुष्य उध्वस्त झालं, तिच्या कुशीत एक वर्षाचा अमर होता, आणि तिच्या डोळ्यासमोर तिच्या संसाराची राख झाली होती.


पुढचे काही दिवस कसे गेले तें तिला कळलेचं नाही, तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं होतं, आणि समाजाने तिला सहानुभूती दाखवायला सुरवात केली होती, तेराव्या दिवशी नातेवाईकांमधल्या एक काकू म्हणाल्या, तुझं वय कमी आहे अजून, दुसरं लग्न करून टाक.


    कविताला आश्चर्य वाटलं, तिचा नवरा जाऊन अवघे तेरा दिवस झाले होते, आणि लोकांनी तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला सुरवात केली होती, त्या रात्री ती खूप रडली, अमर तिच्या कुशीत झोपला होता, त्याच्याकडे पाहून तिने मनात म्हंटल, आता रडायला वेळ नाही, कारण मी नुसती कविता नाही आहे तर् अमरची आई आहे.


   दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आरशात स्वतःकडे पाहिलं, बरेच दिवस रडल्याने तिचे डोळे सुजले होतें, चेहरा उतरलेला होता, तिने आरशात बघून एक निर्धार केला..... आता मला कुणाच्या आधाराची गरज नाही, मी माझ्या मुलासाठी जगणार...


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - कविता लग्न नं करता एकटी आपल्या मुलाची जबाबदारी कशी स्वीकारते तें.)



   
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →