समाजाला लागलेला डाग अंधश्रद्धा
भाग 2
रात्रभर चाललेल्या त्या प्रकारामुळे घरातलं वातावरण अजूनच भयाण झालं होतं .
पहाटेचे चार वाजून गेले होते, घरात धुपाचा तीव्र वास पसरला होता .
गौरीचा आवाज आता हळूहळू कमी होत चालला होता .
रात्रभर रडून, तडफडून तिचं शरीर पूर्ण थकून गेलं होतं.
तिचे केस विस्कटले होते, चेहऱ्यावर काळी राख पसरली होती..
डोळ्यांतून सतत पाणी वाहत होतं .
तिचे केस विस्कटले होते, चेहऱ्यावर काळी राख पसरली होती..
डोळ्यांतून सतत पाणी वाहत होतं .
"बाबा... अजून किती वेळ लागेल ?" गौरीचे वडील घाबरून म्हणाले .
तिची आई तिच्या जवळ बसून रडत होती .
"बाबा... माझ्या मुलीला बरं होईल ना...?" ती घाबरत विचारत होती .
बाबा डोळे मिटून बसले होते.
"वाईट शक्ती खूप हट्टी आहे..." ते गंभीर आवाजात म्हणाले ,
"पण आम्ही हार मानणार नाही..."
"पण आम्ही हार मानणार नाही..."
गावकरीही आता पूर्णपणे बाबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बसले होते .
"साध्या माणसाचं काम नाही हे..."
"बाबाच करू शकतात..."
"देवमाणूस आहेत..."शेजारी लगेच गुजबुजू लागले..
"बाबाच करू शकतात..."
"देवमाणूस आहेत..."शेजारी लगेच गुजबुजू लागले..
गौरीला मात्र आता काहीच सहन होत नव्हतं .
तिचं डोकं प्रचंड दुखत होतं . डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली होती .
दिवस उजाडला, पाटील वाड्यातली गर्दी कमी झाली होती.
बाबा इथेच ध्यान मुद्रेत बसून होते...बाकी शिष्य मात्र रात्रीच्या तयारीसाठी लागले होते.
बाबा इथेच ध्यान मुद्रेत बसून होते...बाकी शिष्य मात्र रात्रीच्या तयारीसाठी लागले होते.
"पप्पा... मला डॉक्टरांकडे घेऊन चला ना... प्लीज..."ती थरथरत्या आवाजात म्हणाली , क्षणभर तिच्या वडिलांचे डोळे भरून आले .
"अजिबात ऐकू नका, वाईट शक्ती तुमच्या मुलीच्या तोंडून बोलवून घेत आहे, आज रात्री बघा बाबा कसं पळवून लावतात त्या शक्तीला.." बाबांचा भक्त काम करत म्हणाला.
गौरीच्या वडिलांना तिच्या डोक्यावर हात फिरवत होकारार्थी मान डोलावली.
रात्रभर चालेला हा खेळाची बातमी गावभर पसरली होती,
अशातच ती बातमी गौरीची मैत्रिण नेहा हिला समजली..
अशातच ती बातमी गौरीची मैत्रिण नेहा हिला समजली..
शिकली सवरलेली नेहा आपला कॉलेजचा मित्राला सोबत घेऊन पहिले तर पोलिस ठाण्यात तक्रार करायला निघून गेली.
आपण कितीही सांगितलं तरी गावकरी मंडळी ऐकणार नाही,
आदित्य जो कि शेजारच्या गावात राहणारा, त्यांच्या गावातही बाबांची वाहवाही पसरी होती.
आदित्य जो कि शेजारच्या गावात राहणारा, त्यांच्या गावातही बाबांची वाहवाही पसरी होती.
पोलिस ठाण्यात गेल्या जे कळले ते ऐकून दोघांच्या अंगावर काटे उभे राहिले.
गौरीची काळजी लागून राहिली, त्यांनी पोलिसांच्या मदतीने शहरातील डॉक्टरांना रात्री गावात बोलावून घेतले.
क्रमशः
कसा वाटला भाग ते नक्की सांगा,
तुमच्या समीक्षा लिहायची ऊर्जा वाढवतात,
आता पुढे काय होणार वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा..
तुमच्या समीक्षा लिहायची ऊर्जा वाढवतात,
आता पुढे काय होणार वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
