मागील भागात आपण पाहिलं कि,पूजा झाल्यानंतर आस्था खोलीत जाऊन जमिनीवरच झोपते. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून ती सगळ्यांसाठी चहा-नाश्ता बनवते, ज्यामुळे अवंतिका तिच्यावर खूप खुश होतात. रिधिमा आस्थाला हनिमूनसाठी शॉपिंगला घेऊन जाते. आता पाहूया पुढे,
घरात आता पुन्हा शांतता पसरली होती.रिधान अजूनही डायनिंग टेबलवर बसून निवांत चहा पीत होता. त्याने खिडकीबाहेर पाहिलं.
रिधिमा,आस्थाची गाडी नजरेआड झाली होती. तस त्याच्या ओठांवर एक थंड, गूढ हसू आलं... ज्याचा अर्थ त्याला तस कुणी पाहिलं असत तरी कदाचित कोणालाच समजला नसता.
तो स्वतःशीच पुटपुटला,
"आस्था..."
क्षणभर थांबून तो खुर्चीला पाठीमागून टेकला.
"तू येच आनंदाने माझ्यासोबत हनिमूनला...खूपच खुश आहेस ना तू......"
हे बोलताना त्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक उतरली होती
"आणि हा हनिमून..."
एवढं बोलून तो पुन्हा हळूहळू हसला.
"मी ...असा सेलिब्रेट करीन...की आयुष्यभर तू विसरू शकणार नाहीस.... खूप हाऊस आहे ना तुला... एवढं सगळं होऊन पण माझ्यासोबत यायची... येच आता....."
एवढं बोलून तो पुन्हा हसला आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते आसुरी हास्य आगामी वादळाची चाहूल देऊन गेलं होत पण ह्यापासून आस्था आणि बाकी सगळेच बेखबर होते..
इकडे रिधिमा आणि आस्थाने जवळजवळ अर्धा दिवस शॉपिंग करण्यात घालवला होता.हनिमूनसाठी लागणारे कपडे, सॅंडल, बॅग,कॉस्मेटिक्स आणि अजून कितीतरी वस्तू घेतल्यामुळे दोघीही चांगल्याच थकल्या होत्या.
"वहिनी... आता माझ्यात तर अजिबात ताकद नाही.. फिरण्याची ."
रिधिमा आपले दोन्ही हात वर करत हसत म्हणाली.
"समोर कॉफी शॉप आहे... चल, आधी चहा-कॉफी घेऊ."
यावर आस्थानेही हसत मान डोलावली.
"चल.... कॉफी पिऊया....."
दोघी आत गेल्या.
कॉफी शॉपमध्ये मंद संगीत सुरू होतं. एका कोपऱ्यातील टेबलवर बसून त्यांनी कॉफी आणि काही स्नॅक्स ऑर्डर केले. गप्पा मारता मारता आणि थोडा वेळ बसल्यामुळे त्यांचा थकवा काहीसा कमी झाला होता..
कॉफी संपवून दोघी उठणार इतक्यात रिधिमासमोर एक तरुण येऊन उभा राहिला.
उंच...रुबाबदार व्यक्तिमत्त्व...गोरा वर्ण...आणि त्याचे लक्षात राहणारे निळेशार घारे डोळे...त्यात चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण हसू आणि बोलण्यात एक वेगळीच लाघवी शैली.एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा तो देखणा दिसत होता.

"हेय, रिधिमा...! How are you?"
ओळखीचा आवाज ऐकताच रिधिमाने समोर पाहिलं. क्षणभर तिचा विश्वासच बसला नाही.
"ओह्ह माय गॉड... ओजस...!"
ती आनंदाने ओरडली.
"व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज! कधी आलास इंडियात?"
असं म्हणत ती उठली आणि मित्राला भेटण्याच्या आनंदात तिने त्याला मिठी मारली.
त्यावर ओजस हसत म्हणाला,
"आठ दिवस झाले येऊन.आणि मॅडम, काय म्हणतोय आपल्या कॉलेजचा ग्रुप?चल ना... एकदा सगळ्यांचं गेट-टुगेदर करूया."
"हो..हो..... नक्की!"
रिधिमा उत्साहाने म्हणाली.
"बस ना."
तिने समोरची खुर्ची त्याच्यासाठी पुढे सरकवली.
ओजस बसणार इतक्यात त्याची नजर आस्थावर स्थिरावली.काही क्षण तो तिच्याकडे पाहतच राहिला.
मग हलकंसं हसत म्हणाला,
मग हलकंसं हसत म्हणाला,
"By the way...Who is this beautiful lady?"
त्याचे निळेशार डोळे काही क्षण आस्थावर खिळले होते.
त्या अनोळखी नजरेने आस्था थोडीशी अवघडली. त्यावर रिधिमा लगेच हसत म्हणाली,
"अरे... ही माझी वहिनी, आस्था."
"आणि वहिनी..."
ती आस्थाकडे वळून म्हणाली,
"हा ओजस, कॉलेजमध्ये मला एक वर्ष सीनिअर होता..हा सध्या अमेरिकेत असतो."
"Nice to meet you, Aastha."
ओजसने हसत हात पुढे केला. त्यावर आस्थाने मात्र नम्रपणे दोन्ही हात जोडले.
"नमस्कार."
हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं.तिने हस्तांदोलन करण्याऐवजी भारतीय पद्धतीने अभिवादन केलं.
क्षणभर ओजस आश्चर्यचकित झाला.मग तोही हसला.
त्याने पुढे केलेला हात मागे घेत दोन्ही हात जोडले.
"नमस्कार."
तोही तितक्याच आदराने म्हणाला.
काही वेळ त्या दोघामध्ये कॉलेजच्या आठवणी, अमेरिका आणि मुंबईबद्दल हलक्याफुलक्या गप्पा रंगल्या.
शेवटी ओजस उठला.
"ओके... मला आता निघायला हवं."
"पुन्हा भेटू."
"नक्की."
रिधिमा हसत म्हणाली.
आस्थानेही हलकंसं स्मित करत निरोप दिला.ओजस बाहेर निघून गेला...पण जातानाही त्याची नजर नकळत एकदा आस्थाकडे वळली.
आस्थाला मात्र त्या नजरेचा अर्थ कळला नाही. ती पुन्हा शॉपिंगच्या बॅग्स उचलण्यात गुंतली...
तर नियती शांतपणे तिच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री करून गेली...
थोड्याच वेळात त्या दोघींनी कॉफी शॉपमधून बाहेर पडत आपापल्या शॉपिंग बॅग्स उचलल्या.
"चल, वहिनी... अजून दोन-तीन ठिकाणी जायचं आहे."
रिधिमा उत्साहाने म्हणाली.
आस्थाने हलकंसं हसत मान डोलावली आणि दोघी पुढे निघाल्या.
पण...चालत असतानाही तिच्या मनात नकळत त्या अनोळखी तरुणाचा चेहरा पुन्हा पुन्हा येत होता.
विशेषतः...त्याचे ते गडद निळेशार डोळे.एवढे वेगळे, शांत आणि बोलके डोळे तिने याआधी कधीच पाहिले नव्हते.
क्षणभर ती विचारात हरवली...
क्षणभर ती विचारात हरवली...
पण लगेचच स्वतःलाच सावरत तिने तो विचार मनातून झटकून टाकला.
"त्याचा आणि माझा काय संबंध...?"
असं मनाशी म्हणत ती पुन्हा रिधिमाच्या गप्पांमध्ये रमली.
---
दुसरीकडे...ओजस आपल्या गाडीत येऊन बसला.
गाडी सुरू करणार इतक्यात त्याच्याही मनात आस्थाचा चेहरा तरळून गेला.तो हलकंसं हसला.
गाडी सुरू करणार इतक्यात त्याच्याही मनात आस्थाचा चेहरा तरळून गेला.तो हलकंसं हसला.
"कमाल आहे...पहिल्यांदाच अशी मुलगी भेटली... जिला माझ्या व्यक्तिमत्त्वाचं, लूकचं किंवा परदेशातून आल्याचं अजिबात अप्रूप वाटलं नाही."
नाहीतर आजवर त्याला भेटणाऱ्या बहुतेक मुली त्याच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असायच्या.
पण आस्था...तिने नम्रपणे फक्त हात जोडून नमस्कार केला...ना अनावश्यक उत्सुकता ना दिखावा...ना चेहऱ्यावर प्रभावित झाल्याचं कोणतंही चिन्ह त्याला दिसली आणि कदाचित...हीच गोष्ट ओजसच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळी उत्सुकता निर्माण करून गेली.
गाडी सुरू करत त्याच्या ओठांवर नकळत एक मंद हसू उमटलं...
गाडी सुरू करत त्याच्या ओठांवर नकळत एक मंद हसू उमटलं...
आणि नियतीने दोघांच्या आयुष्यातील एका अनपेक्षित धाग्याची पहिली गाठ शांतपणे बांधली...
दुसरीकडे इनामदार वाडा शहरातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यांपैकी एक इनामदार घराणं..
उद्योगविश्वात ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जायचं, असं हे कुटुंब.
उद्योगविश्वात ज्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जायचं, असं हे कुटुंब.
त्यांच्या मालकीच्या तब्बल चार मोठ्या फॅक्टऱ्या होत्या. हजारो कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह त्या उद्योगांवर अवलंबून होता. प्रामाणिकपणा, मेहनत आणि विश्वास या तीन तत्त्वांवर इनामदारांनी आपलं साम्राज्य उभं केलं होतं.
या घराण्याचा वारस...ओजस इनामदार.
उंच, देखणा, निळेशार डोळे, चेहऱ्यावर कायम आत्मविश्वासाचं स्मित...पण त्याची खरी ओळख त्याच्या व्यक्तिमत्त्वात नव्हती...तर त्याच्या आवाजात होती.
लहानपणापासूनच त्याचं मन संगीतामध्ये रमायचं. व्यवसाय, नफा-तोटा, मीटिंग्स...या सगळ्यापेक्षा त्याला सुरांचं विश्व जास्त जवळचं वाटायचं.त्याचं हे वेड ओळखून घरच्यांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली होती.
वयाच्या तिशीपर्यंत...त्याला त्याच्या स्वप्नांच्या मागे धावण्याची पूर्ण मोकळीक असेल. तो गाणं शिकेल...अगदी स्टेजवरही गाईल...जग पाहील...हवं ते करेल.पण...वय वर्ष पस्तीस पूर्ण झाल्यानंतर मात्र त्याने इनामदारांचा व्यवसाय सांभाळायचा.
उंच, देखणा, निळेशार डोळे, चेहऱ्यावर कायम आत्मविश्वासाचं स्मित...पण त्याची खरी ओळख त्याच्या व्यक्तिमत्त्वात नव्हती...तर त्याच्या आवाजात होती.
लहानपणापासूनच त्याचं मन संगीतामध्ये रमायचं. व्यवसाय, नफा-तोटा, मीटिंग्स...या सगळ्यापेक्षा त्याला सुरांचं विश्व जास्त जवळचं वाटायचं.त्याचं हे वेड ओळखून घरच्यांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली होती.
वयाच्या तिशीपर्यंत...त्याला त्याच्या स्वप्नांच्या मागे धावण्याची पूर्ण मोकळीक असेल. तो गाणं शिकेल...अगदी स्टेजवरही गाईल...जग पाहील...हवं ते करेल.पण...वय वर्ष पस्तीस पूर्ण झाल्यानंतर मात्र त्याने इनामदारांचा व्यवसाय सांभाळायचा.
ओजसनेही हसत ही अट मान्य केली होती.कारण त्याला माहित होतं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही तडजोडी स्वीकाराव्याच लागतात. पाश्चात्त्य संगीताचं सखोल शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेला गेला. तिथे अनेक वर्षं मेहनत घेत...स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत...आता तो कायमचा भारतात परतला होता. आता त्याचं एकच स्वप्न होतं...भारतात आधुनिक आणि भारतीय संगीताचा सुंदर संगम घडवणारं एक प्रतिष्ठित Music Academy सुरू करणं आणि त्या स्वप्नाची सुरुवात तो आता करणार होता ...
या इनामदार घराण्याचा आधारस्तंभ होते, विनीत इनामदार,ओजसचे वडील शिस्तप्रिय कणखर निर्णायक व्यक्तिमत्व.त्यांच्या एका शब्दावर संपूर्ण घर चालायचं.
घरातील प्रत्येक जण त्यांचा आदर करत होता, किंबहुना त्यांचा दराराच तसा होता. पण त्या कडक स्वभावामागे आपल्या कुटुंबासाठी जीव टाकणारा एक प्रेमळ बाप दडला होता. स्वतःच्या अथक मेहनतीच्या बळावर त्यांनी इनामदार उद्योगसमूह एवढ्या उंचीवर नेला होता.
रंजित इनामदार,विनीत यांचे धाकटे भाऊ.मोठ्या भावाला देवासारखा मानणारे. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभे राहणारे.व्यवसायातील प्रत्येक जबाबदारी ते अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळत होते.
स्नेहलता इनामदार,ओजसची आई.नावाप्रमाणेच प्रेम, माया आणि आपुलकीचा झरा.घरातला प्रत्येक सदस्य तिच्यासाठी सारखाच होता.तिच्या मायेने संपूर्ण घर कायम एकत्र बांधून ठेवलं होतं.
विदुला इनामदार,रंजित यांची पत्नी. हुशार,व्यवहारी आणि उत्तम व्यवस्थापक असलेली.व्यवसायातील अनेक निर्णयांमध्ये ती नवऱ्याला मोलाची साथ द्यायची.तरीही घर आणि कुटुंब हीच तिची पहिली प्राथमिकता होती.
घरातील सर्वात जास्त गोंधळ घालणारी जोडी म्हणजे...ओवी आणि ओम,ओजसची लाडकी धाकटी भावंडं. रंजित आणि विदुला ह्यांची मूल. या दोघांच्या खोड्या, भांडणं आणि सतत चालणारी मस्ती यामुळे इनामदार वाड्यात कायम हास्याचं वातावरण असायचं.
आणि...या सगळ्यात उठून येणारा वेदांत इनामदार. ओजसचा मोठा भाऊ. अत्यंत बुद्धिमान,महत्त्वाकांक्षी आणि व्यवसायात विलक्षण पारंगत. आपल्या वडिलांचा उजवा हात म्हणून तो आधीपासूनच संपूर्ण उद्योगसमूह सांभाळत होता. आणि खरं तर ओजस आज संगीताच्या क्षेत्रात उभा राहू शकला. त्यामागे सर्वात मोठा वाटा वेदांतचाच होता. वडिलांना समजावून सांगणं.ओजसच्या स्वप्नासाठी उभं राहणं आणि त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडणं.हे सगळं वेदांतनेच केलं होतं.म्हणूनच ओजसच्या आयुष्यात त्याच्या मोठ्या भावाचं स्थान केवळ भावाचं नव्हतं, तर एका मित्राचं मार्गदर्शकाचं आणि कायम पाठीशी उभ्या राहणाऱ्या आधारस्तंभाचं होतं.
पण नियतीने आता दोन वेगवेगळ्या जगात वाढलेल्या व्यक्तींना आस्था आणि ओजसला एकमेकांच्या आयुष्याच्या वाटेवर आणून उभं केलं होतं.
पुढे या दोन वाटा कुठे जाऊन मिळणार होत्या...
याचं उत्तर मात्र काळच देणार होता...
तुम्हाला काय वाटत कंमेंट्स करून कळवा....
Kramash
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
