मागील भागात आपण पाहिलं कि संध्याकाळच्या पूजेसाठी आस्था नववधूच्या रूपात सुंदर नऊवारी नेसून तयार होते. तिचं रूप पाहून घरातले सगळेच भारावून जातात, अगदी रिधानही काही क्षण तिच्याकडे पाहत राहतो. पूजेदरम्यान भटजींच्या सांगण्यावरून आस्था भीतीने रिधानच्या हाताला हात लावते. पूजा पुढे सुरू असतानाच रिधान मुद्दाम गरम झालेला तुपाचा चमचा तिच्या हाताला लावतो. चटका बसल्याने आस्था वेदनेने ओरडते, पण सगळ्यांसमोर तो काळजी घेत असल्याचा आव आणतो. घरच्यांना तो अपघात वाटतो, तर आस्था मात्र शांतपणे सगळं सहन करते. आता पाहूया पुढे,
तिला चटका लागला तस पटकन पुढे होऊन अवंतिकाने आस्थाचा हात पाहिला. हातावर लालसर चटका स्पष्ट दिसत होता.
"अगं बाई... केवढं लाल लाल झालं आहे.. खूपच चटका बसला ग ..."
त्यांच्या आवाजात काळजी होती आणि इकडे आस्थाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. तिला खरं सांगावंसं वाटत होतं...की हा अपघात नव्हता. पण रिधानने तिच्याकडे टाकलेली ती कठोर, इशारा देणारी नजर पाहताच तिचे शब्द घशातच अडकले.
तिने फक्त हलकंसं मान हलवली.
"मी ठीक आहे एवढं काही नाही झालेलं ..."
इतकंच ती एकदम हळूहळू पुटपुटली. रिधिमा लगेच फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली. तिने अलगद तिच्या हातावर बर्न लोशन लावलं.
"वाहिनी थोडी जळजळ होईल... पण लगेच बरं वाटेल."
ती प्रेमाने म्हणाली. तेवढ्यात गुरुजी आस्थाच्या सासऱ्यांकडे पाहून म्हणाले,
"यजमान,पूजा संपन्न झाली आहे.. मी निघतो "
एवढं म्हणून ते त्यांची दक्षिणा घेऊन निघून गेले. तस पूजा संपल्यामुळे रिधिमाने हळूच आस्थाला आधार देत उठवलं.
"चल, वहिनी... इथे बस. जास्त हालचाल करू नकोस."
असं म्हणून तिने तिला जवळच ठेवलेल्या खुर्चीवर बसवलं.आस्था शांतपणे बसली होती...हाताला जास्तच चटका बसल्यामुळे जळजळ होतच होती...
पण...त्यापेक्षा जास्त वेदना तिला त्या माणसाच्या वागण्याची होत होती...जो जगासमोर तिची काळजी घेत असल्याची अकटिंग करत होता...आणि त्याच्या आवाजात लपलेला विखार...तो तिचा करत असलेला तिरस्कार फक्त आस्थालाच माहित होता.
ती अजूनही तिच्या भाजलेल्या हाताकडे पाहत होती.
"तो असा का वागत असेल.....? माझ्यासमोर एक आणि घरच्यांसमोर एक....."
हा एकच प्रश्न तिच्या मनात राहून राहून येत होता.
ज्याने काही क्षणांपूर्वी जाणूनबुजून तिला दुखावलं...तोच आता सगळ्यांसमोर तिची काळजी घेत असल्याचा आव का आणत होता...?
तिच्या विचारांची साखळी तेवढ्यात तुटली कारण रिधानने लगेच मोबाईल काढला.
"मी डॉक्टरला फोन करतो."
असं म्हणून तो घाईघाईने नंबर शोधू लागला.
"अरे रिलॅक्स, दादा!"
रिधिमा हसत त्याच्या हातातून मोबाईल घेत म्हणाली,
"एवढं पण पॅनिक होऊ नकोस. या बर्न लोशनने बरं होईल. काही मोठं नाही... लालसर चटका कमी होईल..."
पण त्यावर रिधान मात्र मुद्दाम काळजी दाखवत म्हणाला,
"नक्की ना...? बघ ना... किती लाललाल झाला आहे तिचा हात."
असं म्हणत तो तिच्याजवळ आला आणि तिचा हात हलकेच हातात घेतला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्याच्या चेहऱ्यावरची काळजी खरी वाटत होती.
अवंतिका आणि अच्युतरावांनीही एकमेकांकडे पाहत सुटकेचा निःश्वास सोडला.
"चला, रिधानला आस्थाची काळजी आहे हे तर समजलं ..."
असं त्यांनाही वाटून गेलं. इकडे आस्थाची आई उर्मिलाताई तिच्या जवळ गेली. अन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्या हसून म्हणाल्या,
"आस्था... जावईबापू किती काळजी घेतात गं तुझी. देवाचीच कृपा आहे.. ग... ती अशीच राहूदे ."
ते शब्द ऐकताच आस्थाच्या डोळ्यांत पुन्हा पाणी तरळलं. तिला रडू आलं...पण त्या अश्रूंचा अर्थ कुणालाच समजला नाही.सगळ्यांना वाटलं...झालेली जखम लोशन लावल्यामुळे अजूनही झोंबत असेल.
"तिला थोडा आराम करू द्या."
अवंतिका म्हणाल्या.
रिधिमाने अलगद आस्थाला उठवलं आणि तिला खोलीत घेऊन गेली.
----------------------
रात्र बर्यापैकी झाली होती. एक-एक करून पाहुणेही निरोप घेऊ लागले तस घर पुन्हा शांत झालं.
जेवण झाल्यावर रिधिमा आनंदाने धावतच हॉलमध्ये आली अन जोरात ओरडली...
"सगळ्यांनी इथे या... मला एक सरप्राईज द्यायचं आहे!"
तस सगळे तिच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले.
तिने एका रंगीत लिफाफ्यातून दोन तिकिटं आणि हॉटेलचं बुकिंग व्हाउचर बाहेर काढलं.
"सरप्राईज...!"
ती आनंदाने म्हणाली.
"तुमच्या दोघांसाठी हनिमून पॅकेज बुक केलंय."
ते ऐकून रिधान आणि आस्था दोघेही अवाक् झाले. त्यांना याची कसलीच कल्पना नव्हती.
तस अवंतिका हसत हसत म्हणाल्या,
"हे आमच्याकडून तुम्हा दोघांच गिफ्ट आहे.परवा सकाळीच तुम्ही दोघं निघायचं."
ते ऐकून रिधानच्या चेहऱ्यावर क्षणभर नाराजी उमटली. त्याला स्पष्ट नकार द्यायचा होता.पण...सगळ्यांसमोर इतका वेळ तो काळजीवाहू नवऱ्याची अकटिंग करत होता.आता अचानक नकार दिला असता, तर घरच्यांच्या मनात शंका निर्माण झाली असती.त्यामुळे त्याने मनाविरुद्ध शांतपणे फक्त मान हलवली.
इकडे रिधिमा तर आधीच पुढचं प्लॅनिंग करून बसली होती.
"बस मग .. ठरलं तर!"
ती हसत म्हणाली.
"उद्या मी आणि वहिनी शॉपिंगला जाणार. हनिमूनला जाताना नवीन ड्रेस, सॅंडल, सगळं लागणार."
"आणि दादा... तू नाही म्हणायचं नाही... सरळ तुझं क्रेडिट कार्ड माझ्या हवाली करायचं.. "
तिचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले. पण आस्था मात्र शांत होती.रिधानकडे पाहण्याचीही तिची हिंमत होत नव्हती.आजचा दिवस...तिच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे थकवणारा आणि अनपेक्षित असा होता.
आता रात्र खूप झाली होती. सकाळपासून सगळेच गडबडीत असल्यामुळे सगळ्यांनाच प्रचंड दमल्यासारखं वाटत होतं.म्हणून थोड्याच वेळात घरातील सगळेजण आपापल्या खोल्यांकडे निघून गेले...
उद्याचा दिवस...आस्था आणि रिधानच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन येणार होता.
सगळे निघून गेले पण आस्था मात्र आपल्या खोलीच्या दारासमोर येऊन थांबली, karan त्या दाराच्या पलीकडे रिधान होता.आणि त्या विचारानेच तिच्या अंगावर काटा आला.क्षणभर तिला वाटलं, आज रिधिमासोबतच झोपावं.पण लगेचच तिने तो विचार मनातून काढून टाकला.
"घरच्यांच्या लक्षात आलं तर...?त्यांना काही समजलं तर??"
ती मनाशीच म्हणाली. शेवटी स्वतःला धीर देत तिने हळूच दार उघडलं.रूममध्ये मंद नाईट लॅम्पचा प्रकाश पसरला होता. अन रिधान आधीच गाढ झोपला होता.त्याला झोपलेले पाहून तिच्या जीवात जीव आला.
तिने शांतपणे आपले कपडे घेतले आणि फ्रेश व्हायला गेली.परत आल्यावर मात्र तिच्यासमोर नवा प्रश्न उभा राहिला.
"आता झोपायचं कुठे...?"
बेडवर झोपण्याचा विचारही तिच्या मनात आला नाही.कारण एकतर रिधानने पूर्ण बेड काबीज केला होता, त्यात त्याला उठवून त्याच्या बाजूला झोपणे म्हणजे तिला नकोच वाटले. म्हणून तिने कपाटातून एक चटई आणि पातळ चादर काढली. ती तिने जमिनीवर अंथरली व हळूच त्यावर अंग टाकलं.दिवसभराचा मानसिक आणि शारीरिक थकवा इतका होता की काही क्षणांतच तिच्या डोळ्यांवर झोपेची गुंगी चढली आणि ती गाढ झोपून गेली.
---
दुसऱ्या दिवशी सकाळीच आस्थाला जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिलं, सहा वाजले होते पण अजून घरात कुणीही उठलं नव्हतं. ती शांतपणे उठली.अंघोळ करून देवाला नमस्कार केला आणि सरळ स्वयंपाकघरात गेली.
सगळ्यांसाठी गरमागरम चहा केला...त्यानंतर कांदेपोहे, खोबऱ्याची चटणी आणि चहा ट्रेमध्ये मांडून ठेवला.
तिचं संपूर्ण स्वयंपाकघर आवरून झालं तेवढ्यात अवंतिका बाहेर आल्या.
तिचं संपूर्ण स्वयंपाकघर आवरून झालं तेवढ्यात अवंतिका बाहेर आल्या.
किचनमध्ये सगळी तयारी पाहून त्या क्षणभर थक्कच झाल्या.
"आस्था... हे सगळं तू केलंस?"
त्या कौतुकाने विचारू लागल्या.
आस्थाने हसत मान हलवली.
"हो, आई."
अवंतिकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं, त्यांनी एक घास खाऊन बघितला, तर त्यांना पोहे खूप टेस्टी लागले..
"खरंच... माझी सून गुणाची आहे... चव पण आहे हाताला... आता रिधान तिला समजून घेवो म्हणजे झालं..."
त्या मनातच म्हणाल्या..
---
काही वेळाने रिधानही बाहेर आला. आवरून तो डायरेक्ट डायनिंग टेबलवरच बसला.आस्थाने शांतपणे त्याच्या समोर पोह्यांची प्लेट ठेवली.
त्याने एक घास घेतला...आणि नकळत त्याच्या तोंडून निघालं,
"अरे वा...!आई... पोहे तर एकदम लाजवाब झालेत."
अवंतिका हसल्या.
"होणारच ना..."
त्या हसून एकदम मिश्कीलपणे म्हणाल्या,
"तुझ्या बायकोने केलेत."
ते शब्द कानावर पडताच...
रिधानच्या कपाळावर क्षणार्धात आठ्या उमटल्या. पण त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे नाश्ता करत राहिला.
वातावरण हलकं करण्यासाठी अवंतिकानेच विषय बदलला.
"मग उद्या किती वाजता निघायचं आहे तुम्हाला?"
ते ऐकून रिधान निर्विकारपणे म्हणाला,
"फ्लाइटच्या साधारण दोन तास आधी निघू. एअरपोर्टवर वेळेआधी पोहोचलेलं बरं."
"ठीक आहे."
अवंतिका मान हलवत म्हणाल्या. तेवढ्यात रिधिमा उत्साहात धावतच आली.
"वहिनी... चल ना! उशीर होईल.... जा जाऊन आवर "
आस्था तिच्याकडे पाहत हसली आणि मानेने होकार देत ती आवरायला गेली.
"अगं, आधी काहीतरी खाऊन तर जा."
पोहे खात अवंतिका रिधिमाला म्हणाल्या.
रिधिमा लगेच म्हणाली,
"नको आई... आम्ही बाहेरच काहीतरी खाऊ.शॉपिंगला वेळ लागेल."
तेवढ्यात आस्था बाहेर आली, तिने पटकन आपली पर्स घेतली.सगळ्यांचा निरोप घेत ती रिधिमासोबत बाहेर पडली.त्यांच्या गप्पा आणि हसण्याचा आवाज हळूहळू दूर जाऊ लागला.
अवंतिका त्यांच्या पाठोपाठ पाहत हसल्या.
"या मुली पण ना..वेंधल्या आहेत नुसत्या... शॉपिंग म्हंटली कि ह्यांचा आनंद गगनात मावत नाही... पण गोड आहेत.. देवा ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच राहूदे......"
असं म्हणत त्या पुन्हा घरात निघून गेल्या.
काय असेल रिधानच्या मनात??
तो आस्थासोबत काय करेल???
क्रमश :-
तो आस्थासोबत काय करेल???
क्रमश :-
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
