अगस्त्यने दीप्तांशुकडे पाहिले आणि विचारले, "काय झालं दीप्तांशु?"
"ते दादा, मला जावं लागेल." दीप्तांशु म्हणाला.
"का?" राजवीरने विचारले.
"मी पार्ट टाईम जॉब करतो. जरासाही उशीर झाला तर ओरडा मिळेल." दीप्तांशुने सांगितले.
"बरं, ठीक आहे जा... पण आधी अधिराला तुझं इंट्रोडक्शन देऊन देतो." राजवीर म्हणाला.
"ओके." दीप्तांशुने होकारार्थी मान हलवली.
"अधिरा, हा दीप्तांशु..." राजवीरने अधिराला हातवारे करून सांगितले.
"चौधरी..." दीप्तांशुने त्याचे आडनाव सांगितले.
"ओके. तू कोणत्या वर्गात आहेस?" राजवीरही आज पहिल्यांदा भेटला होता म्हणून त्याला फारशी कल्पना नव्हती.
"बी.कॉम. सेकंड ईयर..." दीप्तांशुने सांगितले.
"ओके."
त्यानंतर राजवीरने घाईतच हातवारे करून अधिराला दीप्तांशुचा परिचय दिला.
"हाय अधिरा, आपण भेटू नंतर कधीतरी... सॉरी लवकर जावं लागतंय. बाय." दीप्तांशुने घाईतच वहीत लिहिले. अधिराने वाचले आणि हात हलवून त्याला अभिवादन केले.
"बाय एव्हरीवन." दीप्तांशुने सगळ्यांचा निरोप घेतला व तो तिथून बाहेर गेला.
"बाय." सगळ्यांनीच त्याला निरोप दिला आणि काही वेळ तो गेला, त्या दिशेने बघत राहिले.
"एवढ्या कमी वयात जॉब करतो हा... किती रिस्पॉन्सिबल आहे ना!" राजवीर हलका हसत म्हणाला.
"ह्म्म." सगळ्यांनीच हुंकार भरला.
"खरंतर मी ऐकलंय की त्याचे आई-बाबा छोटेखानी ढाबा चालवतात; पण त्याला पॉकेटमनी आई-बाबांना मागावीशी वाटत नाही म्हणून स्वतःचा खर्च तो स्वतः मॅनेज करतो." प्रनिशने माहिती दिली.
"ग्रेट!" विराज म्हणाला.
"लेट्स बॅक टू कॉन्व्हर्सेशन... अगस्त्य गो अहेड..." राजवीरने अगस्त्यकडे मोर्चा वळवला.
"हा..." अगस्त्यने होकार दिला आणि अधिराला वही सोपवून त्याने काही वेळापूर्वी लिहिलेल्या ओळी वाचायला सांगितल्या.
"हाय..." वाचून झाल्यावर अधिराने मंद स्मित करत त्याखाली लिहिले.
"सकाळी जे काही झालं त्यासाठी परत एकदा सॉरी." त्याने परत एकदा माफी मागितली, तशी सगळ्यांनी नकारार्थी मान हलवली.
"इट्स ओके रे! सोड ना ते... फर्स्ट इम्प्रेशन इज नॉट लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे रिलॅक्स हो आता..." राजवीरने समजावले.
अगस्त्यने केसांत हात फिरवला.
"इट्स ओके. लेट्स फॉरगिव्ह इच अदर :)" अधिराने लिहून स्मायली काढली.
"ओके, देन फ्रेंड्स?" त्यानेही स्मायली काढून विचारले.
अधिराने त्याला बघून मंद स्मित केले आणि होकारार्थी मान हलवली, तर सगळ्यांनी हसतच टाळ्या वाजवल्या.
"अधिरा, ही आहे गाथिका घाटगे. सध्या बी.ए. एलएलबी फोर्थ ईयरला आहे." राजवीरने हातवारे करून सांगितले. तशी अधिरा गाथिकाकडे बघून हसली.
"हाय अधिरा..." गाथिकाने वहीत लिहिले.
"हाय!" अधिराने लिहिले.
"अगस्त्यपेक्षा मी तुझी चांगली मैत्रीण होईल, सो बेस्ट फ्रेंड म्हणून मला निवडतेस?" गाथिकाने विचारले. अगस्त्यने तिच्याकडे बघून डोळे बारीक केले.
"चीटर..." अगस्त्य गाल फुगवून म्हणाला, गाथिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तसे सगळेच हसले.
"चालेल ताई!" अधिराने लिहिले.
"ताई वगैरे नको गं म्हणू... मला गाथा म्हणायचं. असंही आपल्यात इतकंही अंतर नाही. हार्डली २-३ वर्षाची एज गॅप आहे आपल्यात, त्यातही तू ताई म्हणशील तर सिनियर सिटीझन झाल्यासारखं वाटेल." गाथिकाने लिहिले, ते वाचून अधिरा खुदकन हसली.
"ओके." अधिराने अंगठा दाखवला, तशी गाथिका गालात हसली.
"हा मयंक पवार आणि हा प्रनिश डोंगरे, हे दोघेही एम.कॉम. फर्स्ट ईयरला आहेत." राजवीरने मयंक आणि प्रनिशकडे बघून अधिराला त्यांचा परिचय दिला.
"हाय मयंक दादा, हाय प्रनिश दादा..." तिने वहीत लिहून अभिवादन केले.
"हाय अधिरा, आम्हालाही तू दादा म्हटलं नाही तरी चालेल." मयंकने लिहिले. तशी ती मंद हसली.
"लेट्स बी गुड फ्रेंड्स!" प्रनिशने लिहिले. अधिराने ते वाचून होकारार्थी मान हलवली.
"हा रजनीश लिमये आणि ही तनिशा सराफ, हे दोघेही एम.एस.सी. फर्स्ट ईयरला आहेत." राजवीरने रजनीश आणि तनिशाचा परिचय दिला.
त्या दोघांनीही वहीतून मैत्रीसाठी विचारले. अधिराने त्यांचीही मैत्री स्वीकारली.
"हाय मी सौंदर्या देशमुख आहे आणि मी एम.ए. फर्स्ट ईयरला इंग्लिश लिटरेचर शिकत आहे." सौंदर्याने वहीत लिहून अधिराला स्वतःच परिचय दिला.
"हाय..." अधिराने हात हलवून अभिवादन केले.
"वन मोअर थिंग, मला सगळे सॅंडी म्हणतात तूही तेच म्हण आणि माझ्या मते तू आमच्यापैकी कोणालाच ताई-दादा म्हणू नको. रिस्पेक्ट हा मनात असतो, त्याला अशा शब्दांची गरज नाही. आजपासून तूसुद्धा आमच्या ग्रुपचा भाग आहेस, सो आपण मस्त धमाल करूयात." सौंदर्या म्हणाली.
"हो." सर्वकाही वाचून अधिराने होकार दिला.
"मला आजपर्यंत फ्रेंड्स नव्हते, त्यामुळे थॅंक यू माझ्याशी मैत्री करण्यासाठी..." अधिराने वहीत लिहिले.
सगळ्यांनीच ते वाचून मंद स्मित केले.
"व्हॉट अबाऊट मी अधिरा? मी तुझा फ्रेंड नाही?" विराजने डोळे बारीक केले.
"सॉरी! तू स्पेशल फ्रेंड आहेस." अधिराने कान पकडून लडिवाळपणे माफी मागितली.
"इट्स ओके." विराजने गालात हसत तिच्या डोक्यावर हात ठेवला, तशी ती हसली.
त्यांची केमिस्ट्री बघून का कुणास ठाऊक पण अगस्त्यचा चेहरा मात्र पडला होता आणि त्याच्या हावभावातला तो बदल गाथिकाच्या तीक्ष्ण नजरेने लगेच हेरला होता.
"बाय द वे वीर दादा, अधिरा काय शिकतेय? हिला याआधी कधी बघितलं नाही आम्ही? आताच ॲडमिशन घेतलीय का?" गाथिकाने राजवीरला प्रश्न केला.
"नाही. अधिरा आणि रुधिरा आतापर्यंत घरूनच शिकत होत्या." राजवीर उत्तरला.
"ओह! पण रुधिरा कोण?" गाथिकाने गोंधळून विचारले.
"माझी दुसरी बहीण..." राजवीर म्हणाला.
"अधिरा-रुधिरा... दोघींचीही नावे जुळी आहेत." मयंक किंचित हसून म्हणाला.
"नावेच नाही, तर या दोघीही जुळ्या आहेत." विराजने सांगितले.
"काय? खरंच?" सगळ्यांनीच कुतुहलाने विचारले.
"ह्म्म." राजवीरने हुंकार भरला.
"मग रुधिराही आली असेल ना कॉलेजला, ती कुठे आहे?" गाथिकाने उत्सुकतेने विचारले.
"कोणास ठाऊक..." विराज पुटपुटला.
रुधिराच्या बंडखोर वागण्याचे परिणाम कायम अधिरा आणि राजवीरला भोगावे लागत असल्याने विराजला तिचा राग येत असायचा.
"म्हणजे?" सगळ्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"काही नाही... ती इंट्रोव्हर्ट आहे, मिसळत नाही कोणात... त्यामुळे घरी गेली असेल." राजवीरने लगेच सारवासारव केली.
"अच्छा!" गाथिका म्हणाली.
"ह्म्म." राजवीरने हुंकार भरला.
"दादा, तू सांगितलं नाही अधिरा काय शिकतेय ते..." तनिशा म्हणाली.
"अधिरा, बी.ए. सेकंड ईयरला आहे." राजवीरने सांगितले.
"अच्छा! विषय कोणते आहेत?" गाथिकाने उत्सुकता दर्शवली.
"मराठी वाङ्मय, इतिहास, तत्त्वज्ञान हे तीन निवडले आहेत अधिराने... इंग्रजी आणि मराठी तर कम्पल्सरी विषय आहेत." राजवीरने माहिती दिली.
"काय योगायोग आहे!" अचानक गाथिका म्हणाली.
"कसला?" सगळ्यांनीच तिच्याकडे गोंधळून पाहिले.
अगस्त्यने नकारार्थी मान हलवली, तर गाथिका सूचक हसली.
अगस्त्यने इशाऱ्यातच तिला गप्प बसायला सांगितले; पण गाथिका काही शांत बसणाऱ्यातली नव्हतीच.
"ॲक्च्युली अगस्त्यनेही इक्झॅक्टली हेच विषय घेतले होते ग्रॅज्युएशनसाठी... त्याबद्दल बोलतेय मी..." गाथिकाने सांगितले, तसा अगस्त्यने डोक्यावर हात मारला.
"खरंच अगस्त्य?" राजवीरने आश्चर्याने विचारले.
"हो दादा!" अगस्त्यने अवघडून हसून होकार दिला.
"मग अगस्त्य, तू एक हेल्प करशील का?" राजवीरने विनंतीस्वरूप विचारले.
"कोणती?" अगस्त्यने गोंधळून पाहिले.
"तू अधिराला अभ्यासात मदत करू शकतोस?" राजवीरने विचारले आणि गाथिका मनोमन खूश झाली.
"म्हणजे तुझे सेल्फ-मेड नोट्स वगैरे असतील तर ते देऊ शकतोस का अधिराला? तसं तर आम्ही तिला नोट्स घेऊन दिले आहेत; पण तुझे नोट्स डिटेल्ड असतात. शिवाय मी ऐकलंय की तू अवघड आणि किचकट कॉन्सेप्ट्सही सोप्या शब्दांत लिहितोस. तुला एक्सप्लेन करणंही नीट जमतं तर तू थोडीफार मदत करू शकतोस का अधिराला? प्लीज!" राजवीरने विचारले आणि उत्तराची वाट बघू लागला.
"प्लीज काय दादा? मी देईल नोट्स अधिराला... आणि तिला काही कॉन्सेप्ट समजायला अडचण आली तर ती मला बिनधास्त विचारू शकते. मी तिचे डाऊट्स नक्की क्लियर करेल. तू काळजी करू नकोस." अगस्त्यने अधिराकडे बघून हलके हसत राजवीरला आश्वासन दिले.
"तू माझं सगळं टेन्शन दूर केलंस. थॅंक गॉड तू अधिराचा सिनियर आहेस. थॅंक यू सो मच अगस्त्य..." राजवीरच्या चेहऱ्यावरून आनंद झळकत होता.
तेवढ्यात गाथिका म्हणाली, "थॅंक यू काय दादा!"
"हा ना..." अगस्त्य बोलतच होता की पुढे गाथिका म्हणाली.
"यात अगस्त्यचा स्वार्थच आहे." गाथिकाचे शब्द ऐकून अगस्त्यच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"म्हणजे?" राजवीर आणि विराज अगस्त्यकडे साशंक नजरेने बघू लागले.
"अरे म्हणजे तू तुझं साम्राज्य आय मीन ड्रामा क्लबचं प्रतिनिधित्व त्याच्याकडे सोपवलंय ना, तर आता तुझ्या गुड बुकमध्ये राहायला तो इतकं तर करणारच ना!" गाथिकाने अगस्त्यची खिल्ली उडवली, तसे सगळेच फिदीफिदी हसू लागले. राजवीर आणि विराजही नकारार्थी मान हलवून हसले.
"गाथा, तू ना खूपच बडबड करतेय. कदाचित पैज हरल्यामुळे तुझा मेंदू सरकत सरकत पोटात गेलाय. हा कागद खा, सगळं डोकं ठिकाणावर येईल." अगस्त्यने एक कागदाचा गोळा गाथिकाच्या तोंडात कोंबला, तशी तिथे हशा पिकली. अधिराला काही ऐकू येत नसले तरी त्या दोघांची कुरबुर बघून तिलाही हसू फुटले.
गैरसमज दूर होऊन अगस्त्य आणि अधिराची मैत्री तर झाली. आता मैत्री ते प्रेमापर्यंतचा प्रवास कसा असेल?
क्रमशः
........
© सेजल पुंजे.
........
© सेजल पुंजे.
