Login

साज़िश: गॅम्बल ऑफ लव्ह (भाग-१५)

अगस्त्य आणि अधिराने केला प्रेमविवाह, दोघेही एकत्र खूप खूश; पण एकाएकी अधिराचा झाला खून आणि हत्येच्या आरोपाखाली अगस्त्यला झाली अटक! अख्खा महाराष्ट्र त्याच्याविरोधात असताना त्याची मैत्रीण—गाथिकाने त्याची केस लढण्याचा घेतला निर्णय. कोणती रहस्ये उलगडेल हा खटला? या रक्तरंजित खेळाचा सूत्रधार अगस्त्य असेल की आणखी कोणी? जाणून घेण्यासाठी वाचा "साज़िश: Gamble Of Love"
पडद्यामागे येताच विराजने कल्याणीकडे बघितले आणि म्हणाला, "कल्याणी, ऐकतेस ना टाळ्या..."

"ह्म्म. लोकांना आवडली आपली कॉन्सेप्ट!" कल्याणीचा चेहरा खुलला होता.

"फक्त कॉन्सेप्ट नाही, ॲक्टिंगही..." राजवीर खूश होत म्हणाला.

"खरंच!" असं बोलून कल्याणीने मुखवटा काढून बाजूला ठेवला आणि अधिराकडे वळली.

"अधिरा, थॅंक्स अ लॉट यार... यू सेव्ह अस टुडे!" कल्याणी अधिराचे गाल ओढत म्हणाली.

राजवीर तिला हातवारे करून सांगतच होता की अधिरा हातवारे करत म्हणाली, "मला कळलं, ताई थॅंक्स म्हणत आहे."

"ह्म्म." राजवीरने हुंकार भरला.

त्यानंतर अधिरा आणि कल्याणीने एकमेकींना मिठी मारली.

"चला! आता पटापट चेंज करू... इतरांचे प्लेसुद्धा बघायचे आहेत." विराजनेही त्याचा मुखवटा काढला.

"ह्म्म." राजवीरने हुंकार भरला.

त्यानंतर चौघेही कपडे बदलायला गेले.
.........

"अगस्त्य, काय झालं? असा का बघतोय? ठीक आहेस ना?" अगस्त्य रंगमंचाकडे एकटक बघत होता, त्यामुळे गाथिका त्याला विचारपूस करत होती.

"ह्म्म." अगस्त्य भानावर येत म्हणाला.

"यू नो व्हॉट, पहिल्यांदा माईम बघून इतका इम्प्रेस झालोय मी! आय लव्ह देअर ॲक्ट... मला खूप आवडला. वीर दादा आणि त्याच्या ग्रुपचं करावं तेवढं कौतुक कमीच..." अगस्त्य आता भरभरून बोलत होता.

"मलाही आवडला माईम. काय भारी कॉन्सेप्ट निवडली ना!" गाथिकानेही तिचे मत मांडले.

"फक्त कॉन्सेप्टमुळे नाही, त्यांच्या ॲक्टिंगमुळेही विषय छान कन्व्हे झाला." अगस्त्य ठामपणे म्हणाला.

"सहमत आहे. कधीकधी विषय चांगले असतात; पण ॲक्टिंगमुळे ते मनाला भिडत नाहीत. वीर दादाच्या ग्रुपने कुठेच कसर सोडली नाही. विषय जितका दमदार, तितकीच ॲक्टिंग जबरदस्त!" सौंदर्या म्हणाली.

"खरंय!" तनिशाने दुजोरा दिला.

"तसा वीर दादाचा ग्रुप दरवर्षीच युनिक कॉन्सेप्ट घेऊन मंचावर येतो. यावर्षीही त्यांच्या ग्रुपने कमालच केली." मयंक म्हणाला.

"बरोबर!" रजनीश म्हणाला.

"काय मग दीप्तांशु, तुला आवडला की नाही परफॉर्मन्स?" प्रनिशने दीप्तांशुला विचारले.

"खूप आवडला पण त्यांच्यापैकी वीर दादा कोण होता?" दीप्तांशुने गोंधळून विचारले. त्याचा प्रश्न ऐकून सगळे हसले.

"मास्कमुळे तुला कळलं नसेल ना... थांब, स्पर्धा संपल्यावर तुझी भेट घडवून देतो." अगस्त्य म्हणाला.

"चालेल." दीप्तांशु ओशाळून हसला.

त्यानंतर ते सगळे परत माईमविषयी चर्चा करू लागले, तर दीप्तांशुला कॉल आल्यामुळे तो तिथून बाहेर गेला.

"बाय द वे, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का?" अगस्त्यने त्याच्या मित्रांना विचारले.

"कोणती?" सगळ्यांनी गोंधळून विचारले.

"कल्याणी ताईबरोबर जी मुलगी होती ना..." अगस्त्य बोलतच होता की गाथिका म्हणाली.

"मंजुषा दी?"

"ती मंजुषा दी नव्हती." अगस्त्य म्हणाला.

"हं? काय बोलतोयस? थापा नको हं मारू..." गाथिका डोळे बारीक करून म्हणाली.

"मी खरं बोलतोय." अगस्त्य म्हणाला.

"कशावरून? पुरावा काय आहे?" गाथिकाने विचारले.

"ते..." अगस्त्य थोडा थांबला.

"एक मिनिट, तुला मंजुषा दीची ॲक्टिंग आवडली नाही म्हणून असं म्हणतोय का?" तनिशाने डोळे बारीक करून विचारले. तसे सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले.

"नाही रे बाबा, उलट मंजुषा दीचा रोल प्ले करणाऱ्या मुलीची ॲक्टिंग खूप आवडली मला..." अगस्त्य उत्तरला.

"अरे भावा पण तुला कशी काय खात्री आहे की ती मंजुषा दी नाही?" मयंकने कपाळावर आठ्या पाडून विचारले.

"तिच्या उंचीमुळे..." अगस्त्यने उत्तर दिले, तसे सगळे त्याच्याकडे विचित्रपणे बघू लागले.

"म्हणजे?" सौंदर्याने प्रश्न केला.

"मंजुषा दी कल्याणी ताईपेक्षा उंच आहे; पण आज जी मुलगी कल्याणी ताईसोबत होती ती कल्याणी ताईपेक्षा किंचित ठेंगणी होती." अगस्त्यने त्याचे निरीक्षण सांगितले.

"आणि हे तुला इथे बसून कळलं?" गाथिकाने डोळे फिरवले.

"हो." अगस्त्य ठामपणे म्हणाला.

"मला नाही विश्वास... तू उगाच गंडवतोय आम्हाला..." गाथिकाने त्याचे शब्द उडवून लावले.

"बरं, लागली पैज?" अगस्त्य हात पुढे करत म्हणाला.

"पैज?" गाथिकाने भुवया उंचावल्या.

"हो, मला विश्वास आहे की माझं निरीक्षण चोख आहे. आता तू बघ..." अगस्त्यने खांदे उडवले.

"ठीक आहे, लागली पैज!" गाथिकाने ओठांचा कोपरा उंचावला.

"जो पैज हारेल, तो आज सगळ्यांना ट्रीट देणार." अगस्त्यने अट घातली.

"ओके. डील." गाथिकाने सहज मान्य केले.

"ह्म्म." अगस्त्य गालात हसला.

त्यांचे बाकी मित्र तर 'कोणीही जिंकू दे, फक्त फ्री ट्रीट मिळू दे!' हा एवढाच विचार करत होते.

"बाय द वे, लेट मी रिमाईंड यू... मी नेहमीच लकी असते. कधीच कोणती पैज हरले नाहीये मी मित्रा!" गाथिका अगस्त्यच्या गालावर थोपटत म्हणाली.

"मीही खात्री असल्याशिवाय पैज लावत नाही, सखे." अगस्त्यनेही गाथिकाचा गाल ओढत उत्तर दिले.

"बघू..." गाथिकाने मानेला झटका दिला. त्यानंतर सगळे परत नाटक बघण्यात रमले.

पाहता पाहता सगळ्यांचे नाटक सादर करून झाले. निकाल दोन दिवसानंतर जाहीर केला जाणार होता. त्यामुळे कार्यक्रमाची सांगता होताच सगळेजण नाटक सभागृहातून बाहेर पडले.

"पैज लक्षात आहे ना..." नाटक सभागृहातून बाहेर येताच गाथिकाच्या खांद्यावर हात ठेवून अगस्त्यने तिला आठवण करून दिली.

"कोणती पैज दादा?" दीप्तांशुने मध्येच प्रश्न केला.

"आहे एक... आणि तुझी गाथा ताई ती पैज हरणार आहे." अगस्त्य दात दाखवत म्हणाला.

"कॉन्फिडन्स ठीक आहे; पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा माणसात..." अगस्त्यच्या पोटात हळूच कोपर मारत गाथिका म्हणाली.

"ह्म्म." अगस्त्यने तिरपे ओठ करत हुंकार भरला.

"तो बघ, तिथे आहे वीर दादा... आताच त्याच्याकडून शहानिशा करू." गाथिका एका वर्गखोलीजवळ मोबाईल चाळत उभा असणाऱ्या राजवीरकडे इशारा करत म्हणाली.

"चल..." अगस्त्य म्हणाला. त्यानंतर ते सगळेच त्या वर्गखोलीजवळ गेले.

"वीर दादा..." गाथिका पळतच राजवीरजवळ गेली. तिच्या मागोमाग रजनीश, प्रनिश, मयंक, सौंदर्या, तनिशा, अगस्त्य आणि दीप्तांशुही आले.

"ओहो! कुठे निघाली पलटण?" गाथिकाकडे बघून राजवीरने मंद हसत विचारले.

"तुझ्याकडेच..." गाथिका म्हणाली.

"माझ्याकडे?" राजवीरने गोंधळून पाहिले.

"हो ते..." गाथिका बोलतच होती की अगस्त्य म्हणाला.

"मी सांगतो."

"हा..." गाथिका शांत झाली.

"दादा, हा दीप्तांशु... ज्युनिअर आहे. याला तुला भेटायचं होतं." अगस्त्यने दीप्तांशु आणि राजवीरची ओळख करून दिली. तशी गाथिका अगस्त्यकडे डोळे बारीक करून बघू लागली, कारण तिला वाटले होते की तो मंजुषाविषयी प्रश्न विचारेल.

"हाय दीप्तांशु... तुलाही नाटकाचा छंद दिसतो. कीप इट अप." राजवीर हात मिळवत म्हणाला.

"थॅंक यू दादा. मला तुमचा माईम ॲक्ट खूप आवडला. खूप छान कॉन्सेप्ट आणि प्रेझेंटेशन होतं." दीप्तांशु म्हणाला.

"थॅंक्स." राजवीरने आभार मानले.

"आम्हालाही तुमच्या ग्रुपचा ॲक्ट खूप आवडला." तनिशा म्हणाली, तसा राजवीर मंद हसला.

"प्रत्येक बारकाव्यातून कथा मनापर्यंत पोहोचवण्याचं स्किल मला खूप आवडतं आणि दादा, तुझ्या ग्रुपची हीच खरी ओळख आहे." सौंदर्या म्हणाली. राजवीरला कौतुक ऐकून समाधान वाटत होते.

"एकही डायलॉग न बोलता प्रत्येक भावना आर्ततेने व्यक्त करण्याचं टॅलेंट आहे दादा तुमच्या ग्रुपमध्ये..." मयंकनेही समीक्षा केली.

"आजपर्यंत आम्ही तुला एकांकिका, दोन पात्री नाटक आणि साधं नाटक करताना पाहिलं होतं; पण तुमचा ग्रुप माईमही इतकं उत्कृष्ट परफॉर्म करू शकतो याची कल्पनाच नव्हती." प्रनिश म्हणाला.

"ॲज ऑल्वेज यू अमेझ्ड अस!" रजनीश म्हणाला.

"नो डाऊट तुमची ॲक्टिंग जबरदस्त होती; पण कॉन्सेप्टने माझं मन जिंकलं." गाथिका म्हणाली.

राजवीर सगळ्यांचे मत ऐकून घेत होता.

"मला तर किती आणि काय कौतुक करू असं झालंय; पण एका वाक्यात सांगायचं झालं तर नेहमीप्रमाणे पूर्ण ॲक्टच आवडलाय मला!" अगस्त्य म्हणाला, तसा सगळ्यांनीच त्याच्या शब्दांना दुजोरा दिला.

"बाप रे! तुम्ही इतकं कौतुक केलंय की आता तुमचे आभार मानायलाच हवे. तुम्हाला ट्रीट द्यायची इच्छा होतेय. चला, कॅन्टीनमध्ये..." राजवीर गालात हसत म्हणाला.

"वॉव ट्रीट!" सगळेच खूश होत म्हणाले.

"एक मिनिट, ट्रीट मिळावी म्हणून तर खोटं कौतुक केलं नाही ना?" राजवीर डोळे बारीक करून साशंक स्वरात म्हणाला.

"नाही दादा. आम्ही जेन्युनली मनापासून कौतुक केलं." गाथिका म्हणाली. बाकी सगळेही तिचीच री ओढू लागले.

"हो ना! शिवाय दादा आज ट्रीटची काळजी नाही." अगस्त्य गूढ हसत म्हणाला.

"का?" राजवीरने न कळून विचारले.

"ते सांगतो नंतर, आधी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे." अगस्त्य म्हणाला.

"बरं." राजवीर म्हणाला.

"दादा, मंजुषा दी कुठे आहे? चेंज करतेय का?" शेवटी अगस्त्यने प्रश्न विचारला.

"नाही अरे, ती घरी आहे. तिला कावीळ झालाय." राजवीरने सांगितले, तसा गाथिकाचा चेहरा पांढरा पडला.

"काय?" सगळ्यांनाच धक्का बसला.

"हो! पण काळजीचं कारण नाही. ट्रीटमेंट सुरू आहे तर होईल ती लवकरच बरी." राजवीर म्हणाला.

"दादा, कल्याणी ताईसोबत माईम करणारी मुलगी मंजुषा दी नव्हती?" गाथिकाने तोंड पाडून विचारले.

"नाही." राजवीर उत्तरला. तसा अगस्त्य भुवया उडवत गाथिकाला चिडवू लागला.

"शी यार..." गाथिकाने नाक मुरडले आणि वैतागून अगस्त्यलाच फटके मारले, त्याला मात्र काही फरक पडला नाही.

"हे काय?" राजवीरने गोंधळून विचारले.

"ते काय आहे ना दादा आमच्या गाथिका ताई पैज हरल्या म्हणून त्यांचा चेहरा पडला." गाथिकाच्या कपाळावर टिचकी मारून अगस्त्य हसतच म्हणाला.

गाथिकाच्या फजितीवर बाकी सगळेजण ओठ दाबून हसत होते.

"कोणती पैज?" राजवीरने प्रश्न विचारला, तसा आता अगस्त्य गाथिकाकडे बघू लागला.

क्रमशः
..........
© सेजल पुंजे.

अगस्त्य आणि गाथिकाच्या पैजेबद्दल कळल्यावर राजवीरची काय प्रतिक्रिया असेल?


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →