Login

रिकामं पाकीट ( भाग एक)

रिकामं पाकीट

मयुरी बाहेर येताना माझं पाकीट आण...

मयुरी मंदिरात जाण्याची तयारी करत असते . पाकीट घेऊन ती अनयच्या हातात देते .

अनय छोटस पाकीट हलवत बाहेर घेऊन येतो. तो सहजच पाकीट उघडून बघतो तर त्यामध्ये पैसेच नसतात. तो आजीला बोलतो आजी यामध्ये तर पैसेच नाहीत.  फक्त आजोबांचा फोटो आहे. तुला पर्स कशासाठी हवी....

'अरे आता आपण बाहेर चाललोय ना , म्हणून हातात असावी' काही आवडीच दिसल तर घेता येईल.

अगं पण आजी तुझ्या आवडीचं घेण्यासाठी या पर्समध्ये पैसे तर पहाजेत !

आजी म्हणते जा तुझ्या पप्पा कडून पैसे घेऊन ये.

अनय उड्या मारत मारत त्याच्या पप्पांच्या कडे जातो आणि म्हणतो पप्पा मला जरा पैसे द्या ना. पप्पा म्हणतात कशाला हवे तुला एवढ्या लहान वयात पैसे. अहो पप्पा त्या आजीच्या पर्समध्ये एकही रुपया नाहीये म्हणून तुम्हाला मागत होतो.

तेजस अनयचे बोलणे ऐकल्यानंतर बाहेर येतो व आईला म्हणतो पर्स कशासाठी घेतेस, आपण सगळे एकत्रच मंदिरात चाललोय. तुला पैशांची काय गरज.....

अरे पण मला पैसे लागले तर....

अगं आई मी आहे ना तुझ्यासोबत , तुला काय हवं ते माग मी तुला देतो...पैसे राहू दे .

सुरेखा तरीही सर्वांच्या नकळत पाकीट हातात घेते.

सर्वजण मस्त तयारी करून गाडीने मंदिराकडे जाण्यासाठी निघतात. थोड्या अंतरावर गेल्यानंतर अनय बोलु लागतो . पप्पा मला खूप भूक लागली आहे. मयुरी बोलते मला देखील खूप तहान लागली आहे. पुढे थांबून आपण पाण्याची बाटली आणि काहीतरी खायला घेऊया.

काही अंतरावर गेल्यानंतर एका दुकानाजवळ गाडी थांबते. तेजस आईला बोलतो .... आई तू गाडीतच थांब!  आम्ही आपल्यासाठी थोडा खाऊ घेऊन येतो . असे म्हणून तेजस मयुरी दोघे गाडीतून खाली उतरतात तेव्हा हट्टाने अनयही त्यांच्यासोबत दुकानात जातो. त्याचवेळी तिथे करवंद आणि जांभळ विकणारी एक बाई टोपली घेऊन गाडी जवळ येते.

ती सुरेखा ला विचारते ताई जांभळ आणि करवंद घेणार का? आत्ताच तोडून आणली आहेत. जांभूळ आणि करवंद बघून सुरेखाला खाण्याची इच्छा होते.

हातात तर पाकीट असतं पण ते रिकाम....

रिकाम्या पाकीटान  आपली इच्छा कशी पूर्ण होणार.
क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →