लघुकथा लेखन स्पर्धा मे-जून 2026
विषय -रहस्य लघुकथा
विषय -रहस्य लघुकथा
रहस्यामागचे रहस्य
"ये भवाने तिकडे जाऊ नको." रमाक्काचा धारदार आवाज घुमला.
तशी नेहा अंगणातच थबकली.
तशी नेहा अंगणातच थबकली.
का?...का तिकडे जाऊ नको? विचारु शकत नव्हती.नवी नवी घरात आलेली अजून पुरती रुळलीच नाही तर असे प्रश्न कसे विचारायचे?तो आगाऊपणा ठरला असता.
पण काल तिच्या सासूबाईंनी कविताने पण तिला सांगितलेले,"तिकडे जाऊ नको"
पण काल तिच्या सासूबाईंनी कविताने पण तिला सांगितलेले,"तिकडे जाऊ नको"
एवढी मोठी गावात प्रसिद्ध हवेली.
"दादादादीची हवेली" म्हणून पंचक्रोशीत ओळख.
त्याच्या आकारावरून लक्षात येत होतं ,यात कमीत कमी पन्नास साठ माणसं एकावेळी राहत असतील पूर्वीच्या काळी.
चिरेबंदी दगडाची बांधणी. उत्तम सागवानी लाकडापासून बनवलेले दारं खिडक्या.
तिचं आत्ताचं मोडकळीस आलेलं रुप सुद्धा भुरळ घालते तर तेव्हा तिचा काय रुबाब असेल?

तिला फार उत्सुकता होती.कारण लग्न ठरले तसे आईबाबा, शेजारी, नातेवाईक सगळ्यांच्याच तोंडी फक्त हवेलीच होती.महाजन ...ते हवेलीवाले...
म्हणून ते रूप बघण्यासाठी नेहाचे पाय सारखे तिकडे वळत होते.
काहीतरी तर रहस्य असेलच.
थोडं शांततेने घ्यावे लागेल.
थोडं शांततेने घ्यावे लागेल.
हवेलीला लागूनच मोकळ्या जागेत हे टुमदार घर बांधलेले. आतूनच हवेलीला जायला रस्ता होता. म्हणजे ती जागा सुद्धा हवेलीचाच एक भाग होती.
नेहाने सहा महिने कळ सोसली.कुणीतरी काहीतरी विषय काढेल आणि आपल्याला हवेलीविषयी कळेल पण सगळ्यांची चुप्पी.
शेवटी नेहानेच विषय काढला.
तेव्हा रमाक्का पुन्हा तिच्यावर डाफरल्या,
"कोणी मोठे काही सांगतात ते ऐकून घेतलं पाहिजे.उगाच त्यात शंका घेऊ नये आणि प्रश्न विचारू नये. नाही म्हणतात ना जायला तर नाही जायचं. संपला विषय.आम्ही नाही विचारलं कधी मोठ्यांना का नाही म्हणता म्हणून. हिंमत कुठे होती तुमच्यासारखी.
त्यांनीही कधी सांगितलं नाही. त्यांना काही
अनुभव आले असतील म्हणूनच नाही म्हणतात ना?"

"अहो आम्हाला आमची पुढची पिढी विचारेल तर त्यांना काय सांगायचं? ती तर तंत्रज्ञान युगातली पिढी.ती अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणार नाहीत.
'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' त्यावेळी काय करणार?
त्यापेक्षा एकवेळ बघायला काय हरकत आहे?
'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' त्यावेळी काय करणार?
त्यापेक्षा एकवेळ बघायला काय हरकत आहे?
शेवटी नेहा हट्टाला पेटली .
तिने गावातल्या जुन्या जाणत्या वयस्कर लोकांना भेटून माहिती काढणे सुरू केले. शेजारपाजारुन काही माहिती मिळते का त्यासाठी प्रयत्न सुरू केले.
तिने गावातल्या जुन्या जाणत्या वयस्कर लोकांना भेटून माहिती काढणे सुरू केले. शेजारपाजारुन काही माहिती मिळते का त्यासाठी प्रयत्न सुरू केले.
त्यावरून नेहाने तर्क काढला की हे सगळं अंधश्रद्धेपोटी , भीतीपोटी चालू आहे. खरं कोणालाच काही माहिती नाही.
पण ती अस्वस्थ होती.तिला रहस्य जाणून घ्यायचे होते.
पण ती अस्वस्थ होती.तिला रहस्य जाणून घ्यायचे होते.
खूप विचार करून
नेहाने एक दहा-बारा माणसांची टीम बोलावली. ज्यांच्या मदतीने ती हवेलीत जाणार होती.
नेहाने एक दहा-बारा माणसांची टीम बोलावली. ज्यांच्या मदतीने ती हवेलीत जाणार होती.
कारण ती हवेली जवळपास शंभर वर्षांपासून तशीच पडीत होती. आत काय काय असेल ?भयाण होती.त्यामुळे आणखी गुढतेत भर पडत होती.
आणि... नेहा चा निर्णय ऐकून
घरात रमाक्काने चोवीस तास जाप सुरू केला.
रमाक्काला माहिती होते पण ते कुणाला सांगायचे नाही असे वचन तिच्या वडिलांनी तिच्याकडून घेतले होते.
त्यामुळे रमाक्का खूप धास्तावली होती.
त्यामुळे रमाक्का खूप धास्तावली होती.
नेहाने त्या लोकांच्या मदतीने सुरवातीला हवेली साफ करण्याचे काम सुरू केले.
पण नेहाला लोकांनी जे सांगितलं की तिथे रात्रीच्या वेळी कोणीच दिसत नाही फक्त बांगड्यांचा आवाज येतो, कोणी सांगितले तिथे गुप्तधन आहे.त्यामुळे ....ते काहीच जाणवले नाही.
त्यामुळे नेहा थोडी शांत झाली.चला असे काही नाही.

तीन दिवस सतत काम सुरू होते. पण कुणालाच काहीच जाणवलं नाही. नेहाच्या जीवात जीव आला.
सगळे भितीपोटी जाण्याचे टाळत होते.
सगळे भितीपोटी जाण्याचे टाळत होते.
शेवटी ते एका माज घरात पोहोचले तिथे जमिनीला एक छोटेसे अगदी ओळखू सुद्धा येणार नाही असे झाकण होते .
ते उघडताच मात्र उघडणार्याची दृष्टी गेली.
ते उघडताच मात्र उघडणार्याची दृष्टी गेली.
तिथे नेहा घाबरली. पण तिने विचार केला ते तळघर असेल एवढे दिवसात बंद आहे त्यात कोंडलेल्या विषारी वायूमुळे असे झाले असेल.
पण नंतर कुणी कामगारही पुढे जायला धजावला नाही.
त्या दिवशी ते सगळे तिथून वापस आले.
पण नंतर कुणी कामगारही पुढे जायला धजावला नाही.
त्या दिवशी ते सगळे तिथून वापस आले.
रमाक्कला सगळा वृत्तांत कळताच त्या नेहाच्या हाता पाया पडून म्हणू लागल्या,
"नेहा ऐक नको करू प्रयत्न."
"नेहा ऐक नको करू प्रयत्न."
पण नेहा अडीग होती आपण दुसरी टीम बोलावू पण आत काय आहे ते बघायचेच.
शेवटी नाईलाजाने रमाक्काने हवेलीचे रहस्य नेहाला सांगितले ते ऐकून नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली.
"तिथे दादा दादी राहायचे त्यांच्या नावावरूनच त्या हवेलीला 'दादा दादीची हवेली' हे नाव पडले.
एवढ्या ऐसपैस हवेलीत फक्त दोन माणसं.
त्यांना मूलबाळ होत नव्हते आणि संपत्ती खूप म्हणून त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले.
एवढ्या ऐसपैस हवेलीत फक्त दोन माणसं.
त्यांना मूलबाळ होत नव्हते आणि संपत्ती खूप म्हणून त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले.
त्याला रोज वेगवेगळी स्वप्न यायची.त्याला कुणीतरी त्या झाकणवजा दाराजवळ बोलवायचं.तो त्या दारापर्यंत गेला की त्याला भोवळ यायची.तो धास्तावला होता.
त्यातच एक दिवस त्यांच्या हवेलीवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी दादा दादीला बांधून ठेवले आणि तळघर लुटून नेण्याचा प्रयत्न केला.
पण त्या दरोडेखोरांची दृष्टीच गेली.
पण त्या दरोडेखोरांची दृष्टीच गेली.
ते भितीने पळून गेले. मुलाने दादा दादींना सोडले.
नंतर दादा दादींनी तळघरात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांची सुद्धा दृष्टी गेली.आणि शेवटी ते पण गेले.
नंतर दादा दादींनी तळघरात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांची सुद्धा दृष्टी गेली.आणि शेवटी ते पण गेले.
नंतर त्या दत्तक पुत्राने घाबरून संपत्तीला महत्त्व न देता जीव वाचवण्यासाठी म्हणून
हवेली सोडून आपण राहतोय त्या बाजूच्या जागेत आश्रय घेतला.
हवेली सोडून आपण राहतोय त्या बाजूच्या जागेत आश्रय घेतला.
कष्ट करून आपला संसार उभा केला. माझे बाबा म्हणजे त्याची पाचवी पिढी.
माझ्या बाबांनी असाच तुझ्यासारखा हट्टीपणा करून हवेली उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना सुद्धा अंधत्वाने घेरले.
माझ्या बाबांनी असाच तुझ्यासारखा हट्टीपणा करून हवेली उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना सुद्धा अंधत्वाने घेरले.
त्यावेळी त्यांनी मला विश्वासात घेऊन ही सगळी हवेलीची कहाणी सांगितली आणि हे कुणालाच कळू देऊ नको म्हणून माझ्याकडून वचन घेतले.
आता नेहाने हवेलीत जाण्याचा विचार सोडून दिला पण तिला धनसंपत्तीच्या मोहाने पछाडलेच होते.
तिने ती हवेली विकायला काढली.
एवढी मोठी जागा बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळते याचा मोह एका बिल्डरला पडला आणि त्याने ती खरेदी केली.
तिने ती हवेली विकायला काढली.
एवढी मोठी जागा बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळते याचा मोह एका बिल्डरला पडला आणि त्याने ती खरेदी केली.
ज्या दिवशी खरेदीचे पैसे नेहाच्या हाती आले त्या दिवशी नेहाची सुद्धा दृष्टी गेली.पण नेहाने लगेच तो पैसा एका अनाथ, अपंग, निराधार लोकांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्थेला दान केला.काय चमत्कार घडला...
उपचारानंतर तिला सृष्टी बघण्यासाठी दृष्टी लाभली.
बिल्डरने जागेची शांती केली तिथे खूप मोठे होम हवन केले त्याच्याही मनात भीती होती.
तिथे त्याने मोठी इमारत उभी केली पण एकही फ्लॅट खरेदी करायला कोणी तयार नव्हते.
शेवटी तोच तिथे एका फ्लॅटमध्ये जाऊन राहायला लागला त्याला लोकांना दाखवून द्यायचे होते की काहीही नाही अफवा आहेत.
म्हणजे लोक इथे राहायला येतील.
आणि त्याचे खरेच झाले.

त्याने वास्तुशांती करून त्या घरात प्रवेश केला.तो सुखासमाधानाने तिथे राहतोय हे बघून सगळे फ्लॅट विकल्या गेले.
हवेलीचे रहस्य शोधायला गेलेल्या नेहाला हवेलीचे रहस्य अशा तऱ्हेने कळून चुकले. भीती खोटी म्हणावी किंवा अंधश्रद्धा म्हणावी तर या सगळ्यांना अंधत्व का आलं? हा ही तर प्रश्न आहेच.
दुसरीकडे अंधश्रद्धा तरी कशी म्हणावी?
बिल्डरला कसे काहीच झाले नाही?
सगळे अनुत्तरित प्रश्न.
ती त्याच्या नाव राशीला उतरली आपल्या नाही.असे मनाला समजावून तिने सुटका करून घेतली.
बिल्डरला कसे काहीच झाले नाही?
सगळे अनुत्तरित प्रश्न.
ती त्याच्या नाव राशीला उतरली आपल्या नाही.असे मनाला समजावून तिने सुटका करून घेतली.
रमाक्का म्हणाल्या,
"आता सांगू शकशील ना नवीन पिढीला हवेलीचे रहस्य. बघशील ती तंत्रज्ञान युगातील पिढी काही वैज्ञानिक शोध लावू शकते का ते. आणि डोळसपणे शोध घेऊ शकते का ते.तोपर्यंत मी तर नसेन."
मंडळी जुने लोक अशा गोष्टी अजूनही सांगतात. ते घर झपाटलेलं आहे,त्या चिंचेच्या झाडाखाली भर बारा वाजता जाऊ नको अजून काही.
त्यामुळे काही जागा अजूनही तशाच पडून आहेत.
विज्ञान युगात त्यावर काही उपाय सापडेल का? हे सगळं खरं की मनातली भितीची भुतं?
तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा.
त्यामुळे काही जागा अजूनही तशाच पडून आहेत.
विज्ञान युगात त्यावर काही उपाय सापडेल का? हे सगळं खरं की मनातली भितीची भुतं?
तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा.
©®शरयू महाजन
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने