क्यूआर.. भाग १
"वहिनी, तुमचा हा साड्यांचा टाइमपास मी आठ दिवसांत दहापट करून दाखवतो. फक्त फोन माझ्याकडं द्या. आठ दिवस."
कौशलनं चहाचा कप खाली ठेवला आणि किरणकडं बघितलं. किरणनं मान डोलावली. रसिकाच्या हातातला फोन तिच्या हातातच होता, पण निर्णय झालेला होता.
कौशल म्हणजे किरणचा चुलतभाऊ. गावाहून नोकरी शोधायला शहरात आलेला, महिनाभर इथंच राहणार होता. एमबीए अर्धवट सोडलेलं, पण बोलणं मात्र पूर्ण एमबीएचं. मार्केटिंग, ब्रँडिंग, स्केलिंग.
पहिल्या दोन दिवसांत त्यानं घरातल्या प्रत्येक गोष्टीला सल्ला दिला होता. आणि तिसऱ्या दिवशी त्याची नजर रसिकाच्या व्यवसायावर पडली.
तीन वर्षांपूर्वी रसिकानं व्हॉट्सॲपवरून साड्या विकायला सुरुवात केली होती. सुरुवात दहा साड्यांची. आता चारशे ग्राहक होत्या, दर महिन्याला ऐंशी नव्वद साड्या जायच्या. ती स्वतः येवल्याहून माल आणायची, स्वतः फोटो काढायची, स्वतः पॅक करायची. कॅटलॉगवर नाव होतं, रसिका साड्या. आणि प्रत्येक फोटोत एक गोष्ट ठरलेली असायची. साडीच्या घडीशेजारी तिच्या आईची जुनी पितळी घंटा.
आई गेल्यावर माहेरून आलेली एकमेव वस्तू. पहिल्या फोटोत ती सहज आली होती, मग ग्राहक विचारायला लागल्या, घंटा कुठाय? आणि घंटा हीच तिची ओळख झाली.
किरणला या सगळ्याचं कौतुक होतं, पण ते हौस म्हणून.
किरणला या सगळ्याचं कौतुक होतं, पण ते हौस म्हणून.
महिन्याला बारा पंधरा हजार सुटतात, बरं आहे, एवढंच. कौशलनं आकडे ऐकले तेव्हा तो उडाला.
"वहिनी, चारशे ग्राहक अन् महिन्याला पंधरा हजार?? अहो हे लाखाचं काम आहे. तुम्ही पोस्ट टाकता तशी नाही टाकायची. मी दाखवतो."
"वहिनी, चारशे ग्राहक अन् महिन्याला पंधरा हजार?? अहो हे लाखाचं काम आहे. तुम्ही पोस्ट टाकता तशी नाही टाकायची. मी दाखवतो."
"भावाला अनुभव मिळेल, अन् तुझंही वाढेल," किरण म्हणाला. "दे त्याला बघू दे आठ दिवस. पुरुष माणसाला हिशोब लवकर कळतो."
रसिकानं फोन दिला. पोस्टिंगपुरता, असं तिनं स्वतःला सांगितलं.
आणि कौशलनं खरंच कमाल केली. कॅटलॉगचे फोटो सुंदर झाले. साड्यांना नावं आली, मयूर, गंधर्व, राजहंस. मेसेज मोजून मापून जायला लागले. आठवड्यात सत्तर ऑर्डरी आल्या.
आणि कौशलनं खरंच कमाल केली. कॅटलॉगचे फोटो सुंदर झाले. साड्यांना नावं आली, मयूर, गंधर्व, राजहंस. मेसेज मोजून मापून जायला लागले. आठवड्यात सत्तर ऑर्डरी आल्या.
रसिका दिवसरात्र पॅकिंग करत होती, कुरिअरवाल्याशी भांडत होती, येवल्याला दोनदा फेरी मारून आली होती. आणि घरात, नातेवाइकांत, सोसायटीत एकच बोलणं सुरू झालं. कौशलनं वहिनींचा व्यवसाय उभा केला. किरणच्या आईनं फोनवर सांगितलं, कौशल आहे म्हणून चालतंय गं, नाहीतर तुझं आपलं तेच.
रसिका गप्प बसली. तीन वर्षं ती एकटी होती तेव्हा ते तेच होतं, आणि आठ दिवसांत ते व्यवसाय झालं होतं.
पण एक गोष्ट तिला खटकत होती. ऑर्डरी वाढल्या तरी तिच्या खात्यात जमा होणारी रक्कम वाढत नव्हती. उलट कमी झाली होती. तिनं कौशलला विचारलं.
पण एक गोष्ट तिला खटकत होती. ऑर्डरी वाढल्या तरी तिच्या खात्यात जमा होणारी रक्कम वाढत नव्हती. उलट कमी झाली होती. तिनं कौशलला विचारलं.
"पेमेंट सायकल असते वहिनी. ग्राहकांना आठ दिवसांचं क्रेडिट दिलंय, म्हणजे ऑर्डर वाढतात. येईल सगळं एकदम."
तिला हिशोब कळत नाही असं घरात ठरलेलं होतं, म्हणून ती गप्प बसली. फोनही आता कौशलकडंच राहायचा. दिवसभर पोस्टिंग, रात्री रिप्लाय. रसिकाकडं फक्त पॅकिंगच्या यादीचा कागद यायचा. ग्राहकांशी बोलणंही त्यानं स्वतःकडं घेतलं होतं.
वहिनी, तुम्ही पॅकिंगवर लक्ष द्या, कस्टमर हँडलिंग माझं, असं तो म्हणाला आणि किरणला ते पटलंही. एका रात्री रसिकानं किरणजवळ विषय काढला. जुन्या ग्राहक मला विचारतायत, तू कुठं गेलीस म्हणून. किरण हसला. अगं इगो कशाला? भाऊ आहे तो. वाढतंय ना काम? मग झालं. रसिकानं मान हलवली आणि पुढच्या दिवशीच्या पॅकिंगची यादी वाचायला घेतली.
यादीवरची नावं तिच्या ओळखीची होती. फक्त त्या नावांशी बोलणारं तोंड आता दुसरं होतं.
सत्यनारायणाची पूजा दोन दिवसांवर आली. कौशलचे आई वडील गावाहून येणार होते, नातेवाईक जमणार होते. रसिका पूजेच्या तयारीत बुडाली आणि आदल्या रात्री तिचा जुना फोन, ज्यावर ती आता फक्त आईच्या बहिणीशी बोलायची, तो वाजला. एका जुन्या ग्राहकाचा मेसेज. पहिल्या दहा ग्राहकांपैकी एक.

रसिकाताई, अभिनंदन! नवीन नाव छान आहे. पण साडी जुन्या नंबरवर मागवायची का नवीन? गोंधळ झाला. हा बघा कॅटलॉग आला मला.
खाली कॅटलॉग होता. रसिकानं उघडला.
साड्या तिच्या होत्या. फोटो तिचे होते. मयूर, गंधर्व, राजहंस. प्रत्येक साडीशेजारी आईची पितळी घंटा तशीच होती. आणि प्रत्येक फोटोखाली एक क्यूआर कोड होता. पेमेंटसाठी. तिनं झूम केलं.क्यूआर कोडखालचं नाव तिचं नव्हतं. कौशल. कॅटलॉगच्या पहिल्या पानावर मोठ्या अक्षरांत नाव होतं, के. एस. कलेक्शन्स. आणि खाली बारीक अक्षरांत, पूर्वीचं रसिका साड्या.

पूर्वीचं.
रसिका फोन हातात धरून बराच वेळ बसून राहिली. बाहेरच्या खोलीत कौशल किरणला उद्याच्या पूजेला किती माणसं येणार ते सांगत होता, आणि किरण हसत होता.