Login

माझे प्रेरणा स्त्रोत

तुझं काम मध्ये मध्ये बंद असते मग तू कसं भागवते
#. महिला दिनाच्या निमित्ताने कथा
“घे भरारी”

माझे प्रेरणा स्त्रोत
माणसाला प्रेरणा द्यायसाठी कुठे, केव्हा कोण भेटेल हे सांगणे कठीण. . ती काही उद्योजिका नाही, ती सेलिब्रिटी केव्हा स्टार ही नाही ,ती एक कमी शिकलेली पण परिस्थितीने जिला तावून सुलाखून तेज दिले अशी एक साधारण मालिश वाली तरुण स्त्री लक्ष्मी आहे. जिची कथा मी तुम्हाला सांगते….
मागासलेल्या जमातीत जन्मलेली असल्याने लक्ष्मी ला जेम तेम लिहिता-वाचता येत असतानाच लग्न बंधनात अडकली, आपला नवरा व आपला संसार हेच तिचे जग होते.
नवर्या ने दोन मुलांची आई बनवण्या पलीकडे काहीच सुख दिले नाही. जे कमावले ते दारू त गमावले.
संसाराला हातभार लागावा म्हणून लक्ष्मी आता धडपड करू लागली. आपला पैतृक धंदा, आईकडून शिकलेले बाळ बाळंतीणीची तेल मालिश च् काम तिने हातात घेतले . घरातले काम करणे घरोघरी मालिश करायला जाऊ लाग ली.
थोडा पैसा हातात येऊ लागला पण नवरा तेही चोरून घेऊ लागला ,तेव्हा मात्र तिने विरोध केला. रोज होणारी मारहाण आणि मुलांवर होणारे वाईट संस्कार हे सगळं सहन न होऊन नाईलाजाने लक्ष्मीने वेगळे घर थाटले.

**सोबत दोन लहान मुलं व माहेरून मिळालेली चार भांडी एवढीच तिची मालमत्ता होती, पण परिस्थितीने तिला दिलेली हिम्मत, लक्ष्मी ने मॅटर्निटी होमच्या एका सिस्टरला विनंती करून तेल मालिश साठी अजुन ग्राहक मिळवले.
एकखोली चे घर मुले सरकारी शाळेत शिकत, माहेर सासर कोणाचाच आधार नाही.*

स्वतःच्या घरचे काम पूर्ण करून सायकल वर सलवार सूट घालून घरोघरी जाऊन ती काम खूप छान व वेळेत करायची. पण हे काम कमी अधिक असल्याने तिने पार्लर चे काम शिकून घेतले होते.
आयब्रो, फेशियल, मेहंदी लावणे हे काम
ही ती घरोघरी जाऊन करत असे.
आता तिच्याजवळ एक साधा सा मोबाईल होता त्याने ती आपल्या ग्राहकांची संपर्क ठेवत असे.
घरी वेळ मिळाला की ती साड्यांना फॉल व पीकू ही करायची.
पण एक दिवस ती सायकल वरून जात असतो ना एका स्कूटरची तिला धडक बसली ती सायकल वरून खाली पडली पायाचे हाड मोडले कशीबशी दवाखान्यात पोहोचली महिनाभर प्लास्टर लागले,
आता खरी लक्ष्मीची परीक्षा होती. तिने घरी बसल्या पापडबनवायला सुरुवात केली. कसाबसा महिना पार पाडला. आणि ती परत कामाला सज्ज झाली
कामातून मिळालेल्या पैशातून तिने एक सेकंड हॅन्ड स्कुटर ही घेतला ज्यावरून ती आरामात कामावर जात असे त्यामुळे वेळही वाचायचा, साठवलेले पैसे बँकेत जमा करण्यासारखे काम ही ती सहजपणे करत असे.आता तिची मुलगी कॉलेजात शिकते व मुलगा बारावीत आहे.*
मध्यंतरी मला ती भेटली, विचारले , “मुलांचे शिक्षण यास तुझा बराच पैसा खर्च होत असेल “मग तु कसं भागवते?

लक्ष्मी, म्हणाली तेल मालिश चे काम जरी मधेमधे बंद असते तरी मी शिवणायचं काम करते त्यात थोडीफार कमाई होते मुलगा ही पेपर वाटायचं काम करतो., काही वयस्कर लोकांना डबेही करून पाठवते. अशा तऱ्हेने ति वेळ निभावून नेते.
अशी ही मालिश वाली लक्ष्मी जिच्या जवळ फारसे शिक्षण नसताना ,माहेर-सासर ची काही मदत नसताना स्वतःच्या हिंमतीवर मुलांना मोठे करणे ,एकटे राहून, मानाने काम करणे सोपे काम नाही....
अशी ही लक्ष्मी ,मालिश वाली आपल्या सर्वा साठी प्रेरणा स्रोत आहे. जी स्वबळा वर पुरुषांच्या आधारा शिवाय स्वाभिमानाने जगायला शिकली. तिचं काम तिची हिंमत आपण सर्वांसाठी एक प्रेरणा आहे…
--------------------------------------------------
प्रतिभा परांजपे
वरील गोष्ट- मिस भाग्यश्री ऋशिकेश देशमुख अमरावती, महाराष्ट्र . यांच्या मागणीनुसार पोस्ट केली आहे.
आवडल्यास मेंशन करावे

0