कवितेबद्दल थोड समजून घेताना...
कधी कधी परफेक्शनच्या शोधात आपण सगळेच स्वतःलाच हरवून बसतो…
परफेक्शन पाहिजे म्हणतं, स्वतः ला बदललंय राहतो,
जसे आहोत तसे स्विकारण्याची तयारी आपली नसते...
समोरचा कसा चांगला, मी का नाही म्हणतं स्वतः चं लादून घेतल्या अपेक्षे खाली झुकून गेलो..
जसे आहोत तसे स्विकारण्याची तयारी आपली नसते...
समोरचा कसा चांगला, मी का नाही म्हणतं स्वतः चं लादून घेतल्या अपेक्षे खाली झुकून गेलो..
माझी " परफेक्शच्या मागे धावताना"ही कविता त्या प्रत्येक मनासाठी आहे, ज्याने दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या.
अपूर्ण असणं चुकीचं नाही, कारण खरं सौंदर्य परफेक्ट असण्यात नाही… तर स्वतःसारखं जगण्यात आहे.
म्हणून आशा करते तुम्हा सर्वांना हि कविता नक्की आवडेल , आणि हो तुमच्या प्रतिक्रिया आशा बाळगून मी माझी कविता तुझ्यासाठी सादर करते ..
परफेक्शनच्या मागे धावताना,
स्वतःलाच शोधायचं राहून गेलं…
आरशातलं ते कृत्रिम हसू,
नकळत आयुष्य बनून गेलं…
स्वतःलाच शोधायचं राहून गेलं…
आरशातलं ते कृत्रिम हसू,
नकळत आयुष्य बनून गेलं…
परफेक्शनच्या मागे धावताना,
वेळेच्या बंधनात स्वतःला कैद केलं…
काट्यांच्या ठोक्यावर जगताना,
जगणंच कुठेतरी हरवून गेलं…
वेळेच्या बंधनात स्वतःला कैद केलं…
काट्यांच्या ठोक्यावर जगताना,
जगणंच कुठेतरी हरवून गेलं…
परफेक्शनच्या मागे धावताना,
आनंदाचे क्षण सारे निसटून गेले…
आपुलकीचे शब्दही परके झाले,
खोट्या हास्याने आयुष्य व्यापून गेले…
आनंदाचे क्षण सारे निसटून गेले…
आपुलकीचे शब्दही परके झाले,
खोट्या हास्याने आयुष्य व्यापून गेले…
परफेक्शनच्या मागे धावताना,
स्वतःपासूनच दूर होत गेलो…
हसू, दुःख, भावना सगळंच कोरडं पडलं,
आयुष्य फक्त जगायचं म्हणून जगलो…
स्वतःपासूनच दूर होत गेलो…
हसू, दुःख, भावना सगळंच कोरडं पडलं,
आयुष्य फक्त जगायचं म्हणून जगलो…
परतीच्या वाटेचा जेव्हा विचार आला,
मागे वळून आयुष्य पाहताना…
नकळत डोळ्यांत अश्रू दाटून आले…
इतकं धावलो परफेक्शनच्या मागे,
की स्वतःसाठी जगायचंच विसरून गेलो…
प्रत्येकाला खूश ठेवताना,
मन मात्र आतून तुटत गेलं…
की स्वतःसाठी जगायचंच विसरून गेलो…
प्रत्येकाला खूश ठेवताना,
मन मात्र आतून तुटत गेलं…
चुकांनाही शिक्षा समजत राहिलो,
अपूर्णतेलाच कमीपणा मानत गेलो…
पण आयुष्य शिकवत होतं हळूच,
“परफेक्ट नसतानाही सुंदर जगता येतं…”
दुसऱ्यांच्या नजरेत परफेक्ट बनता बनता..
स्वतःच खरं अस्तित्व हरवून बसलो,
नकाराला होकार देत, मन मारत जगताना..
जगण्या खरा अर्थ विसरून गेलो...
प्रत्येक वेळी स्वतःलाच बदलत गेलो,
कुणाच्या अपेक्षांमध्ये अडकत गेलो…
पण त्या गर्दीतल्या चेहऱ्यामागे,
स्वतःलाच ओळखायचं राहून गेलो…
कुणाच्या अपेक्षांमध्ये अडकत गेलो…
पण त्या गर्दीतल्या चेहऱ्यामागे,
स्वतःलाच ओळखायचं राहून गेलो…
आता मात्र ठरवलंय हळूहळू,
स्वतःसाठीही थोडंसं जगायचं…
अपूर्ण असलं तरी खरं हसू घेऊन,
आयुष्य पुन्हा नव्याने जगायचं…
स्वतःसाठीही थोडंसं जगायचं…
अपूर्ण असलं तरी खरं हसू घेऊन,
आयुष्य पुन्हा नव्याने जगायचं…
मग एक दिवस आरशात स्वतःला पाहिलं,
चेहऱ्यामागचं खरं मन दिसून आलं…
थकलेलं होतं, हरवलं होतं,
पण अजूनही जगायची आस होती…
तेव्हा पहिल्यांदा स्वतःलाच म्हटलं,
“थोडं अपूर्ण राहिलंस तरी चालेल…”
कारण परफेक्शनपेक्षा महत्त्वाचं,
मनापासून जगणं असतं…
आणि त्या दिवसापासून,आयुष्य पुन्हा थोडंसं सुंदर वाटू लागलं…
क्रमशः
कशी वाटली कविता नक्की सांगा..
