भाग ३
अनिरुद्धला जाऊन आज बरोबर तेरा दिवस झाले होते.
पहिल्या काही दिवसांत त्यांच्या घरात माणसांची सतत ये-जा सुरू होती. घर कधी रिकामे वाटलेच नव्हते. कोणाचा फोन, कोणाचं सांत्वन, कोणाचे अश्रू, कोणाचे सल्ले…
“काही लागलं तर सांग…”
“आम्ही आहोत…”
“काळजी करू नको…”
“धीर धर…”
असे आवाज सतत कानावर पडत होते. प्रत्येकजण सहानुभूती दाखवत होता. प्रत्येकजण जवळ असल्याचे सांगत होता. पण तेरा दिवस संपले. विधी संपले आणि एकेक करून लोकही येण्याचे थांबले. फोन थांबले. दारावरची बेल थांबली. सांत्वनाचे शब्द थांबले. घरातली गर्दी संपली.
आणि त्या मोठ्या घरात उरले चार श्वास, दोन लहान मुले, एक वृद्ध जोडपे आणि अवघ्या ३३-३४ वर्षांची एक विधवा, स्वरा.

अनिरुद्ध वरून हे सगळे पाहत होता.
आता त्याला वेळेचे भान उरले नव्हते
दिवस…
रात्र…
सकाळ…
संध्याकाळ…
क्षण…
महिने…
सगळे फक्त डोळ्यांसमोर घडत होते आणि प्रत्येक दृश्य त्याच्या आत्म्याला आतून जाळत होते.
आता त्याला वेळेचे भान उरले नव्हते
दिवस…
रात्र…
सकाळ…
संध्याकाळ…
क्षण…
महिने…
सगळे फक्त डोळ्यांसमोर घडत होते आणि प्रत्येक दृश्य त्याच्या आत्म्याला आतून जाळत होते.
******
त्या सकाळी घरात नेहमीसारखी हालचाल सुरू झाली होती.
स्वरा किचनमध्ये उभी होती. गॅसवर चहा उकळत होता.
एका बाजूला मुलांच्या डब्याची तयारी सुरू होती. दुसऱ्या बाजूला शाळेच्या बाटल्या, पुस्तके, डबे मांडलेले होते.
स्वरा किचनमध्ये उभी होती. गॅसवर चहा उकळत होता.
एका बाजूला मुलांच्या डब्याची तयारी सुरू होती. दुसऱ्या बाजूला शाळेच्या बाटल्या, पुस्तके, डबे मांडलेले होते.
स्वराचा मोठा मुलगा, दहा वर्षाचा आरव, गेल्या काही दिवसांत जणू दहा वर्षांनी मोठा झाला होता. पूर्वी सतत बोलणारा, हट्ट करणारा आरव आता शांत झाला होता.
कमी बोलणारा, जास्त समजून घेणारा, तो बहिणीची बाटली भरत होता. पाण्याचं झाकण नीट बंद करताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती.
कमी बोलणारा, जास्त समजून घेणारा, तो बहिणीची बाटली भरत होता. पाण्याचं झाकण नीट बंद करताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती.
लहान सहा वर्षाची अन्वी, तिच्यासाठी मृत्यू अजूनही एक गोष्ट होती, सत्य नव्हते. ती रोज एकच प्रश्न विचारायची,
“आई…”
ती त्या दिवशीही स्वराच्या साडीला धरून उभी राहिली.
“बाबा देवाघरी गेले म्हणजे?”
“आई…”
ती त्या दिवशीही स्वराच्या साडीला धरून उभी राहिली.
“बाबा देवाघरी गेले म्हणजे?”
ती काही क्षण विचार करत राहिली, मग निरागसपणे म्हणाली,
“फोन तरी करतील ना?”
“फोन तरी करतील ना?”
क्षणभर स्वराचे काम करणारे हात थांबले. चहाचा उकळणारा आवाज घरभर पसरला, पण स्वराच्या छातीत काहीतरी तुटले, तरीही तिने चेहऱ्यावर हसू आणले. मुलीच्या गालावर हात फिरवत ती म्हणाली, “बाबा ताऱ्यांतून तुला बघतायत ग…”
अन्वीने लगेच खिडकीबाहेर पाहिले.
“खरंच?”
“खरंच?”
स्वराने हसत मान डोलावली. पण ती मागे वळताच, तिचे डोळे पुन्हा भरून आले.
वरून अनिरुद्ध रडत होता.
“नको गं…” त्याचा आवाज थरथरत होता.
“असं सांगू नको..”
“मी इथे आहे…”
“मी खरंच बघतोय…”
“नको गं…” त्याचा आवाज थरथरत होता.
“असं सांगू नको..”
“मी इथे आहे…”
“मी खरंच बघतोय…”
पण त्याचा त्या शब्दांचा आता काहीच उपयोग नव्हता.
त्या दिवशी पहिल्यांदाच स्वराने त्यांच्या खोलीतले कपाट उघडले. ती काही क्षण नुसती उभी राहिली. जणू त्या कपाटात आठवणी नव्हत्या, वादळ दडले होते.
त्या दिवशी पहिल्यांदाच स्वराने त्यांच्या खोलीतले कपाट उघडले. ती काही क्षण नुसती उभी राहिली. जणू त्या कपाटात आठवणी नव्हत्या, वादळ दडले होते.
तिने सावकाश एक फाईल बाहेर काढली, मग दुसरी, मग तिसरी, टेबलावर कागद एकामागून एक साचत गेले. बँकेची कागदपत्रं, लोन, EMI, क्रेडिट कार्ड, घरभाडं, मुलांच्या शाळेची फी, आई-वडिलांच्या औषधांचा खर्च…
एक…
दोन…
तीन…
कितीतरी फाईल्स.
अचानक तिच्या हातातून एक फाईल खाली पडली. कागद सगळीकडे विखुरले. स्वरा तिथेच खुर्चीत बसली. दोन्ही हातांनी डोके पकडले. आवाज पूर्ण थरथरत होता.
“हे…”
तिने पुन्हा कागदांकडे पाहिले,“इतकं सगळं…?”

अनिरुद्धने डोळे मिटले. त्याच्या आत्म्यावर प्रत्येक शब्द जखम करत होता.
“मी तुला सांगितलंच नाही…” तो स्वतःशी पुटपुटला.
“मी किती घाबरलो होतो…”
क्षणभर तो शांत झाला आणि मग स्वतःलाच प्रश्न विचारला, “पण, तू सांगितलं असतंस तर ती सोबत उभी राहिली नसती का?”
तेवढ्यात फोन वाजला. स्वराने थरथरत्या हाताने फोन उचलला.
“हॅलो…”
पलीकडून कोरडा, यांत्रिक आवाज आला, “मॅडम, तीन EMI बाकी आहेत. पेमेंट कधी करणार?”
स्वराने ओठ चावले.
“थोडा… थोडा वेळ मिळेल का?” आवाज शक्य तितका स्थिर ठेवत ती म्हणाली.
“थोडा… थोडा वेळ मिळेल का?” आवाज शक्य तितका स्थिर ठेवत ती म्हणाली.
“मॅडम, नियम सगळ्यांसाठी सारखे असतात.” पलीकडून उत्तर लगेच आले आणि फोन कट झाला.
स्वरा काही क्षण नुसती फोनकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातील दु:ख आता हळूहळू रागात बदलत होते.
****
त्या रात्री…
जेवताना ती सासरे शरद यांच्यासमोर बसली.
ते शांतपणे जेवण करत होते.
ते शांतपणे जेवण करत होते.
स्वराने हळू आवाजात विचारले, “बाबा…”
“हं?” ते जेवता जेवता थांबले.
“अनिरुद्धने काही सेव्हिंग्स केल्या होत्या का?”
शरदरावांनी काही क्षण उत्तर दिले नाही.
मग नजर चुकवत म्हणाले, “माहीत नाही. त्याने कधी सांगितलं नाही.”
मग नजर चुकवत म्हणाले, “माहीत नाही. त्याने कधी सांगितलं नाही.”
तेवढ्यात सुमित्राबाई लगेच बोलल्या, “आमच्या मुलाने आम्हाला कधी त्रास दिला नाही.”
त्या स्वराकडे बघत म्हणाल्या, “कोणाला काय दाखवायचं म्हणून जगत होता… कोण जाणे…”
ते शब्द सरळ स्वराच्या छातीत जाऊन आदळले.
अनिरुद्ध ओरडला,
“आई! पुरे! तिला दोष देणं बंद करा!”
“आई! पुरे! तिला दोष देणं बंद करा!”
पण…
नेहमीसारखेच, शांतता होती. कोणाला त्याचा आवाज ऐकू जात नव्हता.
नेहमीसारखेच, शांतता होती. कोणाला त्याचा आवाज ऐकू जात नव्हता.
****
दोन दिवसांनी…
स्वराने स्वतःची फाईल बाहेर काढली, Degree certificates, B.Ed, M.A, Gold medal, अनिरुद्धनेच कधी कौतुकाने फ्रेम करून ठेवलेली होती.
तिने ते प्रमाणपत्र हातात घेतले. डोळ्यांत पाणी आले. ती हलकंसं हसली.
“तू म्हणाला होतास…”
“स्वरा…”
“तू घर सांभाळ, मी बाकी सगळं सांभाळेल..” तिने हवेतच त्याच्याशी बोलल्यासारखे म्हटले.
क्षणात तिचे हसू विरले. डोळ्यातून अश्रू ओघळले.
“स्वरा…”
“तू घर सांभाळ, मी बाकी सगळं सांभाळेल..” तिने हवेतच त्याच्याशी बोलल्यासारखे म्हटले.
क्षणात तिचे हसू विरले. डोळ्यातून अश्रू ओघळले.
“आणि आज…”
तिने कागद छातीशी धरले.
“तुझ्याशिवाय आता जबाबदारी घ्यावी लागणार..”
तिने कागद छातीशी धरले.
“तुझ्याशिवाय आता जबाबदारी घ्यावी लागणार..”
अनिरुद्ध पूर्ण शांत झाला. त्याच्या आत काहीतरी तुटत होते.
कारण ती तुटत होती, रडत होती, पण उभी राहत होती.
कारण ती तुटत होती, रडत होती, पण उभी राहत होती.
*****
दुसऱ्या दिवशी सकाळी…
स्वरा मुलांना तयार करून घराबाहेर पडली. साधी कॉटन साडी, केस घट्ट बांधलेले, कपाळ रिकामे, हातात फाईल होती. डोळ्यांत झोप नव्हती, पण निर्धार होता.
शेजारच्या बायका दारात उभ्या होत्या.
एकीने कुजबुजत विचारले, “इतक्या लवकर नोकरीला?”
एकीने कुजबुजत विचारले, “इतक्या लवकर नोकरीला?”
दुसरी लगेच म्हणाली, “काय करणार… जबाबदारी आहे म्हणे…”
तिसरी हसत म्हणाली, “किंवा…”
ती बाकीच्यांकडे पाहत हसली. “स्वातंत्र्य.”
क्षणात सगळ्या हसू लागल्या.
ती बाकीच्यांकडे पाहत हसली. “स्वातंत्र्य.”
क्षणात सगळ्या हसू लागल्या.
पण स्वराने एकदाही मागे वळून पाहिले नाही. तिने मुलांचे हात अजून घट्ट पकडले आणि सरळ पुढे चालत राहिली.
वरून अनिरुद्ध तिला बघत राहिला.
पहिल्यांदाच त्याने स्वतःशी कबूल केले,
“स्वरा…”
त्याचा आवाज थरथरत होता.
“तुझा त्रास…”
“माझ्या त्रासापेक्षा हजारपट मोठा आहे..”
तो शांत झाला. मग हळूच म्हणाला, “मी फक्त थकलो होतो…” “पण तू…”
त्याचे डोळे भरून आले.
“तू जळत्या राखेतून चालते आहेस…”

ही फक्त सुरुवात होती.
कारण घराबाहेरचा समाज फक्त प्रश्न विचारत नाही तर तो चरित्रही लिहायला बसतो.
ही फक्त सुरुवात होती.
कारण घराबाहेरचा समाज फक्त प्रश्न विचारत नाही तर तो चरित्रही लिहायला बसतो.